नमस्कार, वाचकांनो
माहिती लेक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या वेबसाईट ला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.! या आर्टिकल मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत, मराठी लव्ह शायरी (Marathi Shayari for Love) या मराठी लव्ह कविता तुम्हाला नक्कीच आवडेल यात काही शंका नाही.!

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय.!

कितीही भांडण झाली तरी,
तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा कितीही
ताणला तरी तुटत नाही

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
सांगताच येत नाही.

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा,
त्यातील जीव आहेस तू

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

प्रेम म्हणजे कधी उन्हात
पडणारं अप्रतिम चांदणं
प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी
उगाचच भांडणं

गालावर खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी.!
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी.!

गोड आठवणी आहेत  तेथे
हळुवार भावना आहे,
हळुवार भावना आहेत तेथे
अतुट प्रेम आहे, जिथे अतूट प्रेम आहे
तेथे नक्कीच तू आहेस

तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या Status मधला पहिला शब्द वाच मग
कळेल

पहाटेचा वारा खूप काही सांगून गेला,
तुमची आठवण येत आहे, असा निरोप देऊन गेला

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं Smile उमटवून जायची.

प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.

नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.!
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये.!

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना,
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना

तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.

जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलय
जरा प्याला निरखून तर बघ त्यावर तुझच नाव कोरलय

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.

Love Shayari Marathi

आयुष्यात एक कळलं,
एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं..
कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

आपली काळजी करणारी
आपल्याला समजून घेणारी
व्यक्ती भेटायला नशीबच लागत… ,
नाहीतर फक्त “प्रेम” करणारे ढिगाने पडलेत

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

प्रेम केले मनापासुन पण
कधीच तिला ते समजले नाही
सुखी ठेव देवा तु तिला
तिचे दुःख पण मला पाहवत नाही

ये प्रिये, रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही

असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे..!
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे..!
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का.!

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

तु जर खरंच
माझा Topic असता ना,
तर तुला कधीच Change
केला असता..
पण तु माझी Life आहेस,
And I Can’t
Change My Life ????

जगावे असे कि मरणे अवघड होइल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

जर आयुष्य असेल तर,
तुझ्या सोबत असू दे.
आणि
जर मृत्यू असेल तर,
तुझ्या अगोदर असू दे.

“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

“तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून” ? भांडत जाऊ.

“प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”

तुझ्या कडे थोड प्रेम उधार आहे,
अग वेडे तु एकच तर माझा जीवनाचा आधार आहेस.!

तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार!

“तिचं? ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे?
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे?”

प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही,
कारण तुझ्याशिवाय माझं मन,
ुसर्‍या कुणात रमलेच नाही

लिहीता लिहीता पेनाची शाई संपूण गेली ..
अर्धवट लिहीलेल्या आयुष्याच्या कथेला पुर्ण विराम देऊन गेली

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

गणपतीच्या मंदिरात प्रसादला
असते मोदकाची गोडी..
बाप्पा सुखी ठेव,
आमच्या दोघांची जोडी

वेळ आपली असेल तर सगळेच आपले असतात…
वेळ आपली नसेल तर आपले सुध्दा आपले नसतात

एका चुकीमुळे संपत ते प्रेम,
आणि
हजार चुका माफ करत ते खरं प्रेम.

काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी,
आयुष्यातील संकटावर मात करायला,
तुझी साथ पाहीजे.

प्रेम असं करा ज्यात साथ फेरे घेतले
जातील स्क्रीनशॉट नाही.

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”

कळत नाहिये नेमकं चुकीचं काय आहे मी,
माझा स्वाभाव, की माझी वेळ

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सांगना…
आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
एकदा तरी तू भावना जाणना…”

हजारों चेहरे बघितले मी,
लाखों चेहरे बघणार,
एक वेळ स्वतःला विसरेन मी,
पण तुझा चेहरा नाही विसरणार.

ऐक तुच ‘आहेस जिच्या नावाचं
Notification बघुनच मनाला
सुकून मिळतो.!

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

भांडण करूनही जी व्यक्ती तुम्हाला
मनवण्याची क्षमता ठेवते,
तीच व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा
जास्त प्रेम करते..!

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी

त्या व्यक्तीवर प्रेम करता,
त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिका.
कारण
विश्वास हीच एक गोष्ट नात टिकवून
ठेवू शकते.

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

“मंगळसूत्र “घातल्यावर फक्त शरीरावर
हक्क मिळतो
मनावर हक्क मिळवण्यासाठी
वेड्यासारख प्रेम करावं लागतं.

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

कुणीच कुणाचा नसतो साथी,
देहाची आणि होते माती,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
कशाला हवी ही खोटी नाती.

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे

प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा

मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

“कोणाच्याही आयुष्यात
आपली एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची
पण ती कधीही
बदलणारी नसावी”

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत

जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
हृदयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय

बोलणे बंद केल्याने कोणाला
विसरता येत नाही प्रेम करणाऱ्या,
हृदयात असणाऱ्या, जिवलग व्यक्तीला
आपण जगापासून लपवू शकतो
पण मनात येणाऱ्या आठवणी पासून नाही.

तुझ्याशिवाय जगणं आता मला नाही जमत
तुझ्याशिवाय मन माझं कुठेच नाही रमत

ह्या पडणाऱ्या पावसात
तुझ्या सोबत भिजु वाटतं..
पण तु आजारी पडशील म्हणूनच
तुझ्या सोबत भिजायला मन माझं घाबरतय

तिच नकळत मला चोरुन बघणं पण
मनाला एकदम वेड लावुन जात

ह्रदयात येऊन बघ अजून
त्याला तुझीच गरज आहे…!
तू गेल्यानंतरही त्यात
तुलाच प्रेमाने जपत आहे…!

मुलींना Look Smart असलेला
Boyfriend नाही तर
Loving heart असलेला
Life Partner हवा असतो

ह्रदय फ़क्त तडफडतय ना ,
फुटले तर नाही ?
आयुष्याचे रंग ,
विटले तर नाही ?

येवुन मिठीत आज म्हणाली
तुझ्या शिवाय काही सुचत नाही
तूच हवास जवळ सारखा,
मनाला दुसरं काही रुचत नाही.

हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी
चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे
ठेवून गेलंय….

आभाळावाणी विशाल हृद्य तुझे,
फुलपाखरावाणी चंचल मन तुझे,
आरशात पाहता प्रतिबिंब तुझे,
आरशा हि लाजे पाहून रूप तुझे.

हळूच दबक्या पावलांनी ,
तुझ्याकडे मी यायचं…
आणि तूला ते दरवेळी ,
आधीच कसं गं कळायचं ?

तिच्या सोबत असताना
मी तिचाच होऊन गेलो…
तिच्या सोबत नसताना मात्र
मी माझा सुद्धा नाही रहिलो…

ह्रदय माझं हल्ली थोडं
वेड्यासारखं वागतं
तू ह्रदयात असतेस तरीही
बाहेर शोधायला लागतं

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

हातात धरलेलं पाखरु अवचित सुटावं..
तसा जीव सुटतो देहातून….
कोणी त्या क्षणांची वाट बघतं..
कोणी धास्ताऊन जात मनातून

ला माहित आहे का Jaanu की मी काय चुकी केली..?
तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली

होण्या फुलपाखरु सुरवंटाचे
नेहमीच सदभाव दाखविला…
पण ज्याने-त्याने स्वबुद्धिने
दुषणांचा मज़ डाग लाविला…

ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय
काहीच मागत नाही…
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही…

ह्रदयात एक जखम
आजही सळत होती…
आठवण तुझी, का?
मलाच छळत होती…

हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला

हरणे तर नसते कुणातही
असतो तो खेळ नियतिचा,
कधी सुखातं हसू तर कधी
दु:खातं मनाला रडवण्याचा.

हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी,
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी

हातात पेन घेतले आणि तुझ्यावर
काही लिहूयात म्हंटले….
चारोळीत लिहायला घेतले पण,
चार पानांतही कमी पडले….

ही भेटच नाही तर फक्त
एक माझी आठवण आहे,
हे फक्त शब्दच नव्हे, यात
विचारांची साठवण आहे.

हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे…

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *