Symptoms Of Psychotic Disorder

Psychotic Disorder : जसे शरीराचे स्वास्थ सुरळीत असणे आवश्यक असते, त्याच प्रमाणे मानसिक स्वास्थ चांगले असणे खूप गरजेचे आहे. परंतु आजकाल जी जीवन शैली आहे, त्यानुसार लोकांना खूप साऱ्या तणावातून जावे लागत आहे.

जे लोक व्यावसायिक तसेच जॉब पेशा मध्ये आहेत. त्यांची मानसिक स्थिती इतर लोकांपेक्षा तणावग्रस्त आढळून येते. जीवनात असे काही प्रसंग येतात, ज्यामुळे मानसिक स्वास्थ बिघडते.

एखाद्या व्यक्तीवर खूप ताण किव्हा स्ट्रेस असेल तर, त्या व्यक्तीच्या डोक्यावर जो परिणाम होतो. त्याला वैदकीय भाषेमध्ये साइकोटिक डिसऑर्डर असे म्हणतात.

आज च्या आर्टिकल मध्ये आपण या बिमारीवर बोलणार आहेत. साइकोटिक डिसऑर्डर मध्ये व्यक्तीला स्वतःवर झालेला परिमाणाचा अंदाज नसतो. या स्तिथीत तो व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर विचलित राहतो. आपल्या सोबत काय होत आहे, या गोष्टीचे त्याला भान नसते. या परिस्थितीतून बाहेर येण्याकरिता उपचार देखील करावा लागतो. या प्रकारातील मानसिक आजाराचे कारण तणाव असतो.

साइकोटिक डिसऑर्डर कश्यामुळे होतो?

व्यक्तीमधील वाढत असलेले तणाव हे या आजाराचे मुख्य कारण आहे. आजकालची अनहेल्दी आणि अव्यवस्थित जीवन शैलीमुळे व्यक्तीच्या डोक्यावरील ताण चे प्रमाण वाढते. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. काही कारणांमध्ये जर डोक्याला आधी इजा झालेली असेल, तरी दिखील हा आजार होऊया शकतो. या आजरामध्ये व्यक्तीला व्यवस्तिथ झोप सुद्धा लागत नाही.

साइकोटिक डिसऑर्डर ची लक्षणे (Symptoms Of Psychotic Disorder)

हा आजार एखाद्या व्यक्तीला झाला असेल, तर सर्वात आधी मोठा फरक दिसून येतो. या केस मध्ये व्यक्ती भ्रम मध्ये दिसतो. काही काही केस मध्ये तो व्यक्ती प्रमाणाच्या बाहेर स्वतःला निराशेमध्ये ढकलतो. असा व्यक्ती स्वतःच्या तब्बेतीवर लक्ष देत नाही. आपल्या तब्बेतीबद्दल तो निष्काळजीपणाने राहतो. हि लक्षणे साइकोटिक डिसऑर्डर मध्ये आढळून येतात.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *