पुदीना उपयोग मराठी / पेपरमिंट

पुदीना ( Pudina in marathi )

जेव्हा आपण पुदिना चे नाव घेतो, तर यात खूप प्रकार येतात. जसे Menthol Mint, Peppermint (पेपरमिंट), Barmot Mint, इत्यादी. पुदिना (Mint leaves) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुदीनाच्या पानाला एक वेगळाच सुगंध असतो. पुदिनाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, जसे पचन क्रिया सुधारने, त्वचा स्वस्थ ठेवणे आणि मजबूत केस.

पुदिना चा वापर खूप प्रकारच्या भाज्यां मध्ये केला जातो. ज्यामुळे भाजी ला एक वेगळाच स्वाद येतो. आपल्याकडे जास्त पुदिना ची चटणी ही खूप आवडीने खाल्ली जाते. पेपरमिंट (peppermint) म्हणजे पुदिना (peppermint meaning in marathi)

peppermint in marathi

पुदिन्याचे-फायदे

peppermint meaning in marathi

पुदिना चा वापर खूप काळा पासून औषध म्हणून केला जात आहे. आपल्याला सर्दी, डोकं दुःखी असेल तर पुदिना चा चहा पिण्यास सांगितले जाते. परंतु हे मोजक्याच लोकांना माहीत आहे. की पुदिना ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. म्हणून आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत की पुदिना चे आरोग्यासाठी काय फायदे आहेत.

हे वाचलंत का? –
* शरीर संबंधित कोरफडीचे फायदे
* राजमाचे आरोग्यासाठी 10 फायदे

आपण बघत आलो आहोत, की प्राचीन काळापासून लोक जगभरात पुदीनाचे विविध प्रकार वापरत आहेत. पुदिनांचे विविध प्रकार आपल्याला भरपूर अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आणि आरोग्यदायक फायदे देतात. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे, की पुदीना आपल्या आरोग्यास भरपूर फायदेशीर आहे. आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यासाठी आपण पुदीनाचा वापर करू शकता.

तुम्ही आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुदिनाचा वापर करू शकता. पुदीनाची पाने ही अँटिऑक्सिडेंट्स व फायटोन्यूट्रिएंट्सने भरलेली असतात. आणि त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बी-कॉम्प्लेक्स, फॉस्फरस आणि कॅल्शियम असते व त्यात बॅक्टेरियाविरोधी गुण सुध्दा असतात.

पुदिना हे लोह, पोटॅशियम आणि मॅंगनीजचे एक समृद्ध स्त्रोत आहे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि मेंदूच्या कार्यास चालना मिळते.

पुदीनाची पाने कमी उष्मांक असतात आणि त्यात कमीतकमी प्रथिने आणि चरबी आहे, यामुळे तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या कार्यक्रमात सुद्धा पुदीनाची पाने सहज खाऊ शकता.


पुदिनाचे 10 आयुर्वेदिक फायदे (Pudina benefits in marathi)

1) सर्दी आणि डोकं दुःखी मध्ये लाभकारक

सर्दी आणि डोकदुखी हे आपल्याला कधी पण होऊ शकते. याकरिता आपले घरघुती उपाय लाभकारक राहतात. पुदिना चे फायदे हे सर्दी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी पण आहेत. सर्दीमुळे आपले नाक बंद झालं असेल तर पुदिना मध्ये असलेल्या Menthol ते मोकळं करून आपल्याला स्वास घ्यायला त्रास होत असल्यास तो कमी करतो.

सर्दी खोकला हा एक साधारण आजार आहे; परंतु या काळात हाच सर्दी आणि खोकला खूप मोठा आजार असल्यासारखं वाटायला लागले आहे. यामुळे यावर घरातील उपचार तयार ठेवावे. Menthol मुळ तुम्हाला सर्दी मध्ये पूर्ण आराम तर नाही; होणार पण तुमचे नाक मोकळे होण्यास थोडी मदत होईल.

2) पुदिना अपचनावर सुद्धा गुणकारी

पुदीनाची पाने ही तुम्हाला भूक लागण्यास मदत करतात. हे पाचन एंझाइम्सला उत्तेजन देऊन पाचन तंत्रास प्रोत्साहित करण्यास मदत करतात.

पुदीनाच्या तेलामध्ये अपचन, पोटात संक्रमण इत्यादीपासून मुक्त करण्यासाठी अँटिसेप्टिक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुण आहे, तो मेथेनॉलच्या अस्तित्वामुळे एंटी-स्पास्मोडिक उपाय म्हणून कार्य करतो.

3) पुदिना पोटाच्या आतड्यांसंबंधी आजारावर प्रभावकारी

आतड्यांसंबंधी सिंड्रोम पाचन तंत्राचा एक सामान्य विकार आहे. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अतिसार, सूज येणे आणि अपचन होऊ शकते.

आतड्यांसंबंधी सिंड्रोमचा मुख्य आणि महत्त्वपूर्ण उपचार म्हणजे आहार बदलणे, परंतु काही अभ्यासांमधून असे दिसून आले की पुदीना तेल उपयुक्त ठरू शकते. पुदीनाच्या तेलात मेन्थॉल नावाचे एक कंपाऊंड आहे. जे पाचन तंत्राच्या स्नायूंवर प्रभावकारी आहे.

4) पुदिना श्वसना संबंधी आजार दूर करतो

फुफ्फुसांच्या वाढलेल्या संवेदनशीलतेस दमा असे म्हणतात. दम्याच्या त्रासात सतत खोकला येणे व धाप येणे ही मुख्य लक्षणे दिसून येतात. दम्याच्या रुग्णांना पुदीनाची पाने जास्त प्रमाणात खाण्याची शिफारस केली जाते. कारण यामुळे छातीत होणार त्रास कमी होतो. पुदीनाची पाने दररोज सेवन केल्यास दम्याचा त्रास कमी होतो. पुदीना हे नाक साफ करण्यासाठी सुद्धा ओळखले जाते.

मेन्थॉल श्वासोच्छवास करणे सोपे करते. तुम्हाला जर तीव्र खोकला असेल, तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही पुदिना ची पाने चघळून खाऊ शकता. ज्यामुळे तुमचा खोकला व गळ्यात होणारी जळजळ कमी होऊन तुम्हाला आराम मिळतो.

5) पुदिना ब्रेन पॉवर सुधारतो

पुदीनाची पानेे ही ब्रेन टॉनिक असतात. विविध अभ्यासानुसार, पुदीनाचे सेवन केल्याने जागरूकता आणि संज्ञानात्मक कार्ये वाढू शकतात. पुदीनाची पाने ही तुमची स्मृतीशक्ती व मानसिक सतर्कता वाढवण्यास मदत करतात.

6) केस गळती वर पुदिना गुणकारी

पुदिना चे फायदे केस मजबूत करण्यासाठी देखील आहे. पुदिना मध्ये कैराटिन आणि अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असते, जे तुमच्या केसांना मजबूती देते.

या दोन्ही तत्व मुळे तुमचे केस मुळातून मजबूत होतात. याच सोबत तुमच्या केसात कोंडा होत, असेल तर त्यापासून पण तुम्हाला सुटका मिळेल. पुदिना मुळे तुमच्या केसांमधील कोंडा निघून नवीन केस उगवण्यास मदत होते.

mint leaves in marathi

pudina-benefits-in-marathi.

peppermint oil in marathi

7) पुदिना त्वचा निखारण्यास मदत करतो

पुदिना हा असा एक घटक आहे. जो अनेक आयुर्वेदिक फायद्यासोबतच त्वचे साठी सुद्धा खूप लाभदायक आहे. पुदिना हे अँटीबॅक्टरियल असून त्वचेवरील इन्फेक्शन, जळण कमी करण्यास व त्वचा निखरण्यास उपयोगी आहे.

पुदिण्यात व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेचा फ्री रेडिकल पासून बचाव करते. पुदिन्याचा अर्क त्वचे वर १५ -२० मिनिट लावून धुतल्याने त्वचा साफ होते व स्वस्थ राहते.

8) पुदिना वजन घटवण्यासाठी खूप फायदेशीर

पुदिना हा कुठेही सहज मिळून जातो. पुदिन्यात कॅलरीज ची मात्रा कमी असून यात फायबर सुध्दा आढळते. हे दोन्ही घटक वजन कमी करण्यात खूप फायदेशीर ठरतात. या सोबतच पुदिन्याचा सुगंध सुद्धा वजन कमी करण्यात मदत करतो.

पुदिन्याच्या पत्त्यांनमधून डायजेस्टिव एन्जाइम प्रोड्यूस होतात. जे डायजेशन म्हणजेच पचन क्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते. पचनक्रिया व्यवस्थित झाली, तर तर कॅलरी बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.

9) पुदिन्याचे फायदे डोकदुखी कमी करण्यासाठी

या धावपळीच्या काळात डोकेदुखी हा एक असा आजार आहे, ज्यामुळे प्रत्येक जण त्रासलेला असतो. पुदिना डोकेदुखी साठी सुद्धा फार उपयुक्त आहे. आयुर्वेदात सांगितले गेले आहे. कि पुदिन्याच्या पत्त्यांचा उपयोग डोकेदुखी कमी करण्यात केल्या जात असे, पुदिन्याचा सुगंध उग्र असल्यामुळे त्याचा वापर बाम मध्ये सुद्धा केला जातो.

10) पुदिना तोंडातून येणारा दुर्गंध दूर करतो

पुदिना तोंडाला स्वस्थ ठेवण्यात मदत करतो. यातून येणाऱ्या उग्र सुगंधामुळे तोंडातून येणारा दुर्गंध कमी करण्यात पुदिना मदत करतो. तुम्ही बघितल असेल, की मार्केटमध्ये जास्तीत जास्त टूथपेस्ट, माउथ फ्रेशनर ही पुदिना फ्लेवर ची असतात.

परंतु या सर्व गोष्टीं काही वेळेस तोंडातील दुर्गंधाला थांबवू शकतात. पण ते बॅक्टेरिया ला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे मार्केटमधील माउथ फ्रेशनर पेक्षा पुदिन्याचे पाणी चघडल्याने तोंड स्वस्थ राहते व दात सुद्धा मजबूत होतात. जर तुम्ही कोणत्या मोठ्या बिमारी मध्ये पुदिना चा वापर करीत असाल तर डॉक्टर चा सल्ला अवश्य घ्या.

आपण वरील आर्टिकल मध्ये पुदिन्याचे फायदे बघितले. pudina benefits in marathi हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली, आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा..! अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा.

धन्यवाद..!

  • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *