बाप ही देवाने आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे. वडील हे आपल्या मुलांचे भाग्य निर्माता आहेत. वडील आपल्या मुलांसोबत गुरू, भाऊ आणि मित्राची भूमिका बजावतात. कुटुंबाची काळजी घेणे ही वडिलांची जबाबदारी असते. मूल आपल्या वडिलांना खरा हिरो मानतात. जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद देण्याचे काम फक्त बापच करू शकतो.

त्याच बापाला आमच्या टीम तर्फे शत शत नमन..!

वडील स्टेटस मराठी \ Fathers Day quotes in marathi

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही

आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील

तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते

आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो
जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो

माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
आणि
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.

कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत
आणि
त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय

स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो.
तो म्हणजे बाबा

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात

तुम्हीही कितीही मोठे झालात
तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे
तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाप

बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण

आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात

बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत

एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
तो म्हणजे बाप

आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला
Miss you Baba

बापाची संपत्ती नाही,
तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते.

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं

देवाने सर्व काही दिलं आहे,
अजून काही मागावं वाटत नाही.
फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना

माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेळात वेळ काढून कायम कर्तव्य पूर्ण केले
तुमच्यासाठी मी माझा जन्म वाहीन हे माझं वचन आहे तुम्हाला

मी कधी मोठी झालेच तर,
त्यात केवळ तुमचा महत्वाचा वाटा आहे.
याची मला पूर्ण जाणीव आहे.

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा!

बाप हा असा व्यक्ती आहे.
जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही.
त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.

कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही,
जो माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो.

हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच व्यक्ती ती म्हणजे बाबा

आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल,
पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच.!

इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही
माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे.

मुलगी झाली असं म्हणून तोंड फिरणाऱ्यांना दिली तुम्ही चपराक
कायम दिली मला साथ
कधीही न फिटणारं ऋण आहे तुमचं माझ्यावर

मुलगी असले तरीही मला योग्य दिशा दाखवलीत
आणि
कायम माझा आदर केलात याबद्दल धन्यवाद बाबा

प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते
परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते,
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी कुठेही गेले,
कितीही लांब गेले,
तरी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर कायम बाबाच असतील.

स्वप्नं तर माझी,
पण ती साकारण्याची ताकद दिली.
तुम्हीखंबीरपणे उभे राहिलात,
माझ्या पाठिशी,
तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा.

माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला
आणि
शेवटचा हिरो तुम्हीच असाल बाबा
Happy Fathers Day

सर्व आनंद आणि प्रेम तुम्हाला मिळो याच सदिच्छा

अशी एक वेळ होती,
जेव्हा मी तुम्हाला ओळखू शकले नाही.
पण प्रत्येक क्षणी माझ्या चुका पोटात घालून तुम्ही मला माफ केलंत.
आज मी जी काही आहे तुमच्यामुळेच आहे आणि यासाठी मी जन्मभर ऋणी राहीन.

तुमच्या घरात मी जन्म घेतला
आणि
तुम्ही माझे वडील आहात याचा मला सार्थ अभिमान आहे.

तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही घेतलेली काळजी आणि तुम्ही दिलेले प्रेम
याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही बाबा
Happy Fathers Day

बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो.

बाप असतो
तेलवात जळत असतो
क्षणाक्षणाला हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला!

बाबा जेव्हा बरोबर असतात
तेव्हा आयुष्यातला प्रत्येक आनंद आपल्यासह असतो.

फणसासारखे माझे बाबा.
वरून काटेरी पण आत मिळतात रसाळ गरे.
माझ्या बाबाला फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.

फादर्ड डे आमचा रोजच असतो.
कारण आमचे बाबा आमच्या घरातील सर्वात प्रिय व्यक्ती आहेत.
तरीही आज पुन्हा एकदा जागतिक फादर्स डे च्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

लग्न होवो, मुलीला मुलं होवो पण वडिलांसाठी ती नेहमी छकुलीच असते.

डोळ्यांत कधीही अश्रू न येणाऱ्या,
पण मनात नेहमी आमच्यासाठी काळजी करणाऱ्या,
बाबांना आजच्या जागतिक फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही मला नेहमी मुलासमान वागवलंत.
कधीच कोणत्याही गोष्टीला नकार दिला नाहीत.
अशा माझ्या देवासमान वडिलांना मी खूप मिस करते.

सासरी गेले तरी ओढ माहेरची आहे.
कारण माझे वडील माझे दैवत आहेत.
मिस यू बाबा

आज मी तुमच्यापासून दूर परक्या शहरात
आणि
परक्या घरात आहे पप्पा.
पण तुमची प्रिन्सेस आजही तुमच्यावर तेवढचं प्रेम करते.

माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे

मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा

बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे.!
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे.!

आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात
आणि
तुम्ही माझे हिरो आहात
happy fathers day

कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर


हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *