विमानात इतर जागा सोडून, विमानाच्या पंखांमध्ये इंधन का भरतात.?

Why is fuel stored in wings of aircraft : हवेत उडवणाऱ्या विमानांबद्दल आपल्याला माहित नसलेल्या, अनेक गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फॅक्टस बद्दल सांगणार आहोत.!

काही फॅक्टस आहेत, ज्यांचा आपण विचारही करत नाही. पण जेव्हा ते आपल्या मनात येतात तेव्हा, आपल्याला आश्चर्य वाटते. असाच एक प्रश्न आहे, की इंधन हे विमानाच्या पंखांमध्ये का भरले जाते? याचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.

विमान चालन तज्ज्ञ रेबेका विल्यम्स यांनी सांगितले की, विमानाचा समतोल राखण्यासाठी विमानाच्या पंखांमध्ये इंधन साठवले जाते. इंधनाचे वजन खूप असते आणि ते विमानाच्या मुख्य भागामध्ये कुठेतरी स्टोर केले गेले. तर प्रवाश्यांचे सामान ठेवण्याची जागा कमी होते.

विमानाच्या मागील बाजूस इंधन ठेवल्याने, विमानाचे वजन वाढेल आणि जसजसे विमान वर उडत जाईल, तसतसा विमानाचा तोल बिघडेल आणि इंधन संपलेच, तर त्याचा पुढचा भाग लँडिंग दरम्यान झुकेल. ही बॅलन्स ठेवण्याची समस्या टाळण्यासाठी पंखांमध्ये इंधन साठवले जाते.

पंखांमध्ये इंधन साठविल्याने पंखांवरील दाब कमी होतो आणि इंधनाचा भार संपूर्ण एअरफ्रेमवर अधिक समान रीतीने पसरतो. तसेच कोणतीही समस्या उद्भवल्यास, गुरुत्वाकर्षणामुळे इंधन पंपांशिवाय इंजिनमध्ये वाहत राहते.

बाहेरून मोठे दिसणारे पंख आतून पोकळ असतात. अशा परिस्थितीत पंखांमध्ये इंधन साठवून ठेवल्याने विमानाचे वजन संतुलित राहते आणि विमानात कोणताही ताण येत नाही.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻