marathi katha / marathi story / मराठी कथा

भास…

marathi horror stories

भास…

गावातून शहराला शिक्षणाला जाणाऱ्यासाठी ती एक सम्मान ची बाब असते. माझ्यासारखेच या सम्मान त सहभागी होणारे माझ्या गावातील काही मित्र पण होतीच.

गावातून बरेच वर्ष बाहेर शिकणारी व्यक्ती पण असतात. त्यातला मी आणि माझा मित्र रोहित…..

गावावरून नवीन येणाऱ्या मित्रांसाठी आमची रूम एक सार्वजनिक ठिकाणचं झालं होतं….फक्त त्या जागेला सार्वजनिक ठिकाण म्हणून महानगरपालिका कडून घोषित व्हायचं बाकी होत…बास तितकाच…..

आणि या सार्वजनिक ठिकाणाचा उल्लेख मी खास करून फक्त एकाच मित्रांसाठी केला, तो म्हणजे आनंद

जास्त मित्र असणे एक गर्वाची बाब आहे पण त्यात आनंद सारखे असणे म्हणजे झालं तुमचं काम…..

आनंद हा वयाने १९ वर्षाचा दिसत असला तरी त्याच डोकं हे ८ वर्ष वयोगटातील होते. म्हणजे तुम्ही अंदाज लावा तो कसा असेल…

प्रत्येक गोष्टीत

हे कसं…..? हे का…..? यांनी काही केलं तर काय होईल…..? याला हात लावला तर काही होणार तर नाही ना… ? इत्यादि…. इत्यादी.

आत्ता महत्वाच्या गोष्टीकडे वळू. माझ्या सोबत झालेली एक सत्य घटना. अमरावती शहरातील रूममध्ये माझा पार्टनर रोहित आणि मी रात्रीचे जवळपास साडेदहा वाजले असतील आमच्या गप्पा चालू असताना गेट चा आवाज आला.

‘आला वाटतो हा….? मी अस वाक्य उच्चारताच रोहित ने लगेच झोपेचं सोंग घेतलं.

‘हा झोपला पण इतक्या लवकर….?

आनंद नि झोपलेल्या रोहित कडे बघून म्हणताच मी लगेच बोललो.

‘लवकर कुठे रात्रीचे जवळपास अकरा वाजत आलेत, तो बाकीसारखा नाही रे….कुठे पण रात्र बे रात्र फिरायला…!’

मी हे वाक्य बोललो याचा अर्थ त्याला कळला होता, की नाही तोच जाणे, पण त्याने नंतर जो प्रकार केला तो विचित्र असून हासस्पद होता. त्याने रोहित ला हलवून हलवून उठवला.

ते म्हणतात ना झोपलेल्या व्यक्तीला उठवणे सोपे असत, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या व्यक्तीला उठवणे कठीण त्यातलाच तो प्रकार होता.

पण त्यात आनंदला विजय मिळाला होता.

आणि रोहित झोपेतून उठून रागात त्याला म्हणाला.

‘काय म्हणत बोल…!

‘काही नाही. झोपला होता का हे विचारत होतो.

त्या वाक्यमूळे मी हसू लागलो.

परंतु या नेहमीच्या त्रासाला आम्ही पार कंटाळलो होतो. काय करावे बर या विचारात असतांनाच मला एक युक्ती सुचली.

‘अरे …..रोहित ! काकांनी स्टोर रूम ची पूजा केली का? मी संशयास्पद रोहित ला विचारणा केली. माझ्या हालचाली वरून रोहित समजला होता ,की मी काही तरी खोट बोलतोय आणि त्यात त्याला हो ला हो म्हणावे लागणार.

आणि मला ज्या वाक्याची आनंद कळून ऐकण्याची इच्छा होती. नेमक तेच तो बोलला.

‘कशाची पूजा….?स्टोर रूम ची…?

कशाला….?’

तितक्यात रोहित म्हणाला. ‘रात्रीच्या वेळी हा विषय कशाला काडलास.!

परत आनंद आपल्या भुवया चळवत आमची विचारणा करत होता.

‘काय आहे स्टोर रूम चा विषय ?

‘विषय असा आहे की…आधी स्टोर….’ मी इतकच बोललो असता माझा विषय तोडत रोहित परत मला म्हणाला.

‘सागर….राहूदे रात्रीची वेळ आहे…! उद्या सकाळी सांग त्याला..!

‘बर उद्या सकाळी सांगतो….! मी हे वाक्य चुकीचे तर नाही बोलले हे मला आनंद पुढे बोलल्यावर कळलं.

‘बर उद्या सांग मला…!

आमचा बेत चुकला की काय अस समजून परत रोहितच म्हणाला

‘बर जाऊ दे सकाळी कश्याला आत्ताच सांगून टाक. तसे पण आनंद आत्ता त्याच्या रूम वर गेल्यावर परत सकाळी कशाला येणार…!

बस का….इतकं बोलण्याने माझ्या गोष्टीला हिरवा झेंडा दाखवला. आणि माझी गोष्ट पुढे चालू…..

‘ऐक तर…. आम्ही इथं राहायला यायच्या आधी सर्व मुली राहायच्या. पण स्टोर रूम आधी स्टोर रूम नसून तेथे मुलींची रूम असायची. जवळजवळ या तीनचार रूम मिळून इथ १0 ते १२ मुली राहायच्या.

गोष्टी च्या मधात च आपलं नाक खुपसत आनंद म्हणाला.

‘मग त्या का गेल्यात येथून ? आणि या सर्व रूम मुलांनाच का दिल्या.’

मी त्याच्या कळे रागाने कटाक्ष टाकला व परत स्वतः ला त्या गोष्टीत बुडवून भयानक असा वातावरण तयार करण्यात मी जुटलो.

‘तर तीन वर्षां आधी ज्या स्टोर रूम मध्ये मुली राहायच्या…म्हणजे आत्ताच स्टोर रूम आधीची ती रूम.’

परत आनंद काही मधातच विचारणार म्हणून मी त्याची शंका आधीच दूर केली. आणि तेच नेमके विचारायला त्यांनी तोंड उघडलंच होत.

‘परीक्षेच्या कालावधीत एका मुलीचा अभ्यास न झाल्याने तिने स्वतःला गळफास लावला. घरची परिस्थिती हालाकीची असून तिच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या होत्या. बाकी मुली या घटनेने घाबरून इथून रूम सोडून गेल्यात.

त्या नंतर काकांनी रूम ला स्टोर रूम करून टाकले. आणि दरवर्षी काका त्या रूम ची पूजा करतात. म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या तारखेला. यावर्षीची पूजा होऊन दोनच दिवस झाले.’

माझ्या बनावट गोष्टीचा आनंद वर बराच परिणाम झाला होता. तो लगेच आमच्या दोघांच्या मधात झोपून राहला. त्या रात्री नंतर परत कधी आमच्या रूमकडे आनंदने फिरकून सुद्धा बघितलं नाही. ती युक्ती कामी आली आमच्या.


घड्याळाचा काटा हळूच पुढे पुढे सरकत होता. मंद अश्या प्रकाशात रात्रीचे साडे अकरा वाजले हे दिसत होते. माझ्या बाजूचा बेड खाली होता. कारण रोहित हा सुट्टी असल्यामुळे गावाला गेला होता.

रूम मध्ये फक्त एकटा मी, काळजात भीतीने घर करावं तशी अचानक माझीच बनवलेली गोष्ट मला आठवली. ती गोष्ट आनंदला सांगून फक्त तीन दिवसच झाले होते.

माझ्या मनात परत परत एकाच विचारानी घोळ घातला होता. तसला काही प्रकार भूतकाळात घडला तर नसेल ना?

या विचारात असतांना अचानक स्टोर रूम चा दरवाजा आतून कोणी हळुच वाजवला. माझ्या हृदयाचे ठोके तर वाढले होते, पण हा आपला भास आहे हे समजून मी तो आवाज परत ऐकण्यासाठी स्तब्ध झालो.

तर बघतोतर काय तो आवाज खरच आतमधून येत होता. माझ्या हृदयाच्या ठोक्याचा आणि आतील आवाजात एक साम्य होते.

मी लगेच माझ्या रूम च्या बाहेर पळत सुटलो. माझ्या रूम लाच लागून स्टोर रूम होती. आणि माझ्या रूम मधूनच स्टोर रूम ला जाण्यासाठी मार्ग होता. म्हणजे माझी रूम आणि स्टोर रूम आधी जॉईंट रूम होत्या.

रूम बाहेर उभं राहून मी स्टोर च्या दरवाज्याकडे बघत होतो. मला माहित नसलेले बरेच देवाचे जप मी त्या वेळी करत होतो. आणि अर्ध माहीत असलेली हनुमान चालीसा मी म्हणत होतो.

तरी देखील माझी भीती कमी नाही झाल्यामुळे मी शेजारील रूम च्या मुलांना बोलवायला गेलो, तर ते पण गावलाच गेलेले होते.

marathi-horror-stories

दोन तास होऊन गेलेले,मी रूम बाहेर उभा. आनंद त्याच्या रूम वर होता. त्याला बोलवाच तर माझा मोबाईल रूम मध्ये बेड वर होता. त्याला कसा फोन करून बोलावू? रूम मधून मोबाईल कसा बाहेर आणायचा.?

या विचारातच मी मनाशी निश्चय केला आणि हळूच एक एक पाऊल टाकत मी रूम मध्ये शिरलो. शिरताच क्षणी मी लाईट चालू केला.

उजेडात मला मोबाईल आणि मोबाईल ला मी लगेच दिसलो.

मी क्षणाचा पण विलंब न करता मोबाईल पटकन उचलून बाहेर पळालो.

फोन आनंदला लावताच त्यांनी माझ्या रूम वर यायला नकार दिला. मी त्याला बराच समजावण्याचा प्रयत्न केला की मी तुला सांगितलेली गोष्ट खोटी आहे.

आजच्या दिवस झोपायला रूम वर ये.

परंतु समजावून सांगण्याचा काहीच फायदा नाही झाला. उलट तोच मला म्हणाला.

‘ गोष्ट खोटी आहे तर तू कशाला घाबरतो ? झोप एकटाच काही नाही होत.’

आनंदने पहिल्यांदा विचारपूर्वक व कामाचा बोलला. आणि ते पण माझ्या वाईट वेळेस.

रातीचे जवळजवळ तीन वाजले होते. मनाचा निश्चय करून आणि भूत ,आत्मा असला काही प्रकार नसतो हे स्वतःला सांगून, देवाचं नाव घेत घेत आत बेड वर जाऊन झोपलो.

रूम मधला लाईट चालू , रूमचा दरवाजा उघडा आणि डोळे उघडे करून लक्ष दरवाज्याकडे.

म्हणजे काही आवाज आला की सरळ रूम बाहेर पळत सुटायचं, हे माझं ठरलं होतं.

डोळे उघडे आणि तोंडावर देवाचं नाव हा प्रकार बराच वेळ चालला. अंगावर शहारे आलेले, डोळे लाल झालेले आणि अंगावर चादर घेतल्याने शरीर घामाने भिजलेल. कधी झोप लागली काही कळलं नाही.

अचानक दचकून उठलो. आणि हळूच चादर मधून एक डोळा बाहेर काळून बघितलं, आणि बघतो तर काय. फक्त माझा जीवच जायचा बाकी होता.

रूम मधला लाईट बंद आणि रूमचा दरवाजा पण बंद. आता बाहेर पडायला जागाच शिल्लक नव्हती.

डोळ्यावर परत चादर घेऊन देवाचे नाव घेत तेथेच थरथरत झोपलो. डोळा लागतो नि लागतो तर पक्ष्यांच्या किलबिलाटा ने मला जाग आली.

रात्रीच्या प्रसंगा मुळे मी पूर्णपणे हादरून गेलो होतो. माझ्या रूमच्याच बाजूनी रूम मालकाच घर होत. मला न राहून मी त्यांच्याकडे गेलो. आणि काकांना भीत भीतीच विचारलं.

‘काका……स्टोर रूम मध्ये काही आहे का?’ मी फक्त इतकच बोललो होतो. तर काकांच्या चेहऱ्यावर हसू आलं.

म्हणजे मला त्यांना काय म्हणायचे आहे हे लक्षात आले असेल का? या विचारात असतांनाच लगेच त्यांनी मला विचारले.

‘बोल तुला काय म्हणायचे आहे!

‘काका…अहो काल रात्री स्टोर रूम मधून दार ठोठावण्याचा आवाज ऐकू आला होता.’ माझे हे शब्द ऐकून काका परत हसले.

मला कळत नव्हते. काका का बरं हसत आहेत.

लगेच ते मला हसत हसत म्हणाले की.

‘ज्या रूम मध्ये तू राहतो आणि ते स्टोर रूम. तेथे आम्ही आधी राहायचो. त्या रूमलाच लागून जे दुसरं घर आहेत ना, ते आमचे नातेवाईक.

आमची आधी जॉइंट फॅमिली होती. परंतु काही दिवसांनी आम्ही स्वतःच घर घेऊन इथे राहायला आलो. आणि ते तेथेच राहतात.’ काका जे बोलत होते त्यातलं मला काहीच कळल नव्हतं. तरी पण मी पुढे लक्ष देऊन व डोळे बारीक करून ऐकत होतो.

‘त्यांच्या घरी एक मुलगी आहे, म्हणजे माझी पुतणी ती वेडी आहे. तिला वेड्याचा झटका आला की ती घरात भांडी फेकफाक करते व दरवाजा, भिंती याला लाता मारते.

आणि त्या घरातून स्टोर रूम मध्ये यायला एक कॉमन दरवाजा आहे तो आता बंद असतो. आणि तो जो तुला आवाज आलेला आहे तो तिने त्या दरवाज्याला आदडल्यानी आला आहे.’

परत मी विचार चक्रात अडकलो. आणि काकांना विचारलं.

‘मग त्याच रात्री का मला आवाज ऐकू आला.’ तितकाच बोललो, बास काकांना तर टोमणा मारायला संधीच मिळाली.

‘अरे ते कसं आहे! दिवस रात्र तुमचा गोंधळ चालतोना त्यामुळे कधी तुम्हाला आवाज ऐकू नसेल आला. परंतु त्या दिवशी तू एकटा आणि शांत होतास ना तर तुला ऐकू आला.’

‘मग काका रात्री माझ्या रूम चा दरवाजा कसा बंद झाला होता. आणि हो लाईट पण बंद होती ?

काका माझ्या या प्रश्नांनी परत हसायला लागले.

‘अरे बाळा रात्री मी लघवी करता उठलो होतो, तर मला दरवाजा उघडा, लाईट चालू आणि तू झोपलेला दिसला. तर मी लाईट बंद केला व दरवाजा बाहेरून ओढून घेतला.’

हे ऐकताच मी मनातल्या मनात म्हणालो.

‘ लाईट बिल ची चिंता होती तर फक्त लाईटच बंद करायचा होता, दरवाजा कशाला बंद केला. जीव जाताजाता राहला ना माझा.’


  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Marathi Story

1 Comment

Nitin Wasukar · 14/03/2023 at 4:46 pm

Mast story hoti…

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *