मराठी जोक।Funny jokes in marathi

टेन्शन मोकळे करायचे आहे..? तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात..! हि पोस्ट खास तुमच्या साठी आहे. आम्ही यामध्ये मराठी जोक चा संग्रह बनवलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही हसा आणि दुसऱ्यांना पण हसवा..!

funny-joke.

मराठी जोक – Marathi jokes…!

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा:- बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..!
आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत..!

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
Channel वर म्हैस दिसते.
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक
बायको: अय्या….सासूबाई..!

नवरा:- आज आपण बाहेर जेवू गं..!
बायको:- अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा:- हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप:- बेटा, दारू पितोस का..?
योगेश-: ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू..!

बॉस:- ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या:- ते ABP माझा वाले सांगत होते. कुठे ही जाऊ नका! पाहत रहा ABP माझा.

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..!
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.

शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.

बायको:- अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
नवरा:- एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते..!

तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए..!
ती म्हणाली, “ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते, तू ये जिन्याने..!”

आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल..!
चिंटु :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग..?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला.

बाबा:- “चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..!”
चंप्या:- “तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो..!

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते. तो म्हणजे..
फोटोग्राफर

तीन उंदीर गप्पा मारत असतात,
पहिला उंदीर:- मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..!
दुसरा उंदीर:- मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो..!
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो.
पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला..?
तिसरा उंदीर म्हणतो, आलोच मांजरीचा किस घेऊन..!

शिक्षक:- उशीर का झाला शाळेत यायला..?
चिंटू:- आई बाबा भांडत होते..!
शिक्षक:- त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध..?
चिंटू:- माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता..!

मी तिला बोललो ….I LOVE U
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मैंने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा..!
OLX पे बेच दे।

ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान
बाळाचे लंगोट बदलत असते.
शहरी बाई:- हग्गीस नाही का..?
गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस..!

लहान मुलगा:- आज्जी…नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी:- आशीर्वाद….सावकाश पळ रे बाबा..!

जो नेहमी हसत असतो त्याला
HAS MUKH म्हणतात…
आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला
HUS BAND म्हणतात.


funny jokes in marathi / फनी जोक मराठी


आई:- बेटा तू केस का कापत नाही..?
मुलगा:- फॅशन आहे आई..!
आई:- गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय लहान मुलगी पसंद आहे म्हणून, आता जा नांदायला..!

एक मैत्रीण:- तु खुप बोर झाल्यावर काय करतेस..?
दुसरी:- मस्तपैकी मॉलमध्ये जाते. मन भरेपर्यंत शॉपिंग करते.
आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते..!

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको:- काय आहे?
नवरा:- या २ वायरांपैकी एक जरा धर,
बायको:- हं धरली,
नवरा:- काही जाणवलं का..?
बायको:- नाही,
नवरा:- अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…!

काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस
My dad is my real hero
मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का..?

बायको :- अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा :- हो सांग ना,
बायको :- मी गरोदर आहे,
नवरा :- अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का?
बायको :- कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…!

जोशी:- मी इथले टॉयलेट वापरू का?
नेने:- हो, पण पैसे पडतील
जोशी:- नाही पडणार, बसताना काळजी घेईन मी.

वडील :- अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो!!
मुलगा :- आता ते शक्य नाही, बाबा..!
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय..!

बायको :- जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता..!
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..!
मग आज असं काय झालं की, तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात..!
नवरा :- आज मी “स्प्राईट” पिलोय, “सिधी बात नो बकवास”

बायको:- माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..!
नवरा:- बरं..पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील..!

एका मुलीने, आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला.
आपलं लग्न होवू शकत नाही, कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..!
मुलगा मॅसेज वाचुन खुप दुःखी होतो आणि रडायला लागतो.
२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॅारी… सॅारी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला..!

हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर
तुमचे पैसे वाचू शकतील..
फक्त तिला म्हणा कि,
बोल जाडे! आज काय खाणार?

नवरा बायकोचं भांडण चालु असतं.
नवरा:- तु स्व:तला आवर नाही तर माझ्या मधला जनावर बाहेर येईल
बायको:- हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!

एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने):- आता काय हवंय?
मुलगी:- बारीक पिनचा चार्जर..!

बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,
बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी..!

बँक मधून मुलीला फोन आला,
तुम्हाला Credit Card पाहीजे का?
मुलगी:- नको माझ्याकडे Boyfriend आहे.

husband wife jokes in marathi / फनी जोक

सरदार:- डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही,
काय करू?
डॉक्टर:- रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल.

गुरुजी:- गण्या, मी तुला कानफटीत मारली. ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या:- जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार..!

एका मैत्रिणीने Hi पाठवलं. मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे..? मी रीप्लाय दिला.
२ ट्युब लाइट, १ फॅन, १ टीव्ही
१ मोबाइल अणि तु
डायरेक्ट ब्लॉक केलं ना राव..!

केमिस्ट:- तुम्हाला किती वेळा सांगितलं, डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या..!
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?

चिंटुः- आई परी आकाशात उडते का गं..?
आईः- हो..!
चिंटु:- मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात..?
आईः- अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का..?
चिंटुः- पण बाबा तिला तर परी म्हणतात.
आईः- हो का! मग उद्या उडेल ती बघच तु..!

बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना!

तिचा फोन आला, खुप अकडुन ती म्हणाली.
विसरुन जा मला..!
मी म्हणालो, आधी नाव तरी सांग कोण आहेस तु..?

नवरा:- जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको:- अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश.
नवरा:- २० रुपयांची लागली आहे. हे घे १० रूपये आणि चल निघ.

धर्मेंद्रच्या घरी एक माणूस
चोरी करत असतो,
धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो…कमीने..!
चोर:- हो रे बाबा, कमीच नेतोय.

मुलगी :- नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा
मितवा…!
मुलगा :- ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा
कितवा…?

लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे..?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला ‘खाऊ’ बोलणारी मुले,
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.

शिक्षक:- उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.
पप्पू:- ओके सर..पण जरा झणझणीत बनवा..
मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.

एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो, गूरूजी कानमंत्र सांगतात..?
रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
तर फक्त !! हरि ओम !! म्हणायचं..!
म्हणजे लक्ष विचलित होणार नाही..!
थोडे अंतर चालल्यावर एक जन !! हरि ओम !! म्हणतो.
लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ?
“कुठंय कुठंय”

एक मुलगा देवाला विचारतो,
“तिला गुलाबाचं फूल का आवडतं..?
ते तर एका दिवसात मरून जातं..!
मग तिला मी का आवडत नाही..?
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”..!
देव उत्तर देतात,
भारी रे…!
एक नंबर…!
Whatsapp वर टाक..!


जोक मराठी / marathi jokes sms


!!आजचा उपदेश !!
जर कोणी आपल्याला पाहुन दरवाजा बंद केला तर,
आपण पण त्याला दाखवुन द्यायचे, की दरवाज्याला दोन कड्या असतात.

मोलकरीण:- बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले,
बाईसाहेब:- माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण:- आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब…
मी त्याला All Out पाजले आहे..!

दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं…
त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,
कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..!

तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला..!
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही..!

बायको:- साबुदाणा वडा बनवू का तुम्हाला?
नवरा:- नको मी माणूसच ठीक आहे,
आली मोठी जादुगरीन !

गांधीजी म्हणाले, दारू सोडा आणि पाणी प्या.
तेव्हापासून लोक तिन्ही एकत्र करून पितात.
नीट वाचा..!

BF:- मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF:- अय्यां… खरंच.. का रे?
BF:- कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे..!

जर आपली बायको, माहेरी जातांना, शेजारच्या बायकांना सांगून जात असेल की,
ताई जरा लक्ष ठेवा! तर समजून जा, तुम्ही CCTV च्या निगराणीत आला आहात.

लव्ह मॅरेज मध्ये आपण आपल्या प्रेयसी बरोबर लग्न करतो,
आणि अरेन्ज मॅरेज मध्ये आपण दुसऱ्याच्या प्रेयसी बरोबर लग्न करतो..!

आजोबा :- बन्या जरा माझी कवळी आन.
बन्या :- अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!
आजोबा :- माहितीये रे…!
समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे..!

उंदराची टोळी तलवार घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघ विचारतो अरे का धावता?
उंदीर चल सरक बे तिकडे,
हत्तीच्या आयटमला कुणीतरी प्रपोस केला,
अन नाव आमच्यावर आले..!

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो.
ताई, फक्त तुच का रडत आहेस..!
दाजी का नाही रडत..?
वडील:- बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल..! मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील…!

असं म्हणतात की जिथं एकदा,
विश्वासघात होतो तिथं पुन्हा जाऊ नये,
पण काय करणार, सासरवाडीत पुन्हा जावंच लागतं.

बायको: तुम्ही सारखं सारखं माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता?
जे काय बोलायचं ते मला बोला..!
नवरा: हे बघ टीव्ही खराब होतो, तेव्हा आपण टीव्ही ला काही बोलतो का?
शिव्या तर कंपनीलाच देतो ना..!

!..ह्याला म्हणतात बदला..!
मी तिला ३-४ वेळा फोन केला पण तिने उचलला नाही..
नंतर तिला एकच Message केला.
“Balance” आला का..?
१००० ला १००० Full Talk Time!
तिने आत्तापर्यंत २० वेळा फोन केला पण मी उचलला नाही…!


जोक मराठी / marathi joke latest


मुलगा :- आय लव्ह यू
मुलगी :- नाही मी दुसऱ्यावर प्रेम करते..!
मुलगा फुल्ल नाराज होतो आणि अचानक काही वेळाने जोरात पळू लागतो.
मुलगी विचारते काय झालं रे..?
मुलगा :- थांब तुझ्या आईला जाऊन सांगतो..!
मुलगी :- इकडं ये कुत्र्या… आय लव्ह यू टू.

मी रात्री उशिरा घरात शिरलो आणि बेडवर पाठ टेकताच.
ती म्हणाली, दारू पिऊन आलात ना..?
मी म्हणालो, खरं आहे.पण तू कसे काय ओळखलेस..?
ती हसुन म्हणाली, तुमचे घर बाजूचे आहे.

दुकानदार :- बोला साहेब काय पाहिजे?
ग्राहक :- होणाऱ्या बायकोच्या कुत्र्या साठी केक पाहिजे,
दुकानदार :- इथेच खाणार कि पॅक करून देऊ…!

मी एका हॉटेल मध्ये एकटा बसलो होतो,
तिथे एका मुलीने जवळ येऊन विचारले,
‘तू सिंगल आहेस का?’
मी मनातल्या मनात खुश होऊन बोललो, ‘हो…’
माझ्या समोरची रिकामी खुर्ची
घेऊन गेली ना राव ती…!

गणू :- पप्पा जरा कारची चावी दया ना कॉलेज ला जायचंय..!
पप्पा :- कॉलेज ला जायला कारची काय गरज..?
गणू :- काय नाय पप्पा, २० लाखाच्या गाडीतून जाऊन जरा हवा करायचीय..!
पप्पा :- हे घे २० रुपय, ५० लाखाच्या बसमधून जा, म्हणजे वादळ येईल वादळ.

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली.
मैत्रिणीने मला विचारलं, “मुलं बाळं काय?”
मी म्हणालो “हो दोन आहेत.
पहिलीला एक अन दुसरीला एक..!”
मैत्रीण जागेवर बेशुद्ध
परत नीट वाचा…!

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली,
तिने त्याला धू धू धुतला.
अगदी लोळवला
तो कपडे झटकत उठला..
आणि म्हणाला.तर मग मी नाही समजू का..?

आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की..
जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो,
पुरी दे रे अजून..!

बाबा :- झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे,
झम्प्या :- एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो..!
झम्प्या Item चे फोटो उडवतो.
सर्व मुलींचे मेसेज आणि Number Delete करतो,
आलेले Call Delete करतो,
Memory Card Format मारतो.
बाबा :- आभारी आहे. घड्याळ बंद पडले ना,
फक्त Time बघायचा होता.

पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे,
तर
सासू आणि सुनेची जुळली पाहिजे,
संसार सुखाचाच होईल…!
मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो..
बिच्चारा…!

डॉक्टर म्हणाले, ३-४ महिने नॉनव्हेज आणि दारू बंद करा,
वाईट वाटलं, पण इलाज नव्हता ,शेवटी मनाची
तयारी केली आणि डॉक्टर बदलला.

आज ती म्हणाली,
मला स्वयंपाक येत नाही
मी म्हणालो ,
लग्नाआधी का नाही सांगितलं ?
तरी ती म्हणाली तुला सरप्राईज द्यायचं होतं..!

परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात,
भारतीय मुकाट्याने !

marathi comedy jokes / marathi chutkule

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिट हात हलवत होती.
मग मी पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली.
ती खिडकीची काच पुसतेय..?

आयुष्य खूप Boring झालं देवा,
उचल एकदाच
आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर..!

ती मला हे सांगून सोडून गेली,
कि मला दुसरा भेटला आहे.
अरे त्या वेडीला कोण समजावणार
तो दुसरा अकाउंट पण माझाच आहे.

गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल,
तर तीन बायका एका तासांत किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही. कारण,
ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.
गुरूजी : शाब्बास..!

पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला.
एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो.
तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?
पप्पूची बायको :- मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.

बायको: माझी एकअट आहे!
नवरा : काय?
बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार.
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

नवरा बायको एकत्र चहा पिताना बघूनच
वाघ बकरी हे नाव कंपनीला सुचलं असावं.

हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे, माझ्यासाठी काही नको.
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते.

गंपू :- तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना? मग पत्र का पाठवलंस?
झंपू :- आधी फोनच केला होता. पण एक बाई सारखी सांगत होती,
‘प्लीज ट्राय लेटर’!

बायको :- काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा :- बहिणीशी
बायको :- अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा :- अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय..!
बिचारा नवरा तेव्हापासून बायकोकडे मोबाईल मागतोय.

सासुरवाडीच्या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे म्हणजे,
फुकटात CCTV बसवल्या सारखे आहे.

बंड्या :- बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील :- देवानं दोन पाय कशाला दिलेत..!
बंड्या :- एक किक् मारायला, न् एक गिअर बदलायला.
लय हानला.!

bhayanak marathi jokes / marathi jokes new

बाबा :- काल रात्री कुठे होतास?
मुलगा :- मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा :- रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा :- काय ?
बाबा :- तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या.

बायको : देवा, जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू दे.
नवरा : अरे वा ! इतका आवडतो मी तुला..?
बायको : नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार..?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार..?

डॉक्टर: घाबरू नका देशपांडे…खूप छोटं ऑपरेशन आहे.
पेशंट: थँक यू डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही.
डॉक्टर: मला माहीत आहे… देशपांडे माझं नाव आहे.

एक प्रेगनंट बाई पुरुष डॉक्टर कडे जाते.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना..?
बाई (लाजून) : इश्य !, आठवा.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू? तुम्हीच आठवा..!

विवाहित पुरुषांचं पोट वाढण्याचा कारण
मित्रांन सोबत पोट भरून पार्टी केल्या नंतर
बायकोच्या भीतीने घरी जाऊन परत जेवण करणे.

गृहस्थ :- काय रे, तुझी आई कशी आहे?
मुलगा :- बरी आहे.
गृहस्थ :- बहिण कशी आहे?
मुलगा :- बरी आहे.
गृहस्थ :- अच्छा, मग बाबा तर बरेच असतील?
मुलगा :- नाही. बाबा एकच.

मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते
आणि लिहिले होते एक्स्चेज ऑफर.
राजू बराच वेळ ते बघत होता.
ते बघून काकु ओरडल्या चला ऑफर फक्त मिक्सरची आहे.

पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी :- का मारता आहात मुलाला..?
पुणेकर :- अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.
शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना.
पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात.


marathi jokes / funny jokes in marathi


नवरा :- प्रिये, आज चहा असा बनव
कि तन मन डोलायला लागेल.
बायको :- दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही.

चेहरा काळा असेल तर क्रीम लावतात
आणि जरा कर्म काळे असेल तर
मोबाईलला पासवर्ड लावता.

आज पेपर मध्ये जाहिरात होती..
एक साडी घ्या व 50% वाचवा
मी पेपरच फाडला व 100% वाचवले.

ज्योतिषी: तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे.
गण्या: ज्योतिषी काका पण कुंडली मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?

मी: Hey Dad Wassup??
पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे?
मी: Ok ठीक आहे..
मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का?
पप्पा: हे काय असतं आता?
मी: Hotspot हो पप्पा..
पप्पानी Spot Hot होईपर्यंत धुतला.

वडील :- इतका मार खातोस रोज,
तुला राग येत नाही का रे माझा..?
मुलगा :- येतो ना…!
वडील :- मग काय करतोस तू राग आल्यावर..?
मुलगा :- मी संडास घासतो…!
वडील :- संडास घासून राग कसा काय शांत होतो….?
मी संडास तुमच्या टूथब्रश ने घासतो…!
मुलाला संडासात घालून हाणला.

एक पोलीस पोलीस स्टेशन मध्ये फोन करतो,
पोलीस स्टेशन :- हा बोला..!
पोलीस :- साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन झालाय..! इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला,
पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणुन गोळी घातली.
पोलीस स्टेशन :- मग तुम्ही तिला अटक केली का नाही..?
पोलीस :- नाही साहेब, फरशी अजून वाळली नाही…!

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻