बऱ्याच लोकांना माहिती नसते, की IFSC Code काय आहे. आणि कसा माहिती करावा. चला तर बघूया आय एफ एस सी कोड म्हणजे काय? आणि त्याबद्दल बरीचशी माहिती.

IFSC Code म्हणजे काय? (IFSC Code माहिती मराठीत)

Indian Financial System Code (भारतीय आर्थिक प्रणाली कोड) तसेच बँकेच्या ब्रँच ची ओळख म्हणजे IFSC. प्रत्येक बँकेच्या शाखेचा विशिष्ट कोड असतो. हा ११ कॅरेक्टर कोड असतो, हा कोड अल्फानुमेरिक (alphanumeric) म्हणजेच अंक आणि अक्षरे यांचा मिश्रणातुन हा कोड बनलेला असतो. प्रत्येक बँकेचा आपापला IFSC Code असतो. जो रिझर्व्ह बँकेने दिलेला असतो.


IFSC Code कसा असतो. (IFSC code काय आहे)

IFSC कोड हा ११ कॅरेक्टर चा असतो. सुरुवातीचे जे ४ अक्षर असतात. ते बँक चे नाव असते, पाचवे हे नेहमी 0 (शून्य) असते. हा एक नियंत्रण क्रमांक आहे, जो सर्व आयएफएससी कोडमध्ये समान असतो. तर शेवटच्या ६ नंबर हे बँकेचे स्थळ (location) दर्शवत असतो.
त्यामुळे बँक कुठली व ब्रँच कोणती हे समजते.

उदा. State Bank of India pune, Maharashtra
IFSC Code- SBIN0000333

IFSC कोड माहीत करायचा असल्यास तो आपल्या बँक ब्रँच मध्ये मिळतो, तसेच IFSC कोड का आपल्या पासबुक व चेक बुक वर देखील असतो.

हे वाचलंत का? –
* सिबिल स्कोअर म्हणजे काय?
* जीडीपी म्हणजे काय?

IFSC Code ची का आवश्यकता असते..?

आपण कुणाला एखादी मोठी रक्कम पाठवत असाल, तर आपल्याला या कोडची आवश्यकता असेल. समजा तुम्हाला एखाद्याला २ किंवा ३ लाख पाठवायचे असेल, तर आपल्याला पाठवणारी व्यक्तीची शाखा आयएफएससी कोड विचारेल.

म्हणूनच आपल्या शाखेचा हा कोड काय आहे. हे आपल्याला त्वरित माहित असणे आवश्यक आहे.
आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT) सारखे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी एखाद्यास पैसे पाठवायांचे किंवा पैसे घायचे असेल तर आपल्याला हा कोड माहित असणे आवश्यक असतो.

जर तुम्ही नेट बँकिंगचे ग्राहक असाल तर जेव्हा आयएफएससी कोडने नवीन लाभार्थी( Beneficiary) जोडण्यासाठी आवश्यक असतो. त्या वेळेस पण हया कोडची आवश्यकता भासते.


बँकेचा IFSC कोड कसा शोधावा ?

तुम्ही तीन पद्धतीने IFSC Code शोधू शकता.

१) बँक ब्रँच वर जाऊन

२) वेबसाईटवर visit देऊन

३) चेक बुक किंवा पासबुक वर

वेबसाईटवर वर कसा शोधायचा. ते मी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीत सांगणार आहे, चला तर पाहूया….


ऑनलाइन पद्धत ( वेबसाईटवर visit देऊन)

१) या लिंक वर क्लिक करा https://www.policybazaar.com/ifsc/

२) नंतर policy bazaar ची वेबसाईटवर open होणार
(फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे)

Source by- Google and Image by- policybazaar.com

३) त्यानंतर तुम्हाला चार बॉक्स दिसेल. पहिला असेल select bank त्यावर बँक चे नाव select करावे.

४) दुसरा बॉक्स असेल select state त्यावर आपले राज्य select करावे.

५) तिसऱ्या वर select district करावे. (जिल्हा)

६) चोथ्या वर select branch करावे. (जी तुमची बँक शाखा असेल ती)

७) ok केल्यावर तुमच्या समोर IFSC कोडे असेल.


MICR Code काय आहे? MICR Code चा उपयोग कुठे होतो? ( MICR Code in Marathi)

एमआयसीआर कोड (MICR code) – ओळखीसाठी त्यामध्ये शाईचा मेगनेटिक करेक्टर असतो. जे चेकच्या खाली पांढर्‍या ओळीच्या रूपात आढळतो, ज्यास एमआयसीआर बँड म्हणतात.
हा कोड आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी देखील वापरला जातो. या कोडच्या उपयोगाने ट्रांजेक्शन मध्ये पैश्याची सौरक्षण अजून वाढते.

एमआयसीआर (MICR) – ही खूप जुनी पद्धत आहे. जी पैशाचे संरक्षण करण्यासाठी नेगेशियेबल इंस्ट्रूमेंट आहे. तपासणी प्रक्रिया करण्यासाठी ही पद्धत सोयीस्कर आहे. एमआयसीआर कोडमध्ये धनादेशासंदर्भात सविस्तर माहिती असते. जी चेकच्या ९ क्रमांकाद्वारे दर्शविली जाते.
प्रथम तीन क्रमांक शहर कुठले आहे ते दर्शवतात. तर पुढील तीन क्रमांक बँकेबद्दल माहिती दर्शवतात. आणि शेवटचे तीन क्रमांक बँकेच्या शाखेशी संबंधित माहिती दर्शवतात.

नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड (NEFT) रिझर्व्ह बँकेने सुरू केला आहे, जेणेकरुन निधी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी त्वरित आणि काळजीपूर्वक पाठविला जाऊ शकेल.

MIRC – कोड मध्ये कोणी फसवणूक करू शकत नाही, कारण MICR विशेष मेगनेटिक शाई ने लिहिले असल्याने, फसवणूकीच्या प्रकरणात त्वरित विशेष मेगनेटिक शाई मुळे ओळखल्या जाऊ शकतात.
समजा,
जर विशिष्ट MIRC Code- 111246004 असेल तर प्रथम तीन क्रमांक शहराचे नाव सूचित करतात, मधले तीन बँकेचे नाव सूचित करतात, तर शेवटचे तीन बँकेच्या ब्रॅचची माहिती देतात.


Swift Code काय आहे? Swift Code चा उपयोग कुठे होतो? ( Swift Code in Marathi)

जर बाहेरील देशात तुमच्या पैशाची आवक जावक असेल तर तुम्हाला swift code म्हणजे काय हे नक्कीच जाणून घेतले पाहिजे.
तर बघूया स्विफ्ट कोड (swift code) म्हणजे काय?

Swift code full form – Society for Worldwide Interbank Financial Telecommunication code

आंतरराष्ट्रीय(International) मनी ट्रान्सफरसाठी स्विफ्ट कोड वापरला जातो. कोणत्याही एका बँकेची संपूर्ण माहिती फक्त या कोडमध्ये असते,

जसे की – बँकेची शाखा, कोणत्या देशाची बँक आहे, बँकेचे स्थान काय आहे इत्यादी सर्व प्रकारच्या बँकेचा तपशील
यामध्ये असतो. हा ८ ते ११ अंकी कोड आहे, जो बँकेचा एक अनोखा ओळख कोड आहे.

स्विफ्ट कोडच्या पहिल्या ४ करैक्टर मध्ये अल्फाबेट चा वापर केलेला असतो. ज्यामध्ये बँकेचे नाव असते. त्या नंतरचे २ करैक्टर हे देश कोड असतात. देश कोड नंतर, तेथे २ करैक्टर असतात, जे स्थान कोड असतात. आणि शेवटचे ३ कोड बँक शाखेचे असतात. हा कोड एका देशाच्या चलनाचे दुसर्‍या देशाच्या चलनात रूपांतरित करतो.

तर वरील पोस्टमुळे तुम्हाला IFSC Code , MIRC Code, व Swift Code बद्दलची बरीचशी माहिती मिळाली असेलच.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Animals Ayurvedic Remedy For Eye Flu Back Tanning Bank Loan Benefits of Coffee Benefits of Tea breaking news marathi Business Business Tips Cockroach Coffee Dengue Symptoms Diabetes Treatment Economy Eye Care Tips Eye information in marathi Farmers Good News Government Schemes Health how to remove tan instantly IFSC Code in Marathi Income Tax Land on Moon latest marathi news Maharashtra Farmers Mahindra Makhana Benefits Marathi Batmya marathi news Mental Health Moon Information Oral Health PM Kisan Samman Nidhi pm kisan yojana Protein Psychotic Disorder Reserve Bank of India Sleeping Tips Snake Bite Treatment Snake Information in Marathi Snake Venom Zhural डोळ्याची माहिती विषारी सापांची नावे

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *