ऑनलाईन पैसे कमावण्याचे ८ मार्ग |online paise kamavnyache marg

ऑनलाईन-पैसे-कमावणे-माहिती-लेक

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग|How to earn online money in marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला घरी बसून ऑनलाइन पैसे कसे कमावण्याचे याबद्दल ७ सहज व सोप्पे मार्ग सांगणार आहे.

तुम्ही आपल्या फोनवर किंवा आपल्या कम्प्युटर वर सोशल मीडिया- फेसबुक, व्हाट्स अँप, ट्विटर, इन्स्टाग्राममध्ये व्यस्त असाल, आणि तुम्हाला वाटत असेल की, आपण ऑनलाईन पैसे कमवू शकू. तर ते खरं आहे!

तुम्ही हा लेख वाचताय! म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे आहे जसे की, मी कामावतोय…… तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. तर आज मी तुम्हाला अशा टॉप ८ ऑनलाईन पैसे कमावण्याच्या पद्धती सांगणार आहे.

जिथे तुम्ही काही तास काम करून दरमहा चांगले पैसे कमवू शकता, म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
नवीन शिकण्याआधी काही महत्वाची सूचना-

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला कुठलेही बेकायदेशीर प्रकाराने पैसे कमावणे शिकवत नसल्याकारणाने जे त्या विचाराने पोस्ट वाचण्यास आले असेल, तर त्यांनी कृपया करून परत जावे.

ज्यांना बेकायदेशीर पणे पैसे कमयायचे असेल, त्यांनी दुसरी इंटरनेट वर पोस्ट शोधावी जी त्यांना नाहीच भेटणार.

ज्यांची मेहनत घेण्याची तयारी असेल तसेच ज्यांच्यात संयम (patience) असेल त्यांनीच हे आर्टिकल पूर्ण वाचावे. अन्यथा बॅक जाऊ शकता.

तर आत्ता आपल्या महत्वाच्या मुद्दयावर येऊ…..ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग…..!

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की, आजच्या युगात एखाद्या व्यक्तीला सर्वात जास्त गरज असेल, तर ती पैसे मिळवण्याची व कमावण्याची.
या बाबतीत लोक काय करतात याची त्यांना सुद्धा कल्पना नसते, परंतु आजच्या इंटरनेट युगात अधिकाधिक लोक विशेषत: तरुण पिढी (माझ्यासारखी 😊) ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? याचा विचार करतात…(आढशी कुठले☺️)

काय करावे जेणेकरून घरी बसून पैसे कमवू शकू, असेच प्रश्न मनात पडतात. आणि आज जग इतके डिजिटल बनले आहे. त्यामुळे प्रत्येकाला घरी बसून ऑनलाइन पैसे कमवायचे आहेत. आपल्यालाही ऑनलाइन पैसे कमवायचे असतील आणि यासाठी तुम्ही अस्वस्थ आहात.

त्यामुळे आता तुम्हाला अजिबात नाराज होण्याची गरज नाही.

कारण आज या पोस्टच्या माध्यमातून मी तुम्हाला ऑनलाइन पैसे कैस कमवायचे संबंधित अशा ७ पद्धतींबद्दल सांगेन ज्याद्वारे आपण घरून काही तास काम करून ५०० ते १००० रूपये सहज मिळवू शकता.

तर चला तर मग आत्ता जास्त बडबड न करता सुरू करू…..

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे – Make Money Online in Marathi

◆ ब्लॉगिंग (blog) –

आपण सध्या कॉलेज मध्ये शिकत असल्यास आणि इंटरनेटवरून घरी काम करून इंटरनेटद्वारे पैसे कमवायचे असल्यास किंवा ब्लॉगिंगमध्ये करियर बनवायचे असल्यास. एक ब्लॉगर बनून पैसे कमावणे हा एक उत्तम मार्ग मानला जातो, परंतु ब्लॉगिंगमध्ये यश मिळवणे इतके सोपे नाही.

यासाठी मेहनत आणि संयम लागतो जे मी पोस्ट चालू होण्यागोदरच सांगितले आहे.

यासाठी डोमेन नेम, वेब होस्टिंग, एसईओ यासारख्या बर्‍याच गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, तर तुम्ही एक ब्लॉगर बनून पैसे कमवू शकता.

आपला ब्लॉग तयार केल्या नंतर आपल्याला दररोज एक पोस्ट लिहावे लागेल, ज्या विषयाबद्दल आपल्याला चांगले ज्ञान आहे त्याबद्दल लिहावे. कुणाचे पोस्ट कॉपी करू नयेत. पोस्ट स्वलिखित असावे.

नंतर आपल्या ब्लॉगवर दररोज बरीच रहदारी(ट्रॅफिक) येऊ लागेलं, म्हणजेच लोक आपला ब्लॉग वाचू लागतात, त्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जाहिराती लावून पैसे कमवू शकता.

यासाठी आपण गूगल अ‍ॅडसेन्स चा वापरू करू शकता.
ही माझ्या सगळ्यात आवळीची पद्धत आहे, ज्यामुळे मी पैसे कमावतो.

◆ यू ट्यूब (YouTube) –

इंटरनेटच्या वेगामुळे आज प्रत्येकाला यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे आवडते. गूगल वरून पैसे मिळवण्याचा हा देखील एक मार्ग आहे. यू ट्यूबर लाखो रुपये कमवत आहे. आणि गूगल वरून ऑनलाईन पैसे कमविण्याचा हा ट्रेंडिंग मार्ग आहे, जो आपण देखील वापरू शकता.

यूट्यूब बद्दल खास गोष्ट म्हणजे त्यातून पैसे मिळवू आणि तुम्ही प्रसिद्ध(फेमस) पण होऊ शकता. आपण ब्लॉगवर जसे मजकूर आणि फोटो वापरतो(जसे की, मी)

परंतु येथे आपल्याला YouTube वर व्हिडिओ लावावे लागतात. त्यानंतर तुमच्या यू ट्यूब चॅनेल वर ट्रॅफिक येईल नंतर तुमचे 1000 subscribers + 4000 तास विडिओ पाहल्यावर तुम्ही तुमच्या चॅनेल वर ऍड लावून पैसे कमवू शकता.

YouTube चॅनेल तयार करणे खूप सोपे आहे. परंतु मी तुम्हाला इथे देखील सांगू इच्छिता की, कन्टेन्ट स्वतःचे असणे आवश्यक आहे! दिवसाला भरपूर नवीन यू ट्यूब चॅनेल सुरू होतात तशीच बंद पण होतात.

तुमचा स्वतःचा कन्टेन्ट नसेल तर या पासून दूर राहा..! अजून आपली पोस्ट संपलेली नाही. तुम्हाला सूट होईल असं ऑनलाईन इनकम चा मार्ग तुम्हाला नक्कीच भेटेल.
तर पुढे चला…….!

online paise kamavnyache marg

ebook-माहिती-लेक

online earning marathi

◆ ई-बुक (e-Book) –

ई-बुकचा अर्थ इलेक्ट्रॉनिक पुस्तक, म्हणजे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि संगणक या इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे आपण वाचू शकतो. अशी पुस्तके एमएस वर्ड आणि नोटपॅड सारख्या सॉफ्टवेअरद्वारे लिहिली जातात.

जे सहजपणे कन्व्हर्ट केले जाऊ शकते. आणि पीडीएफ फाइलमध्ये वाचले जाऊ शकते. ऍमेझॉन किंडल हे ईबुक वाचण्यासाठी एक चांगले माध्यम आहे, जिथे आपण आपल्या स्मार्टफोनवर बर्‍याच पुस्तके वाचू शकता.

जर आपल्याला लिहायला आवडत असेल, तर आपण ई बुक लिहू शकता. आपण जेव्हा एखादे पुस्तक वाचतो तर त्यांना एका लेखकाने लिहिले असते, ज्याला आपण स्पर्श करू शकतो.आणि वाचू शकतो.

परंतु ई-बुक हे इलेक्ट्रॉनिक पुस्तक आहे जे लेखकाने लिहिलेले असते परंतु आपण त्यास स्पर्श करू शकत नाही परंतु ते पाहू आणि वाचू शकतो. आणि आपण एकाच वेळी बर्‍याच ई-पुस्तके आपल्याकडे ठेवू शकतो, आणि कुठेही सहजपणे नेऊ शकतो.

◆ एफिलिएट मार्केटिंग (Affiliate marketing) –

Affiliate Marketing मध्ये आपण कंपनीच्या उत्पादनांना प्रमोट(promote) करून पैसे कमावू शकतो.

जर कोणी आपल्या लिंक वरून उत्पादने विकत घेतले, तर आपल्यास 4% -12% पर्यंत कमिशन मिळू शकते. यासाठी आपल्याला विश्वसनीय कंपनीच्या वेबसाईट वर साइन इन करणे आवश्यक आहे.
(जसे की, ShareAsale, Amazon, eBay, Click bank इ.).

कारण या विश्वसनीय(Trusted Company’s) कंपनीचे उत्पादन कोणीही खरेदी करतो. Affiliate मधून पैसे कमवण्यासाठी, आपणास खालील स्टेप्स(steps) चे अनुसरण करावे लागेल. तर चला बघूया….

● सर्वात आधी Affiliate Products ला प्रमोट करण्यासाठी प्लॅटफॉर्मची निवड करणे आवश्यक आहे.

● ज्यामध्ये तुम्ही प्लॅटफॉर्म साठी वेबसाइट, ब्लॉग, ईमेल मार्केटिंग, फेसबुक, किव्हा YouTube इत्यादींपैकी कशाची पण निवड करू शकता.

● त्यानंतर affiliate program ची योग्य निवळ करावी. (Ex.- Amazon, Click bank इ.)

● नंतर त्यावर आपले अकाऊंट उघडून प्रॉडक्ट ची लिंक जनरेट करून ती आपल्या ब्लॉग किव्हा वेबसाईट वर टाकावी.

● जेव्हा कुणी तुमच्या वेबसाईट वर येऊन त्या लिंक च्या माध्यमातून काही खरीदी केल्यास तुम्हाला त्यातुन काही कमिशन मिळेल.

◆ फ्रीलांसर (Freelancer) –

फ्रीलान्सिंग हा घरातून काम करून पैसे मिळवण्याचा एक चांगला आणि फायदेशीर मार्ग आहे. यामध्ये तुम्ही एकाच वेळी बर्‍याच वेगवेगळ्या कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींसह भिन्न असाइनमेंट घेऊन आणि निर्धारित वेळ पूर्ण करुन त्यांना पाठवू शकता.

त्या बदल्यात संबंधित कंपनी, संस्था किंवा व्यक्ती आपल्याद्वारे केलेल्या कामासाठी आपल्याला पैसे देतात.

फ्रीलांसिंगची बरीच वैशिष्ट्ये आहेत जसे की,

● आपल्या आवडीच्या जागेवरुन काम करणे.

● स्वतः कामाचे वेळापत्रक निश्चित करणे.

● आपल्या कामाची किंमत स्वतः निश्चित करणे इ.

आज इंटरनेटच्या युगात तुमच्याकडे फ्रीलान्सिंगच्या बर्‍याच संधी आहेत.
तुम्ही ज्या क्षेत्रात परफेक्ट आहेत ते काम करून तुम्ही घर बसल्या पैसे कमावू शकता.

ब्लॉगिंग-माहिती-लेक

◆ ऑनलाईन ट्युटोरिअल / क्लास (Online tutorial /Class) –

ऑनलाईन ट्युटोरिअल/ क्लास हे घर बसल्या काम करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

जर तुम्ही एखाद्या विषयात चांगले ज्ञान असल्यास किंवा तुम्ही इतरांना चांगल्या प्रकारे शिकू शकता. तर तुमच्या साठी ही फील्ड उत्तम आहे.

तुम्ही देखील ऑनलाईन ट्युटोरिअल सुरु करून पैसे कमावू शकता.

ऑनलाईन क्लास घेण्यासाठी बरेचसे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अस्तित्वात आहेत. जसे की यू ट्यूब चॅनेल ज्याच्या साहाय्याने तुम्ही पैसे कमावू शकता.

◆ शेअर मार्केटिंग (share Marketing) –

शेअर (स्टॉक) मार्केट म्हणजे काय:-शेअर बाजार ही एक बाजारपेठ आहे, ज्यात कंपन्यांचे शेअर्स विकत घेतले जातात आणि विकले जातात.

लाखो लोक शेअर मार्केट मध्ये पूर्णवेळ नोकरी करतात. ज्यात ते कंपन्यांचे विश्लेषण(एनालिसिस) करतात आणि ज्या कंपनीचा हिस्सा कमी किंमतीत सापडला आहे अशा कंपनीचे ते शेअर विकत घेतात.

जेव्हा त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढते, तेव्हा ते विकून नफा मिळवतात.

ही पैसे कमावण्याची पद्धत खूप रिसकी आहे कारण शेअर बाजाराची माहिती नसल्यास या पद्धतीचा अवलंब करू नयेत. त्यासाठी मार्केट ची पूर्ण माहिती घेऊनच शेअर विकत घ्यावे.

याच पद्धतीची मिळती जुळती पद्धत आहे, ज्याचं नाव आहे म्युच्युअल फंड(mutual fund).
यामध्ये मी माझे पैसे इन्व्हेस्ट करतो. कारण हा पैसे कमावण्याचा खूप सरळ व सोप्पा उपाय आहे. तर जाणून घेऊया म्युच्युअल फंड( mutual fund) बद्दल.

◆ म्युच्युअल फंड (Mutual fund) –

म्युच्युअल फंडामध्ये बर्‍याच गुंतवणूकदारांचे पैसे एका जागी जमा होतात. आणि या फंडामधून पुन्हा बाजारात गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंड मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (एएमसी) व्यवस्थापित करतात.

प्रत्येक एएमसीमध्ये सहसा अनेक म्युच्युअल फंड योजना असतात.

जेव्हा आपण यात एकत्र पैसे भरू नाही शकल्यास त्यासाठी पण एक योजना आहे- SIP

हो SIP म्हणजे systematic investment plan

ज्यामध्ये तुम्ही महिन्याच्या महिन्या ५०० रुपयांपासून पैसे जमा करून पैसे इन्व्हेस्ट करू शकता. या पद्धतीसाठी सरकार टिव्हीवर ऍड पण चालवतात.

“म्युच्युअल फंड सही है….!”

फक्त म्युच्युअल फंड मध्ये पैसे निवेश करण्याआधी थोडी माहिती घ्यावी!
म्युच्युअल फंड म्हणजे काय…?

आशा आहे की, या पोस्ट मुळे तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याची महत्वाची माहिती मिळाली असेलच.

अश्याच छान छान माहिती साठी माहिती लेक ला भेट देत राहा.

धन्यवाद!

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *