डोक्यात केमिकल लोचा झाला म्हणजे काय?

dokyat-chemical-locha

डोक्यात केमिकल लोचा झाला म्हणजे काय?

सर्वात मोठी केमिकल ची फॅक्टरी कोणती असेल, तर ते आपला मेंदू.
बरेच लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेलच.
“याच्या डोक्यात केमिकल लोचा झाला.”
बर हा केमिकल लोचा नक्की असतो काय…?
ते आज आपण जाणून घेऊया…!

आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल असतात. म्हणूनच तर मी आधी म्हटलं की सर्वात मोठी केमिकलची फॅक्टरी कोणती असेल, तर आपल डोकं (मेंदू) आहे.

आपल्या मेंदूत हे चार सर्वात मोठे केमिकल आहे. जे आपल्या वागणुकीवर परिणाम करतात.

mind

१) Endorphine (एंडोर्फिन)
२) Oxytocin (ऑक्सिटोसिन)
३) serotonin (सेरोटोनिन)
४) Dopamine (डोपामाइन)

चला तर मग याबद्दल आपण एकएक करून माहिती घेऊया!

१) Endorphine (एंडोर्फिन):- यामुळे आपला थकवा दूर होते. आपल्याला आनंदीत, उत्साहित तसेच उर्जात्मक वाटण्याचे कारण पण हेच केमिकल आहे. हे खूप महत्वाचे केमिकल (रसायन) आहे. यामुळे आपण कठीण आणि नवीन गोष्टी करण्यास प्रेरित होतो.

२) Oxytocin (ऑक्सिटोसिन):- यामुळे प्रेम भाव व सामाजिक बंध टिकून ठेवण्यास मदत होते. तसेच लैंगिक पुनरुत्पादन, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरच्या काळात भूमिका बजावतो. कोणासोबत संवाद साधताना हे केमिकल आपल्या मेंदूत तयार होत.

३) Serotonin (सेरोटोनिन):- यामध्ये सुरक्षा, शांतता, आनंद आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होते. अनुभूती, शिक्षण, स्मृती आणि असंख्य शारीरिक प्रक्रियेत सुधारणा करते. याच्या कमतरतेमुळे आवेगपणा,वेडेपणा आणि कमी आत्मविश्वासाची लक्षणे आढळून येतात.

४) Dopamine (डोपामाइन):- हा केमिकल आपल्याला आनंद मिळावा म्हणून काही करण्यास प्रवृत्त करतो. जसे की दारू पिल्याने आपल्याला आनंद मिळतो, तर या केमिकलमुळे आपल्याला नशा करावा वाटतो. यामध्ये आपल्याला प्रेम भावना, नशा, आनंद, आत्मविश्वास यासर्व प्रकारचे मिश्रण असत. हे केमिकल मेंदू आणि शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

आत्ता या केमिकल मधला सर्वांचा बाप म्हटलं तरी चालेल तो आहे. डोपामाइन (Dopamine) या केमिकल मध्ये सर्वच केमिकल चे मिश्रण असत. यामुळे तर आपल्याला प्रेम करावे वाटत, नशा करावासा वाटत, भांडण करावंसं वाटत.

nerve-cell-1

तुम्ही कधी love at first sight अनुभवलं का?

बघताच क्षणी कुणाच्या प्रेमात पडणं. तो Dopamine चा कमाल आहे.
म्हणून तर आपले मित्र आपल्याला कधी कधी म्हणतात. याच्या डोक्यात बहुतेक केमिकल लोचा झालं. याचा सायंटिफिक अर्थ तर त्यांना माहीत नसतो, पण आपल्या वागणुकीतुन त्यांना जाणवत.

कधी आपण प्रेमात असतो, तर कधी रागात, तर कधी आनंदात, तर कधी भांडणाचा मूड मध्ये. हा सर्व प्रकार Dopamine मूळ होतो.

तुम्हाला सांगायचं इतकंच होत की केमिकल लोचा नक्की काय असतो. यालाच आपल्या गावरान भाषेत केमिकल लोचा असे म्हणतात..!

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment