सिबिल स्कोअर बद्दल संपूर्ण माहिती

सिबिल स्कोअर (Cibil score) म्हणजे काय? – Cibil score meaning in marathi

तुम्हाला माहीत आहे का CIBIL Score म्हणजे काय? जेव्हा मनुष्य त्याचा गरजा ह्या त्याने कमावलेल्या पैश्यान मधुन पूर्ण नाही करू शकत. तेव्हा तो या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक वर अवलंबून राहतो. तिथून तो लोण घेतो आणि प्रत्येक महिन्याला तो त्याचा EMI भरतो. परंतु कोणतीही बँक किंवा वित्तिय संस्था तुम्हाला तसे लोण देत नाही.

तुम्हाला लोण देण्याआधी बँक तुमचे वित्तीय व्यवहार तपासते आणि त्या वित्तीय व्यवहारा वर तुम्हाला लोण मिळेल किंवा नाही हे अवलंबून राहते. जर तुम्ही हा विचार करत असाल की मला लोण का नाही मिळणार.

तुम्हाला लोण मिळणार की नाही हे तुमच्या CIBIL Score वर अवलंबून राहते. याच CIBIL Score मुळे बँक ला महिती होते की तुम्हाला किती लोण द्यायचे की जे तुम्ही परत करू शकणार.

तर चला माहिती करून घेऊ की CIBIL Score म्हणजे काय? आणि याचा अर्थ काय आहे? लोण घेण्यासाठी सिबील स्कोअर का महत्त्वाचा आहे? आणि तो कसा चेक करायचा?

cibil score in marathi

Cibil score meaning in marathi

Image Source – dialabank.com

CIBIL Score म्हणजे काय | Cibil score meaning in marathi

CIBIL चा फुल फॉर्म Credit Information Bureau of India Limited असा होतो. ही संस्था तुमची संपुर्ण क्रेडीट history ठेवते. तुम्ही जर कोणत्याही वित्तीय संस्थे सोबत कधी व्यवहार केला असेल किंवा कोणते लोण घेतले असेल त्याची सर्व माहिती या संस्थे जवळ राहते.

आणि ते परत केले नसेल तर तुमचे सर्व वित्तीय व्यवहार पाहून एक रिपोर्ट तयार होतो. ज्याला CIBIL score किंवा Credit Score म्हंटले जाते. हा Score लोण परत करण्याच्या क्षमते वर आधारित राहतो.

ही संस्था लोन च नाही तर वित्तीय संस्थेशी जुळलेल्या सर्व लोण Home loan, Personal loan, Credit card सारख्या आणखी सेवान वर हे लागू होते. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या Credit कार्ड चा वापर केला असेल किंवा त्याचा बिल च पेमेंट केलं असेल. तर ते बिल तुम्ही किती दिवसात भरले. कोणतही होम लोण बँक मधून घेतलं असेल तर ते कशा प्रकारे भरलं गेलं. ते वेळे वर भरलं की नाही. या प्रकारचे सर्व व्यवहार CIBIL Score तयार करण्यासाठी वापरले जातात.

CIBIL ही एक Credit Score देणारी कपनी आहे. जे RBI च्या देखरेख खाली काम करते व RBI च्या नियमांचे पालन करते. हे संस्था 2000 साली चालु करण्यात आली या कंपनी चे Head office मुंबई मध्ये आहे.

ही कंपनी भारतातील सर्व वित्तीय संस्थेला जोडलेली आहे. ही कंपनी दर वर्षी आपला डेटा बेस update करते. Credit information act 2005 च्या नियमांखाली ही कंपनी काम करते.

Credit Score चेक करनाऱ्या कंपनी

भारतात या तीन मोठ्या Credit Score चेक करनाऱ्या कंपनी आहेत.

1) EQUIFAX (या कंपनीची सुरवात 2010 मध्ये झाली.)

2) EXPERIAN (या कंपनीची सुरवात 2006 मध्ये झाली.)

3) CIBIL (ही खूप जुनी कंपनी आहे. या कंपनीची सुरवात 2000 साली झाली.)

आपला क्रेडिट Report कसा पहावा?

तुम्ही जर बँक मध्ये लोण घ्यायला गेले, तर ते बँक तुमचा Credit Score थोड्याच मिनिटात चेक करतात. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सर्व बँक अकाऊंट ला जोडले गेले आहेत. पॅन कार्ड वरून तुमचा CIBIL Credit Score report तयार होतो.

या रिपोर्टनुसार त्यांनाच लोण मिळेल, ज्यांचा Score 750 च्या वर राहतो. तर तुमचा Score तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता. या करिता तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टी काळजी पूर्वक कराव्या लागतील.

1) तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये कोणत्याही CIBIL Score च्या वेबसाईटवर जायचं आहे.

2) त्या नंतर तिथे एक फॉर्म येईल. त्यात काही माहिती भरायची आहे. जसे तुमचा आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, पत्ता, मोबाईल नंबर, इत्यादी. (यामध्ये पॅन कार्ड ची माहिती देणे अनिवार्य आहे.)

3) या नंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार. तुम्ही कधी कोणते लोण घेतले का? सर्व माहिती दिल्यावर थोड्याच वेळात तुमचा Credit report तुम्हाला दिसून जाणार.

4) तुम्ही तुमच्या जवळपास च्या बँक मध्ये जाऊन तुमचा credit score पाहू शकता. याचे ती बँक काही पैसे घेऊ शकते.

CIBIL Score किती असायला पाहिजे?

Cibil score meaning in marathi

what is cibil score in marathi

Image Source – cardexpert.in

बँकांनी credit score ची रेंज ही 300 पासून ते 900 पर्यंत ठेवली आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर हा 300 असेल, तर हा चांगला स्कोर नाही किंवा 600 असेल, तर हा खूप चांगला स्कोर आहे असं काहीच नाही. याच महत्त्व वेग वेगळ आहे.
यावरून तुम्ही समजू शकता की जेवढा तुमचा सिबील स्कोअर चांगला असेल तेवढाच तुमच्यासाठी चांगलं आहे. सर्व वित्तिय संस्था त्यांची लोण संबंधित सर्व माहिती CIBIL जवळ सामायिक करतात. म्हणून तुमचा क्रेडिट रिपोर्ट कुठेही सारखाच येईल.
काही गोष्टी ला आपण थोडं संक्षिप्त मध्ये समजून घेऊया..!

1) तुमचा क्रेडिट स्कोअर 300 च्या खाली असेल, तर बँक या गोष्टी ला अधिक असुरक्षित समजतात. तुमचा क्रेडिट स्कोअर एवढा असेल, तर तुम्हाला बँक कोणत्याच प्रकारचे लोण देत नाही.

2) 450 ते 600 चा क्रेडिट स्कोअर असेल, तर बँक याला एक सामान्य क्रेडिट स्कोअर समजतात. हो या स्कोअर मध्ये तुम्हाला लोण मिळण्याचे चान्स जास्त परंतु कमी लोण मिळेल. हा थोडा चांगला स्कोअर मानला जातो.

3) जर तुम्ही तुमचे लोण वेळे वर परत करता. तर बँक तुम्हाला 600 ते 900 अशा स्कोअर मध्ये ठेवते. या स्कोअर नुसार बँक तुम्हाला लोण जास्त देईल सोबतच व्याजा मध्ये काही सूट सुद्धा देऊ शकते. या करिता तुम्हाला तुमचे लोण वेळे वर परत करणे गरजेचे आहे.

CIBIL Score कसा सुधारावा..?

1) तुम्ही घेतलेले लोण वेळेवर भरा. लोण ची EMI वेळेच्या आधी भरायचा प्रयत्न करा. तुम्ही जेवढी late EMI भरणार तेवढा तुमचा Credit Score खराब होत जाणार.

2) बँक च्या लोण वर अवलंबून राहणे कमी करा. जेव्हा अति आवश्यकता असेल तेव्हाच लोण घ्या आणि ते वेळेत परत करा.

3) तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरात असाल, तर एकच क्रेडिट कार्ड वापरा. काही लोक क्रेडिट कार्ड वर व्यवहार करतात. असे व्यवहार करणे टाळा. क्रेडिट कार्ड चा चुकीचा व्यवहार तुमचा Credit Score कमी करू शकतो.

4) एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे बिल वेळेवर भरा.

5) काही लोक बँक वर खूप विश्वास ठेवतात. त्यांना वाटते की आपले व्यवहार बँक सोबत चांगले आहेत. परंतु अस करू नका. आपले व्यवहार स्वतः तपासून पहा. बँक कर्मचारी तुमचे पैसे व्यवस्थित भरत आहे. यामध्ये काही त्रुटी आहे का ते तपासा. Credit report चेक करत रहा. त्या मध्ये आलेल्या त्रुटी दूर करत चला.

6) एका पेक्षा जास्त लोण एक वेळेस घेऊ नका.

7) सर्व लोण व्यवस्थित settled करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला NOC मिळेल. जे तुमच्या कडे लोण संपूर्ण Nil केल्याचे proof राहील.

8) गरजे पेक्षा जास्त लोण घेऊ नका. आपल्याला जेवढ्या लोण ची गरज आहे तेवढाच लोण घ्या.

9) लोण व्यवस्थित परत करण्यासाठी long term लोण घ्या. ज्यामुळे तुमची EMI कमी येईल. ज्यामुळे तुम्हाला भरतांना काही अडचण येणार नाही. (लक्षात ठेवा लॉंग टर्म लोण मध्ये व्याज जास्त जाणार)

CIBIL स्कोर कसा तयार केला जातो?

what is cibil score in marathi

cibil score in marathi

Image Source – cardexpert.in

CIBIL Score तुमच्या मागच्या व्यवहारावर अवलंबुन असतो. चला तर बघूया की CIBIL Score कसा तयार करतात.

1) मागील वित्तीय व्यवहार

तुमचा मागचा वित्तीय व्यवहार म्हणजेच तुम्ही आधी घेतलेले लोण कशा प्रकारे परत केले, किती दिवसात परत केले, तुमचा लोन परत करण्याचा ग्राफ कसा होता. या सर्व गोष्टी पाहिल्या जातात.

2) एका पेक्षा जास्त लोण घेऊन त्यावर अवलंबून राहणे

अस तर नाही, की तुम्ही फक्त लोण वर अवलंबून राहत आहे. Home loan, Car Loan आणि सोबतच तुम्ही क्रेडिट कार्ड चा सुद्धा वापर करता. या व्यतिरिक्त आणखी लोण तुम्ही बँक कडून घेतले आहेत. CIBIL Score ठरवताना हे सर्व बघितले जाते व यानुसार तुमचा Credit Score ठरतो.

हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

धन्यवाद… 😊

  • धिरज तायडे

हे वाचलंत का? –


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment