ऑलिव्ह तेलाचे फायदे । Olive oil in Marathi

ऑलिव्ह फळ आणि ऑलिव्ह तेल बद्दल आपल्याला माहिती असेलच..? जेव्हा आपण ऑलिव्हच्या झाडाच्या फळातून तेल काढतो, तेव्हा आपल्याला ऑलिव्ह तेल (Olive Oil) मिळते. लोक ऑलिव्ह तेल हजारो वर्षांपासून वापरत आलेले आहेत आणि पुढे सुद्धा वापरात राहतील यात काही शंका नाही! कारण ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त तेल आहे.

ऑलिव्ह तेलाचे आरोग्यासाठी फायदे आणि त्या तेलाचा घरातील स्वयंपाकात उपयुक्ततेमुळे, घराघरामध्ये ऑलिव्ह ऑइल हे प्रसिद्ध आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात बर्‍याच प्रकारे वापरले जाते.

ऑलिव्ह ऑईलला ऑलिया युरोपिया (Olea Europaea) असं म्हणतात. तसेच भारतात हिंदी भाषेत याला जैतून (jatun oil) असे म्हटले जाते. तर मराठी भाषेत ऑलिव्ह तेलाला नाव नसल्यामुळे याला ऑलिव्ह तेलच (olive oil meaning in Marathi) म्हणता येईल.

तुम्हाला माहिती आहे का? प्राचीन काळी ऑलिव्ह तेल इतके लोकप्रिय होते की, त्याला ‘लिक्विड गोल्ड’ म्हणजेच ‘तरल सोने’ असे म्हटले जायचे, कारण ह्या तेलाचे फायदे काही कमी नाहीत.

जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल, तर ऑलिव्ह ऑईलबद्दल माहित असणे आवश्यक आहे. आजकाल बहुतेक शेफ त्याच्या वापराची शिफारस करतात. हे फक्त एक स्वयंपाकघरातील खास घटक नाही, तर त्याचे फायदे बरेच आहेत ज्याबद्दल आपण खाली सविस्तर बघणार आहोत.

हे वाचलंत का? –
* एरंडेल तेलाचे शरीरासाठी आश्चर्यकारक फायदे आणि नुकसान
* क्विनोआ म्हणजे काय?

ऑलिव्ह तेल म्हणजे काय..? (olive oil in Marathi)

olive oil in Marathi
olive oil in Marathi

ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह फळापासून तयार केले जाते. ऑलिव्ह ऑईल हे स्वयंपाकासाठी, सौंदर्यप्रसाधनांसाठी, औषधांच्या निर्मितीमध्ये, साबण तयार करण्यासाठी आणि पारंपारिक दिवे लावण्यासाठी म्हणून वापरले जाते. ऑलिव्ह ऑईलचा वापर जगभरात जवळजवळ सर्वत्र केला जातो. परंतु भूमध्य सागरी प्रदेशात त्याचा वापर जास्त होतो.

ऑलिव्ह ऑइलमध्ये चरबीयुक्त ऍसिड असतात. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. मधुमेह रोग्यांसाठी ऑलिव्ह तेल खूप फायदेशीर आहे. शरीरातील साखरेचा (शुगर) चे समतोल राखण्यासाठी याची विशेष मदत होते.

ऑलिव्ह तेल हे आरोग्यासाठी सर्वात चांगले खाद्यतेल आहे. या तेलाचा वापर केल्याने हृदयरोग आणि मधुमेहासारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. या दोन आजारांशिवाय या तेलाचा नियमित वापर केल्यास इतरही अनेक आजारांशी लढायला मदत होते.

तज्ञांच्या मते भूमध्य सागरी देशांमध्ये हृदयरोगी आणि मधुमेहाची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ऑलिव्ह ऑईलचा वापर, तेथे नियमित खाद्यतेल म्हणून या तेलाचा वापर केला जातो. इतर देशांच्या तुलनेत या देशांच्या लोकांचे सरासरी वयही जास्त आहे.


ऑलिव्ह ऑईलचे प्रकार (Types Of Olive Oil In Marathi)

  • एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (Extra Virgin Olive Oil)
  • व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (Virgin Olive Oil)
  • शुद्ध किंवा ब्लेंडेड ऑलिव्ह ऑईल (Pure Or Blended Olive Oil)
  • रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल (Refined Olive Oil)
  • पोमास ऑईल (Pomace Oil)

१) एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (Extra Virgin Olive Oil)

इतर ऑलिव्ह तेलांच्या तुलनेत हे खूप महाग तेल आहे. परंतु एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल हे बाकी ऑलिव्ह तेला पेक्षा चांगले तेल आहे. त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि मिनरल चे प्रमाण इतर ऑलिव्ह तेलांपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये ऍसिड चे प्रमाण कमी आहे.

कोल्ड प्रेस तंत्राचा वापर करून ऑलिव्ह ऑईलचा हा प्रकार तयार केला जातो. जो आपल्या शरीरासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो.

जर ते तेल स्वयंपाक करतेवेळी कमी आचेवर शिजवले असेल, तर ते जळू शकते. म्हणून, त्यात स्वयंपाक करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु आपण त्याला सलाद, भाज्या किंवा इतर पदार्थांमध्ये वापरू शकतो.

२) व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल (Virgin Olive Oil)

हे ऑलिव्ह तेल स्वयंपाक करण्यासाठी वापरले जाते, त्याकारणाने हे तेल खूप लोकप्रिय आहे आणि त्यामध्ये ऍसिड चे प्रमाण देखील कमी आहे. तसेच हे तेल तयार करण्यासाठी कोणतीही रसायने वापरली जात नाहीत.

व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडा फरक आहे. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे तळण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही. परंतु व्हर्जिन ऑलिव्ह तेलाचा वापर स्वयंपाक करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, दोघांच्या चवमध्ये थोडा फरक आहे. तसेच व्हर्जिन ऑलिव्ह तेल हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेला पेक्षा स्वस्त आहे.

३) शुद्ध ऑलिव्ह ऑईल (Pure Olive Oil)

हे रिफाइंड ऑलिव्ह तेल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल यांचे मिश्रण आहे. त्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाण इतर ऑलिव्ह तेलांपेक्षा कमी असते, कारण ते कोल्ड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जात नाही.

तरीसुद्धा, आपण ते स्वयंपाकात वापरु शकतो, परंतु आपण हे केस आणि त्वचेसाठी वापरत असाल तर ते अधिक फायदेशीर ठरेल.

४) रिफाईन्ड ऑलिव्ह ऑईल (Refined Olive Oil)

ऑलिव्ह मधून तेल काढल्या नंतर, उरलेल्या ऑलिव्ह ला उष्णता आणि रसायनांच्या मदतीने पूर्णपणे काढून टाकले जाते, ज्यास रिफाइंड ऑलिव्ह तेल असे म्हणतात.

त्यात ऍसिड आणि चरबीचे प्रमाण जास्त आहे. तसेच त्या तेलाची चव आणि सुगंधही फारसी चांगला नाही. याव्यतिरिक्त, त्यात पोषक आणि अँटी-ऑक्सिडेंट देखील कमी आहे.

५) पोमास ऑईल (Pomace Oil)

हा देखील ऑलिव्ह ऑईलचा एक प्रकार असून तो बाजारात उपलब्ध आहे. हे स्वयंपाकात सर्वात कमी वापरले जाते, गुणवत्तेच्या बाबतीत, हे एक्स्ट्रा व्हर्जिन आणि व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलपेक्षा निकृष्ट दर्जाचे आहे.


ऑलिव्ह तेलाचे फायदे (Olive Oil Benefits In Marathi)

ऑलिव्ह तेलाचे आरोग्यासाठी, त्वचा आणि केसांसाठी बरेच फायदे आहेत. तसेच या तेलाचा उपयोग हे तांत्रिक कामासाठी आणि इंधनासाठी केला जातो. जसे कि, गाडी साठी ग्रीस किंवा फर्निचरला पॉलिश करण्यासाठीही इ.

मग ते वजन कमी करायचे असल्यास किंवा रक्तदाब नियंत्रित करणे, डोक्यातील कोंडा कमी करणे किंवा मुरुम काढून टाकणे या करिता ऑलिव्ह तेलाचा उपयोग केला जातो. चला तर त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया..!

१) वजन कमी करण्याकरिता

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतांना आढळतात. तसेच वेळेच्या कमतरतेमुळे लोक बाहेर खाणे पसंद करतात. तसेच कामात व्यस्त असल्याकारणाने त्यांचा जेवणाची वेळ बरेचदा बदलत राहते. परिणामी वजन वाढू लागते.

नंतर काही लोक डायटिंग करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे फार काळ टिकत नाही. बरेचश्या लोकांचे आवळीचे पदार्थ हे तळलेले असतात, परंतु जर अशा परिस्थितीत आरोग्यासाठी तळलेले पदार्थ जर ऑलिव्ह तेलातून तळले, तर त्यापासून लठ्ठ पणा वाढण्यात कमी धोका आहे.

स्वयंपाकात तुम्ही ऑलिव्ह वापरू शकता, हे आपण आधीच बघितलेले आहे जे कि, खाण्याची चव वाढवते. तसेच वजनही कमी करते. जर आपण वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले असाल तर व्यायामासह आपण आपल्या आहारात ऑलिव्ह ऑईल देखील समाविष्ट केले पाहिजे.

२) मधुमेहापासून (डायबेटीस) रक्षण करण्याकरिता

सध्याच्या चुकीचा आहार तसेच जेवणाची वेळ चुकुवून घेतलेला आहार त्यामुळे आपण मधुमेहाला आमंत्रण देऊ शकतो. मधुमेह कोणालाही होऊ शकतो.

एकदा एखाद्यास मधुमेह झाल्यास त्याला नेहमी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि आपल्या खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ऑलिव्ह तेलाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर ठरू शकते.

ऑलिव्ह ऑईल शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि इन्सुलिन वर संवेदनशीलता वाढवते. जे टाइप २ मधुमेहापासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

३) डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. काळाच्या ओघात डोळ्यांची दृष्टी कमी होत जाते. अशा परिस्थितीत आपण वेळीच त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. डोळ्याच्या काळजीसाठी आपण ऑलिव्ह तेल वापरू शकता.

ऑलिव्ह तेलाने तुम्ही डोळ्यांच्या भोवती हलके मसाज करू शकता. हे आपल्या डोळ्यांभोवती रक्त संचार सुधारतो, तसेच डोळ्याचा थकवा दूर करतो. झोपेच्या आधी आपण डोळ्याभवतील जागेची मालिश करू शकता. (तेल डोळ्यात जाता कामा नये)

४) डोक्याकरिता फायदेशीर

ऑलिव्ह तेल हे डोक्याला खूप फायदेशीर आहे मानसिक ताण, चिंता आणि इतर अनेक कारणांमुळे लोकांच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. तसेच, अशा परिस्थितीत वयानुसार बरेच लोक अल्झायमर सारख्या आजाराचा बळी पडू लागतात.

यात एखादी व्यक्ती वयानुसार आपली स्मरणशक्ती गमावू लागते. अशा परिस्थितीत ऑलिव्ह तेलाचे सेवनाने अल्झायमरसारख्या स्मरणशक्ती च्या समस्या टाळल्या जाऊ शकतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलिफेनॉल असतात, जे अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतात.

त्यांची स्मरणशक्ती सुधारते. तसेच, जर आपण ऑलिव्ह तेलाने डोके मालिश केले तर आपण मोठ्या प्रमाणात तणावातून मुक्त होऊ शकतो आणि त्यामुळे मन शांत राहते.

५) स्तनाच्या कर्करोगापासून (ब्रैस्ट कैंसर) संरक्षण करतो

जर आपण आपल्या आहारात ऑलिव्ह तेलाचा समावेश केला तर ते स्तन कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकते. एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, ऑलिव्हच्या पानात सापडलेल्या नैसर्गिक कंपाऊंड ओलियोपिनमध्ये ब्रेस्ट-कॅन्सर विरोधात लढणारे गुणधर्म असतात.

ऑलिव्ह तेलाचे आहाराचे समावेश करणार्‍या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 62% कमी आहे.

६) हाडे मजबूत करतो

जर आपल्याला असे वाटत असेल की, केवळ कॅल्शियमच तुमची हाडे मजबूत करते, तर आपण चुकीचे आहात. तर आज पासून आपल्या यादीमध्ये ऑलिव्ह तेल देखील जोडा. कारण एका संशोधनात असे आढळले आहे की, जे लोक ऑलिव्ह तेलाचा आहारात वापर करतात.

त्यांच्या रक्तात ऑस्टिओकॅलसीनचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळले आहे, जे आपल्या हाडे मजबूत असल्याचे एक लक्ष आहे.

७) डिप्रेशन कमी करतो

ऑलिव्ह तेलाचा एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे तो डिप्रेशनवर उपचार करण्यासाठी देखील वापरला जातो. ऑलिव्ह ऑइल सेरोटोनिनची पातळी वाढवितो, जे कि एक प्रकारचा मेंदू रसायन आहे आणि हेच केमिकल एंटीडिपेशन टॅब्लेटमध्ये देखील आढळते.

त्यामुळे ऑलिव्ह तेल हे टेन्शन मध्ये असलेल्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहे.

८) हृदयासाठी फायदेशीर

कामाचा ताण, खाण्याची चुकीची सवय, चिंता आणि इतर अनेक कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जर याची काळजी घेतली नाही तर हृदयाचा ठोका चुकण्याची भीती जास्त वाढते. अशा परिस्थितीत आपण नियमित व्यायाम करणे आणि आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करणे आवश्यक आहे.

ऑलिव्ह ऑइल रक्तदाब नियंत्रित करतो, कोलेस्टेरॉलचा धोका कमी करतो आणि हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांना प्रतिबंधित करतो. इतर बर्‍याच संशोधनात असेही दिसून आले आहे की ऑलिव्ह तेल हृदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर आहे.


त्वचेसाठी ऑलिव्ह ऑईलचे फायदे

olive in Marathi

olive oil meaning in Marathi

olive oil in Marathi / olive oil meaning in Marathi

जाहिरातीमध्ये बर्‍याचदा असे दर्शिवले जाते कि, या क्रीम आपल्याला सुंदर बनवतात किव्हा ती क्रीम आपल्या चेहऱ्यावर तेज वाढवेल इत्यादी इत्यादी, परंतु हे सौंदर्यप्रसाधने खरंच आपल्याला फायदा देऊ शकतात का ?

अश्या प्रकारच्या सौंदर्यप्रसाधना मध्ये देखील ऑलिव्ह तेलाचा उपयोग केला जातो. तथापि, ऑलिव्ह तेलाच्या मदतीने त्वचे बद्दल असलेल्या समस्यांना कमी करू शकता आणि तेही स्वस्तात. त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइलचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

१) ऑलिव्ह तेल त्वचा निरोगी ठेवते

ऑलिव्ह तेलामध्ये व्हिटॅमिन-ई आणि बरेच अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि ती चमकते. आपली इच्छा असल्यास, आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करू शकता किंवा आपल्या त्वचेवर लावू शकता, हे दोन्ही प्रकारे ऑलिव्ह तेल फायदेशीर आहे.

ऑलिव्ह तेलामध्ये व्हिटॅमिन ई आल्याकारणाने जे सुजाण, मुरुमे, त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी, त्वचेला सोरायसिस आणि त्वचेच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरते.

२) ओठांसाठी फायदेशीर

ओठांच्या काळजीसाठी आपण ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे आपले ओठ मऊ आणि कोमल करते आणि त्यांना सुंदर बनवते, तसेच ओठ फाटण्याची समस्येला दूर करतो.

३) त्वचा मॉस्चराइज़ करण्याकरिता

हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, त्वचेला मॉइस्चराइझ ठेवणे फार महत्वाचे आहे. नैसर्गिक ऑलिव्ह तेल वापरा. त्यातील अँटीऑक्सिडंट्स, एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि व्हिटॅमिन ई त्वचेला निरोगी आणि नमी देतात.

त्यामुळे आपल्या त्वचेला हानिकारक सूर्य किरण आणि वारा यासारख्या बाह्य घटकांपासून संरक्षण मिळते. याची हलकी टेक्सचर चेहऱ्याला नॉन-स्टिकी मॉइश्चरायझर बनवते जी जास्त काळ टिकते.

४) मेकअप काढण्यासाठी उपयोगी

जवळजवळ प्रत्येक स्त्रीला मेकअप करायला आवडत. परंतु रात्री झोपेच्या आधी मेकअप काढणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा बाजारामध्ये उपलब्ध मेकअप रीमूव्हर निवडण्यात महिला गोंधळतात.

या परिस्थितीत ऑलिव्ह ऑईलचा उपयोग करणे हा एक उत्तम उपाय आहे. हे आपल्या त्वचेवर हळूवारपणे कार्य करतो आणि आपला मेकअप सहजपणे काढतो.

५) पायाची टाच साठी उपयोगी

जर क्रॅक टाचांमुळे आपल्याला चालण्यास त्रास होत असेल तर ऑलिव्ह तेल वापरा. ऑलिव्ह तेल आपल्या टाचाना मॉइश्चराइझ करेल आणि मऊ करेल.


ऑलिव्ह तेलापासून होणारे नुकसान

आता पर्यंत आपण ऑलिव्ह तेल फायद्यांविषयी शिकलात! पण ऑलिव्ह तेलाचे साइड इफेक्ट्स देखील होऊ शकतात हे आपणास माहित आहे काय? होय, ऑलिव्ह ऑईल जास्त प्रमाणात सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. तसे बघितले तर अति वापरामुळे दुष्परिणाम प्रत्येक वस्तूचा होतो.

ऑलिव तेलाचे दुष्परिणाम मुरुम, त्वचेवर पुरळ किंवा अतिसार असू शकतात. म्हणून, ऑलिव्ह तेल घेताना काही खबरदारी घ्यावी. ऑलिव्ह तेलाचे सेवन कोणत्या परिस्थितीत टाळले पाहिजे? आणि कोणत्या परिस्थितीत ते हानिकारक आहे? हे जाणून घेऊया!

१) संवेदनशील त्वचेचे लोक:- जर तुमची त्वचा खूपच संवेदनशील असेल तर, ऑलिव्ह ऑईल थेट त्वचेवर लावू नका. तर केवळ कोल्ड-टेस्टिंग तेलामध्येच मिसळून त्याचा वापर करा.

२) तेलकट त्वचेच्या लोकांनी टाळावे:- ज्या लोकांची त्वचा आधीच तेलकट आहे, त्यांनी ऑलिव्ह तेलाचा वापर टाळावे. हे त्वचेला अधिक तेलकट बनवते आणि मुरुम येण्याची शक्यता वाढवते.

३) ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरच्या पातळीवर लक्ष ठेवा:- ऑलिव्ह ऑइलमध्ये रक्तदाब आणि ब्लड शुगर कमी करण्याचे गुणधर्म आहेत, म्हणून जर आपण आधीच अँटीडायबेटिक आणि अँटीहायपरटेन्सिव्ह औषधे घेत असाल, तर ऑलिव्ह ऑईल घेताना आपल्या रक्तातील साखरेची पातळी वर लक्ष ठेवा. पातळी तपासून पहा आणि नियमित अंतराने रक्तदाब तपासून बघा.

आशा करतो कि, ऑलिव्ह तेलाचे फायदे आणि तोटे (olive oil in Marathi) याबद्दल आता आपल्याला चांगले माहिती मिळाली असेलच. तर आजच आपल्या समस्येनुसार आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्यास सुरवात करा आणि निरोगी रहा.

ऑलिव्ह तेलाच्या वापरामुळे कोणतेही दुष्परिणाम लक्षात येतास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.


ऑलिव्ह बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1 – ऑलिव्ह ऑइल ला मराठी मध्ये काय म्हणतात?
Ans –
ऑलिव्ह ऑइल ला मराठी मध्ये नाव नसल्याकारणाने आपण याला ऑलिव्ह ऑईलच म्हणू. परंतु हिंदी या भाषेत त्याला जैतून (jatun oil) असे म्हणतात.

Q.2 – ऑलिव्ह तेलाचा उपयोग कश्या करीता होतो?
Ans – ऑलिव्ह तेलाचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठी, सौंदर्य प्रसाधनांसाठी, पारंपरिक दिवे, साबण बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.

Q3. – ऑलिव्ह ऑइल पासून होणारे नुकसान कोणते?
Ans – ऑलिव्ह ऑइलचा जास्त वापर केल्याने मुरुम, त्वचेवर पुरळ किंवा अतिसार देखील होऊ शकतो.

Q4. – ऑलिव्ह ऑईल कसे तयार केले जाते?
Ans – ऑलिव्ह तेल दाबून आणि कुस्करून तयार केले जाते.

  • सागर राऊत

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला ऑलिव्ह तेलाबद्दल माहिती देणे असल्याकारणाने ऑलिव्ह तेलाचा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


संदर्भ (Reference) –

wikipedia – olive oil
Health Benefits of Olive Oil and Plant Polyphenols

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻