मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

मैत्रीण एक अशी व्यक्ती आहे. कि तुम्ही बिनदिक्कत तिला सर्व काही सांगू शकता. खरी मैत्रीण कधीही तुमची गुपिते सर्वांसमोर उघड करत नाही. जीवनातील कोणतीही आपत्ती किंवा संकट दूर करण्यासाठी विश्वासू मैत्रीण औषधाप्रमाणे काम करते. यामुळेच विश्वासार्ह मैत्रिणीला नेहमीच जीवनासाठी उपयुक्त औषध मानले जाते. खरी आणि विश्वासू मैत्रीण संकटाच्या वेळीच ओळखता येते. संकटकाळात सदैव साथ देणारी मैत्रीण हि खरी आणि विश्वासू मैत्रीण असते. अश्याच खास मैत्रिणीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, काही खास कविता.!

मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता


सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात,
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..!
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी
असणारी बेस्ट friend तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..,
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा
हॅप्पी बर्थडे बेस्टी!


तुझा सहवास माझ्यासाठी किती मौल्यवान आहे,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..!
तुझ्या प्रेमाचा हात असाच माझ्या पाठीवर राहू दे..!
भरभरून यश तुझ्या पदरी पडू दे..!
आपल्या मैत्रीचे कौतुक जगभर पसरू दे..!
हा वाढदिवसाचा सोहळा असाच येऊ दे..!


सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या
मैत्रीणीसाठी.
Many Many Happy Returns Of The Day Bestii!


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा
तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला
खूप समजून घेतलेस…,
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मैत्रीण!


लहानपणापासून ची आपली ही मैत्री,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…


व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझ्यासारखा चांगली आणि काळजी
घेणारी मैत्रीण मिळाल्याचा
मला खूप अभिमान वाटतो.
कृपया नेहमी माझ्यासोबत रहा.
मी आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला
!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुझ्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…


शाळेच्या पहिल्या दिवशी तू मला
अनोळखी मानून life मध्ये आली,
एक दिवस लक्षात आले तू तर
माझी मैत्रीण झालीस..,
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो,
मैत्रीचे नाते हे पक्या मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या मैत्रिणीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो
हीच प्रार्थना करते


जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा


मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून,
भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत
तसे स्विकार करते.
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल
परमेश्वराचे धन्यवाद


जीवनाच्या खडतर वाटेवर कायम तुझी सोबत मिळाली
सुख अन दुखाच्या काळात कायम मला तुझीच आठवण आली
तुझ्या असण्याने आनंदाची कळी खुलली
तुझ्या नसण्याने एकांताची दरी मी अनुभवली
प्रिय मैत्रीण तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment