बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा|Birthday wishes in Marathi for Sister

आयुष्याच्या छान प्रवासात काही मोजकेच लोक असतात, जे आपल्या चांगल्या वाईट काळात सोबती असतात. सहसा ते रक्ताच्या नात्याने संबंधित असतात.

बहीण सुद्धा त्यापैकीच एक आहे, लहान असतांना पासून ते वृद्धापकाळापर्यंतच्या आपल्या प्रवासात बहीण सुख-दुःखाच्या जोडीदाराप्रमाणे सर्व प्रसंगी आपल्यासोबत असते.

Birthday wishes in Marathi for Sister

Sister Birthday Wishes in Marathi

अश्याच प्रेमळ, भांडखोर, चुगोलखोर बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत. या Birthday wishes in Marathi for Sister म्हणजेच बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला अवश्य आवडतील, यात काही शंका नाही! चला तर बघूया..!

तिमिरात असते साथ तिची,
आनंदात तिचाच कल्ला असतो.
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम माझ्या बहिणीचा सल्ला असतो.
!!दीदी आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

काळजी रुपी तिचा धाक,
अन् प्रेमळ तिची साथ.
ममतेने मन ओलेचिंब,
जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब.!
!!ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या,
परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने
आणि
खंबीरपणे मला साथ देणाऱ्या,
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!

आभाळा एवढी माया,
प्रेमळ तिची छाया,
ममतेने ओथंबलेले बोल,
तर कधी रुसवा, धरून होई अबोल,
आई चे दुसरे रूपच जणू,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई,

ताई, जगात मला सर्वाधिक प्रिय आहेस तू
माझा जीव, श्वास अन् प्राण आहेस तू
आई, बाबानंतर माझ्याकडे
एकमेव अशी लाखात एक आहेस तू..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तायडे

ये ताई
आकाशात तारे आहेत, तेवढे आयुष्य असो तुझे!
कोणाची नजर ना लागो, नेहमी आनदी जीवन असावे तुझे!
!!.हॅप्पी बर्थडे सिस्टर.!!

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल!
मी स्वतःला खरंच भाग्यवान मानतो.
आज तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला माझी प्रार्थना आहे.
की
तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो.!
की
नेहमी सुख समृद्धीने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.!

कधी भांडते, तर कधी रूसते
परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
माझ्या ताईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

प्रिय बहीण,
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो,
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो,
दीदी तुला वाढदिवसाच्या मनः पूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

सोन्याहून सुंदर माझ्या बहिणीचा मुखडा.!
बहीण माझी माझ्या काळजाचा तुकडा.!
माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.!

बहीण असते,
खास
तिच्याशिवाय जीवन आहे,
उदास
कधी नाही बोललो,
पण सर्वाधिक प्रिय आहे
मला माझ्या बहिणीची
साथ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

प्रत्येक दिशा जगण्याची उमेद देवो आपणास,
प्रत्येक क्षण
आणि
प्रत्येक दिवस आनंद देवो आपणास,
उजाळणारी पहाट
आणि
उगवणार सूर्य,
दररोज फ्रेश
आणि
तरोताजा अनुभव देवो आपणास,
दीदी आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

हजारो नाते असतील,
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा,
सोबत असते ते म्हणजे बहीण
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या लाडक्या बहिणीला,
आणखी एक वर्ष जीवंत राहल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी बर्थडे खडूस

तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा आणि अभ्यास कर,

हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी,
माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो
तरी मनाने फक्त आणि फक्त
एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत.
फक्त भांडणे होई पर्यन्त
हॅप्पी बर्थडे डुकरे

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी,
नेहमी बाबांना नाव सांगणारी,
पण वेळ आल्यावर नेहमी,
आपल्या पाठीशी उभी राहणारी,
बहिणच असते.
अशा क्यूट बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लोक विचारतात एवढ्या,
संकटातही कसा हसतो ?
मी म्हटलो जग सोबत राहो न,
राहो माझी बहीण तर सोबत आहे ना.
माझी बहीण माझा आधार!
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई!!

बाबांची परी ती अन्
सावली जणू ती आईची
कधी प्रेमळ कधी रागीट
ही कविता आहे माझ्या ताईची
छोटी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परंतु ओय हीरो, म्हणणारी
एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे तायडे

कधी हसणार आहे..!
कधी रडणार आहे..!
मी सारी जींदगी माझी..!
तुला जपणार आहे..!
हॅप्पी बर्थडे ताई

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
!!दीदी आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!

तू केवळ माझी बहीणच नाहीस
तर एक चांगली मैत्रीण आहेस.
तुझ्यासारखी बहिण माझ्याकडे असण्याचा
मला अभिमान आहे.
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईची लाडकी
आणि
पप्पांची परी आहेस तु,
माझ्यावर प्रेमाचा सतत वर्षाव,
करणाऱ्या सरी आहेस तु,
हॅप्पी बर्थडे ताई

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो!
परंतु
ताई तू माझ्यासाठी नेहमीच परफेक्ट आहेस.
तुझ्यामुळे माझे आयुष्य खूप सुंदर बनले आहे.
नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
!.हॅप्पी बर्थडे ताई.!

माझ्या मनातलं गुपित मी
कोणलाही न सांगता ओळखणाऱ्या
अश्या माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिण नावांची व्यक्ती थोडी अत्याचार करणारीच असते.
गोड बोलून आपल्या मनातलं सगळं काढून घेते
आणि
मग योग्य वेळी आपल्याच शब्दांचे शस्त्र बनवून,
आपल्यावरच वार करत असते.
अर्थात तिचे म्हणणे असते की,
तू हार मान भाऊ नाहीतर
मी, आई, पप्पा ना तुझे सेक्रेटस सांगेल बघ,
मला सगळं माहित आहे.
आणि
तिला कुठ माहीत की, तिचे सेक्रेटस पण माझ्या जवळ आहेत,
माझ्या नटखट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुला छोटी असे नाव मिळाले असले
तरी तुझ्या मनाचा आकार कधीही
कमी झालेला नाही.
तुझ्या जवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी

सुंदर अन प्रेमळ तिचे बोल,
दिसायला गोंडस बाहुली जणू,
साथ तिची लाभे प्रत्येक पावली,
बहीण माझी दुसरे रूप,
की जणू माझी माऊली,
!.हॅप्पी बर्थडे ताई.!

कधी चूक होता,
माझी ताई बाजू माझी घेते.
गोड गोड शब्द बोलून,
शेवटी फटका पाठी देते.
!.हॅप्पी बर्थडे ताई.!

सागरासारखी अथांग माया भरलीय,
तुझ्या हृदयात,
कधी कधी तर तू मला आईच वाटतेस,
माझ्या भावनांना केवळ तूच समजून घेतेस,
हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी,
खंबीर होऊन बळ देतेस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
हॅप्पी बर्थडे छोटी

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

दिले आहे तू भरपूर प्रेम,
याशिवाय आणखी काय सांगू,
आयुष्यभर बहीण भावाचे नाते असेच राहो,
या व्यतिरिक्त आणखी काय मागू..!
!.हॅप्पी बर्थडे ताई.!

बहीण घरात असली की,
घरात आई असल्यासारखच वाटत,
भावाच्या काळजीपोटी वेळोवेळी,
तिचं मन दाटतं,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

आमच्या चेहऱ्यावर नेहमी,
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या,
माझ्या छोट्या बहिणीला वाढदिवसाच्या ट्रक भर शुभेच्छा.!

नशीबवान लोकांनाच,
एक मोठी बहीण
आणि
बहिणीच्या रूपातील दुसऱ्या,
आईचे सनिध्य लाभते.
!.हॅप्पी बर्थडे ताई.!

बहीण ही एक अशी व्यक्ति असते.!
जी तुम्हाला समजून घेते.!
तुमची व तुमच्या भावनांची काळजी करते.!
आणि तुम्हाला खूप सारे प्रेम करते.!
ताई तू जगातील सर्व बहीणीं पैकी बेस्ट बहीण आहेस!

बहिणीपेक्षा चांगला मित्र नाही
बहिणीपेक्षा चांगला प्रशंसक नाही
बहिणीपेक्षा चांगला टिकाकार नाही
तुझ्यापेक्षा चांगली बहिण या
जगात नाही ,
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा हा दिवस आनंद आणि
उत्साहाने परिपूर्ण होवो
ताई आजच्या यादिवशी मी
तुझ्यासाठी एक उत्कृष्ट
आणि
शानदार वाढदिवसाची देवाकडे प्रार्थना करतो
!!.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!

हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी बहिणच मदत करते
जसे की धैर्य, अपेक्षा, हास्य आणि घरातील वस्तु
ताई आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान
पँकेज आहेस आणि लहान असलीस
तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान व्यक्ती आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शेमडे

कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले तरी जवळ घेतलेस मला
कधी रडवलंस कधी हसवलसं
तरीही केल्या माझ्या तू पुर्ण सर्व इच्छा
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा
प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु
माझ्यासाठी माझा आदर्श
नेहमी तूच राहिली आहेस.
दीदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची,
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस,
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या वेदनेवर मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाच कारणआहेस तू,
काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू?
ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बहिण भावाचे नाते
हे हृदयाशी जोडलेले असते,
त्यामुळेअंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करु शकत नाही
दीदी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होत.
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं
आता वय झालयं
उगाच माझ गिफ्ट वाया गेल असतं म्हणून
यावर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या
हॅप्पी बर्थडे खडूस

बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात
आणि तू माझ्यासाठी एखाद्या
परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड
परीसारख्या बहिणीला
!!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

तू माझी छोटी बहिण असली तरीही
याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण
हॅप्पी बर्थडे ताई

मी तुला कधी सांगितले नाही परंतु
माझ्या आयुष्यातील तुझी उपस्थिती
हे माझ्यासाठी खूप भाग्याचे आहे.
खूप खूप धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल!
दीदी, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!

आम्ही आशा करतो कि, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Sister Birthday Wishes in Marathi) हि पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेलच.

अश्याच प्रकारचे इतर वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes in Marathi) तुम्हाला तुमच्या प्रियजनांना पाठवायच्या असतील तर, या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.!


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment