एरंडेल तेलाचे शरीरासाठी आश्चर्यकारक फायदे आणि नुकसान

एरंडेल तेल हे एरंडाच्या झाडाला येणाऱ्या बियांपासून बनलेले वनस्पती तेल आहे. स्वच्छता उत्पादनांपासून पेंट्सपर्यंत विविध प्रकारच्या घरगुती वस्तूंमध्ये तसेच वैद्यकीय उपचार आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये एरंडेल तेलाचा वापर होतो.

चेहरा आणि त्वचेच्या आरोग्यासाठी हे तेल उत्तम ठरते. एरंडेल तेलामध्ये दाहक-विरोधी, अँटीमाइक्रोबायल, मॉइस्चरायझिंग आणि इतर काही उपयुक्त गुणधर्म असल्याचे मानले जाते.

या लेखात, आपण एरंडेल तेलाचा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत.
चला तर बघूया एरंडेल तेल म्हणजे काय ? आणि दैनंदिन जीवनात आपण एरंडेल तेलाचा वापर कसा करू शकतो.

हे वाचलंत का? –
* शरीर संबंधित कोरफडीचे फायदे
* पुदिनाचे 10 आयुर्वेदिक फायदे

एरंडेल तेल म्हणजे काय? – Castor oil in marathi

castor oil meaning in marathi

castor oil meaning in marathi

एरंड वनस्पतीचे शास्त्रीय नाव रीसिनस कम्युनिस (ricinus communis) आहे आणि या वनस्पतीच्या बियांपासून एरंडेल तेल काढल्या जाते. या बियांमध्ये 40% ते 60% तेल तसेच ट्रायग्लिसराईड्स आणि रिसिनोलिन असते.

रिसिनस कम्युनिस किंवा एरंडेल तेल वनस्पती, स्फर्ज कुटुंब, युफोरबियासी मधील बारमाही फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. एरंड दक्षिण – पूर्व भूमध्य, पूर्व आफ्रिका आणि भारत, संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशांमधील स्थानिक वनस्पती आहे. हे एक वेगाने वाढणारे झुडूप आहे. जे एका लहान झाडाच्या आकारापर्यंत म्हणजे सुमारे 12 मीटर (39 फूट) वाढू शकते.

एरंडेल तेलाचा परिचय

  • एरंडेल तेल पिवळ्या रंगाचे अर्धपारदर्शक द्रव आहे. या तेलात ट्रायग्लिसराइड्स, ricinoleates, Oleate आणि linoleates हे घटक असतात.
  • एरंडेल तेलाचा उकळण्याचा बिंदू 313 ° C (595 ° F) आहे आणि घनता 0.961 g/cm3 आहे.
  • एरंडेल तेल आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह्ज साबण, वंगण, हायड्रॉलिक, कोटिंग्स, शाई, थंड-प्रतिरोधक प्लास्टिक, मेण आणि पॉलिश, नायलॉन, फार्मास्युटिकल्स आणि परफ्यूमच्या निर्मितीमध्ये वापरले जातात.
  • पाचन संबंधित समस्यांमध्ये या तेलाचा प्रामुख्याने वापर होतो. एरंडेल तेलाचे लहान आतड्यात रिसिनोलेइक ऍसिडमध्ये रुपांतर होते जे पचन प्रक्रियेला गती देते.
  • दरवर्षी, 270,000–360,000 टन (600-800 दशलक्ष पौंड) एरंडेल तेल विविध प्रकारच्या वापरासाठी तयार केले जाते.

एरंडेल तेलाचे इतर भाषेतील नाव

  • हिंदी – अरंडी का तेल
  • संस्कृत – एरण्डतैल
  • इंग्रजी – कॅस्टर ऑइल (Castor Oil)
  • तेलुगू – आमुदमु (Āmudamu)

एरंडेल तेलाचे प्रकार


साधारणपणे दोन प्रकारचे एरंडेल तेल उपलब्ध आहे:

1.पिवळा एरंडेल तेल:

  • एरंडाच्या ताज्या बियांपासून दाब देऊन हे तेल बनवले जाते.

2.काळे एरंडेल तेल:

  • एरंडेल भाजून आणि नंतर तेल काढण्यासाठी उष्णता वापरून बनवले जाते. हि पद्धत जमैकामध्ये विकसित केली गेली असल्याने, काळ्या एरंडेल तेलाला जमैका ब्लॅक एरंडेल तेल असे संबोधले जाते.

एरंडेल तेलामध्ये असलेले पोषक तत्व

एरंडेल तेलामध्ये एकूण 18 फॅटी ऍसिड असतात. परंतु अत्यंत फायदेशीर असलेले रिसिनोलेइक ऍसिड 90% असते.

फॅटी ऍसिडफॅटी ऍसिडचे प्रमाण
रिकिनोलिक ऍसिड (Ricinoleic acid)85% – 95%
ओलेइक ऍसिड (Oleic acid)2% – 6%
लिनोलिक ऍसिड (Linoleic acid)1% – 5%
α-लिनोलेनिक ऍसिड (α-Linolenic acid)0.5% – 1%
स्टीरिक ऍसिड (Stearic acid)0.5% – 1%
पाल्मिटिक ऍसिड (Palmitic acid)0.5% – 1%
डायहाइड्रॉक्सीस्टेरिक ऍसिड ( Dihydroxystearic acid)0.3% – 0.5%
इतर (Others)0.2% – 0.5%

arandi tel in marathi

castor oil in marathi

castor oil in marathi

एरंडेल तेलाचे फायदे

1) बद्धकोष्ठता दूर करते

बद्धकोष्ठता दूर करणे एरंडेल तेलाच्या वापरांपैकी एक आहे. कोमट दुधात पन्नास ग्रॅम एरंडेल तेल घेतल्यास मोठ्या आतड्यांमधून कचरा शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होते. एरंडेल तेल जास्त प्रमाणात घेतल्यास हानिकारक असू शकते. ज्याची बद्धकोष्ठता एका आठवड्यात दूर होत नाही त्याने डॉक्टरांना भेटावे.

2) रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

एरंडेल तेल घेतल्याने रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते. जीवाणूंशी लढणाऱ्या लिम्फोसाइट पांढऱ्या रक्त पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी टी पेशी निर्माण करणाऱ्या थायमस ग्रंथीचे आरोग्य वाढते.

3) झोप सुधारते

निद्रानाश हे काही नवीन नाही, बरेच लोक झोपेच्या गोळ्यांकडे वळतात, परंतु नैसर्गिक पर्याय सुरक्षित असू शकतात. एरंडेल तेलाच्या वापरामुळे झोप सुधारते.

4) बुरशीजन्य संसर्गाशी लढते

एरंडेल तेलातील अंडरसाइलेनिक ऍसिड बुरशीजन्य संसर्गाच्या विकासास प्रतिबंध करण्यास मदत करते. एरंडेल तेल हे एन्टीफंगल आहे आणि प्रतिजैविकांच्या संभाव्य दुष्परिणामांशिवाय संसर्ग थांबवण्याचा एक मार्ग असू शकतो.

5) सनबर्नमध्ये फायदेशीर

एरंडेल तेल वेदनादायक सनबर्नचे परिणाम कमी करू शकते. त्यात रिसिनोलेइक ऍसिड असते. जे त्वचेला संसर्गापासून वाचवू शकते. हे जास्त सूर्यप्रकाशामुळे होणारी जळजळ देखील कमी करते.

6) सोंदर्यवर्धक

एरंडेल तेल रंग सुधारू शकते. एरंडेल तेल स्वच्छ करताना त्वचा ओलसर करते. स्पॉट्स आणि डेड स्किन काढण्यासाठी क्लिनर म्हणून वापरतात. परंतु, तेलाला अल्लेर्जिक असणे शक्य आहे, म्हणून ही पद्धत वापरणाऱ्या कोणालाही पूर्ण प्रमाणात वापरण्यापूर्वी त्वचेचा एक छोटा पॅच तपासावा.

7) मायग्रेन मध्ये फायदेशीर

एरंडेल तेल मायग्रेन आणि गंभीर डोकेदुखीच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरू शकते. एरंडेल तेल दाहक-विरोधी आहे. मायग्रेन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांशी निगडित असल्याने, एरंडेल तेलासह आतडे डिटॉक्सिफाय केल्याने मायग्रेन वेदना आणि वारंवारता कमी होण्यास मदत होऊ शकते.

8) केस गळणे कमी करते

केस गळतीवर एक स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय म्हणून एरंडेल तेल वापरून शकतो. केसांच्या मुळांवर नियमितपणे एरंडेल तेल लावल्याने केस आणि टाळूची गुणवत्ता सुधारते, आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -6 आणि -9 फॅटी ऍसिड तसेच रिसिनोलेइक ऍसिड केस गळतीवर फायदेशीर ठरते.

9) एरंडेल तेल उपयोग पोटासाठी

जर तुम्हाला गॅस किव्हा ऍसिडिटी चा त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल, तर तुम्ही एरंडेल तेलाचे सेवन करू शकता. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे एरंडेल तेल मिसळून घ्या.

यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या लवकर संपते. याशिवाय पचनक्रियाही मजबूत होते. जर तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही सकाळी उठल्यावर एरंडेल तेल आणि दुधाचे सेवन करू शकता.

एरंडेल तेलाचे होणारे नुकसान

  • एरंडेल तेलाचा जास्त वापर केल्याने उलट्या, अतिसार, कमजोरपणा, चक्कर येऊ शकतात.
  • एरंडेल तेलात रिकिन नावाचे विष असते. जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्यास जीवाचा धिक उद्भवू शकतो.
  • एरंडेल तेल नाजूक अवयवांचे नुकसान करू शकते.
  • एलर्जी, खाज, सूज, त्वचेवर लाल चट्टे, पुरळ अश्या समस्याही होऊ शकतात.

एरंडेल तेलाबद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q1.- एरंडेल तेलाचा उपयोग कसा करावा?

Ans – एक चमचा एरंडेल तेलाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्तता मिळते. चेहऱ्याच्या आणि केसाच्या आरोग्यासाठी एरंडेल तेल वापरू शकता.
कएरंडेल तेल हे सांधेदुखीसाठी चांगलं आहे. नियमित याने मालिश केल्यास, सांधेदुखी नष्ट होण्यास मदत मिळते. अँटी-बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्मांमुळे, हर्पस खरुजमध्ये एरंडेल तेल फायदेशीर आहे.

Q2.- एरंडेल तेलचा वापर कोणी करू नये?

Ans – गर्भवती महिला आणि लहान मुलांनी एरंडेल तेलाचे सेवन करू नये, तसेच ज्यांना या तेलाची अलर्जी आहे. त्यांनी हे तेल वापरू नये.

Q3.- एरंडेल तेलात कोणते घटक असतात?

Ans – एरंडेल तेलामध्ये नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म असतात आणि त्यात व्हिटॅमिन ई, खनिजे, प्रथिने आणि ओमेगा -6 आणि -9 फायदेशीर फॅटी ऍसिड असतात.

Q4.- नाभीमध्ये एरंडेल तेल टाकण्याचे फायदे काय आहेत?

Ans – रोज नाभीमध्ये दोन थेंब एरंडेल तेल टाकल्याने ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
तसेच डोळ्यांची जळजळ, खाज आणि कोरडेपणा बरा होतो. चेहऱ्याचा रंग उजळतो. मुरुम आणि डाग बरे होतात.

एरंडेल तेलाचे फायदे (castor oil in marathi) हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • मृणाली आकोलकर

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला एरंडेल तेलाचे फायदे (castor oil in marathi) बद्दल माहिती देणे असल्याकारणाने एरंडेल तेलाचा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻