चांगले आणि खरे मित्र नशिबाने मिळतात. आणि ते सुद्धा कमीत कमी लोकांना मिळतात. हे एक असे नाते आहे, ज्याची बरोबरी आपली सख्खी नाती सुद्धा करू शकत नाही. आपण मित्रांसोबत खूप वेळ घालवतो, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो. तुमच्या जवळच्या मित्रांपैकी कोणाचा वाढदिवस येत असेल आणि तुम्हाला काही खास मेसेजद्वारे तिला/त्याला खास वाटावे अशी इच्छा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.


पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा


आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,
पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,
ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मित्र ****,
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !


अशी एखादी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही स्वतः असू शकता,
ज्याच्याशी तुम्ही निरर्थक संभाषण करू शकता,
कोणीतरी जो तुम्हाला विचित्र असूनही तुम्हाला आवडतो,
कोणीतरी जो तुम्हाला वाढदिवसाची भेटवस्तू विकत घ्यायला विसरतो
म्हणूनच मी हे घेऊन आलो आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या जिवलग मित्रा!


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी
अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून
यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना 


मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो
तुमच्या भविष्याचा विचार करतो आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद
!!हॅपी बर्थडे मित्रा!!


चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत


साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो
अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो
ज्यांना कधी ओळखत हि नसतो
त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या थोडा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा


कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो
आयुष्याच्या या नवीन वाटेवर
तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो


केला तो नाद झाली ती हवा
कडक रे भावा तुच आहे छावा
भावाची हवा आता तर DJ च लावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा


आज देवाला हात जोडूणी आपल्यासाठी
मी एकच मागणी मागतो की
हे देवा माझ्यासाठी या अनमोल व्यक्तिमत्वाला
आजच्या सुवर्णदिनी असंख्य आनंदाने भरलेला समुद्र द्यावा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 


आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी
प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी
देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की
आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे
शिखरे यशाची सर तुम्ही करावी
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


 नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा


लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला


आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच
पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे


काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला


आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि
किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही
वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते.!
प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा


आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,
पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,
ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मित्र ****.
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !


मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि
सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *