कोरोना विषाणूबद्दल माहिती। Covid meaning in marathi

corona information in marathi

कोरोना विषाणूबद्दल माहिती

कोरोना विषाणूबद्दल माहिती

कोरोना विषाणूबद्दल माहिती

आलेल्या एका छोट्या विषाणूने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला. सुरुवातीला तर सर्वांनाच सळो की पळो या मराठी म्हणी प्रमाणे झाले होते. लाखो लोक मृत्युमुखी पडत होते. अनेक देशांची अर्थव्यवस्था या विषाणूमुळे धुळीला मिळाली होती. 2019 मध्ये या रोगाची सुरुवात अनेक देशात व भारतात झाली. या विषाणूने पोलीस अधिक्षक, डॉक्टर्स, नर्स या सर्वांच्या नाकात दम करून सोडला होता.

कोरोना व्हायरस हा रोग प्रथम 1960 च्या दशकात सापडला होता. सर्वात आधी सापडलेल्यांमध्ये कोंबड्यांमध्ये एक संसर्गजन्य ब्रॉंन्कायटीस विषाणू आणि सामान्य सर्दी असलेल्या दोन रुग्णांमध्ये तो विषाणू आढळून आला. त्यानंतर 2003 आणि 2004 मध्ये तो विषाणू नव्याने सापडला.

या विषाणूचा उल्लेख अनेक मेडिकल बुक्समध्ये आधीपासूनच आहे, परंतु 2019 मध्ये हा विषाणू covid-19 या स्वरूपात आला आहे, हा रोग कोरोना विषाणूच्या SARS – COV – 2 या नवीन व्हायरसमुळे झाला.

Covid – 19 याचे म्हणजेच – “Co” म्हणजे करोना, “Vi” म्हणजे व्हायरस आणि “D”
म्हणजे डिसीज आणि हा कोरोना 19 व्या वर्षात आला म्हणून 19.

हे वाचलंत का? –
* आला कोरोना…(Funny Marathi Story)
* रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय

कोरोना व्हायरसची लक्षणे (corona symptoms in marathi)

  • सततचा खोकला
  • ताप
  • कोणत्याही प्रकारची चव न लागणे
  • वास न समजणे
  • थोड्या कामा नंतर ही थकवा जाणवणे
  • सारखेच थकल्यासारखे वाटणे
  • डोक खूप जास्त प्रमाणात दुखणे
  • पाय दुखणे
  • पोटऱ्या जास्त प्रमाणात जड पडणे इ.

कोव्हिड चे प्रकार

१) ताप असल्यासारखे वाटणे परंतु ताप नसणे –

  • यात डोकेदुखी
  • वास न येणे
  • स्नायू दुखी,
  • खोकला
  • घसा खवखवणे
  • छातीत दुखणे
  • परंतु ताप नसणे अशा प्रकारची लक्षणे आढळतात.

२) ताप असल्यासारखे वाटणे आणि ताप असणे –

  • यात डोकेदुखी
  • वास न येणे
  • खोकला
  • घसा खवखवणे
  • ताप असणे
  • भूक न लागणे, यांसारखी लक्षणे आढळतात.

३) गॅस्ट्रोइंटेस्टाईल डिसिज (आतडी आणि पचनसंस्था) –

  • डोकेदुखी
  • वास न येणे
  • भूक न लागणे
  • अतिसार घसा दुखणे
  • छातीत दुखणे, अशी लक्षणे आढळतात.

४) अशक्तपणा येणे –

  • डोकेदुखी
  • वास न येणे
  • खोकला
  • ताप
  • घसा बसणे
  • छातीत दुखणे
  • थकवा येणे, यांसारखे लक्षणे या प्रकारात असतात.

५) गोंधळल्यासारखे वाटणे –

  • डोकेदुखी
  • वास न येणे
  • भूक न लागणे
  • खोकला
  • ताप
  • घसा बसणे
  • छातीत दुखणे
  • थकवा
  • गोंधळल्यासारखे वाटणे
  • स्नायू दुखी, अशा प्रकारची लक्षणे यात आढळून येतात.

६) श्वासन यंत्रणा –

  • या प्रकारात डोकेदुखी थोड्या प्रमाणात असते
  • सांधे, स्नायू दुखी जास्त प्रमाणात असते
  • प्रचंड थकवा जाणवतो
  • संपूर्ण अंग दुखतं
  • छातीत दुखणे
  • पोट दुखणे जास्त या प्रकारात घडते.

७) स्नायू दुखी व सांधेदुखी –

  • डोकेदुखी थोड्या प्रमाणात या प्रकारात जाणवते
  • सांधे, स्नायू जास्त प्रमाणात या प्रकारात दुखतात
  • त्याच बरोबर पोट दुःखी
  • छाती दुःखी जाणवून येते.

कोरोना कसा दिसतो..?

image source – theweek

१० एन एम चा हा व्हायरस असल्याचं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलय. इंडियन जनरल ऑफ मायक्रोबायोलॉजी रिसर्च (IJMR) यांनी ही माहिती त्यांच्या अंकात प्रसिद्ध केली आहे. हा विषाणू विविध विषाणूचा गट आहे. जो प्राणी पक्ष्यांना रोगी बनवण्यास मदत करते.

मनुष्यामध्ये हा व्हायरस फुफुसांमधील पेश्याना बाधित करतो. प्रत्येक सार्स – कोव्ह – २ विषाणू सुमारे ५० ते २०० नॅनोमीटर व्यासाचा आहे.


कोरोना विषाणूंमुळे होणारा आजार पसरतो कसा..?

आपण अनेक प्रश्न पाहिले, परंतु हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. कोरोना विषाणूंमुळे होणारा आजार हा कसा पसरतो आहे..?

व्यक्तीच्या श्वास मार्गातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून किंवा खोकल्यातून हा आजार बाहेर पडतो, असं म्हटलं तरी चालेल. करोना हा हवेतून पसरतो असे जागतिक आरोग्य संस्थेने जाहीर केले आहे.

हवेतून पसरतो म्हणजेच, आपण कुठे चालत असताना आपल्याला कोरोना झाला असेल तर आपल्या श्वसन मार्गातून बाहेर पडणारा करोना, तुषारांमधून किंवा खोकल्यावाटे हवेत तो करोना पसरतो, परंतु हा व्हायरस चार-पाच मिनिटे हवेत असतो. त्यात त्या विषाणूच्या संपर्कात कोणी व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीला करून होऊ शकतो.

मग हा पसरतो कसा..?

बिना मास्क फिरल्याने, ठराविक अंतर न ठेवता बोलल्याने, सॅनिटायझर चा वापर न केल्याने, हा जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता असते.


लहान मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे आढळतात..?

तिसरी लाट ही लहान मुलांसाठी जास्त प्रमाणात धोकादायक आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. यात लहान मुलांमध्ये कोणती लक्षणे आढळली आहे ते पाहू-

  • ताप
  • सर्दी
  • खोकला
  • पोटदुखी
  • मळमळ
  • उलटी
  • जुलाब
  • चिडचिड होणे
  • जेवण न जाणे
  • चव न लागणे
  • डोळे लाल होणे, यांसारखी लक्षणे आढळून येतात.

कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी..?

आता लॉकडाऊन ही शितल कारण्यात आल्यामुळे सर्वजण आनंदीच आहेत, परंतु परत लॉकडाऊन न व्हावे असे वाटत असेल तर; आपल्याला सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना होऊ नये व पसरू नये म्हणून काय केले पाहिजे..?

  • तर सतत हात साबणाने धुतले गेले पाहिजे
  • एक सावध अंतर ठेवून लोकांशी बोलले पाहिजे
  • मास्कचा वापर बाहेर जाताना केला पाहिजे
  • खोकताना शिंकताना रुमालाचा वापर केला पाहिजे
  • न धुतलेला हात चेहर्या पासून व नाका पासून लांब ठेवला पाहिजे
  • गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवून लांब उभे राहिले पाहिजे
  • दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी सहा फूट म्हणजेच 1.8 मीटर अंतर ठेवले पाहिजे. या गोष्टींचे पालन आपण सर्वानी केले पाहिजे.

कोणत्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी..?

वर सांगितलेल्या कोरोनाच्या प्रकारांपैकी कोणत्या प्रकारचे लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच ज्यांना गंभीर आजार आहेत, जे वयस्कर आहेत, शुगर, बी. पी. इत्यादी त्रास आहेत.

त्यांनी छोटे-मोठे लक्षणे जाणवले असल्यास प्रामुख्याने चाचणी करून घेणे गरजेचे आहे. न घाबरता लवकर चाचणी करून काळजी घेणे गरजेचे असते.


कॉविड चाचणी पॉझिटिव्ह आली तर काय करायचे..?

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. सोम्य लक्षणे असल्यास, गृह विलीनीकरणाचा (क्वारंटाईन) पर्याय निवडणे सोयीस्कर ठरते. श्वसन क्रिया व्यवस्थित रित्या काम करत नसेल व खूप थकल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी हॉस्पिटल ला तातडीने जाऊन उपचार करणे गरजेचे असते.

आपण थोडक्यात परंतु महत्वाची कोरोना विषाणूबद्दल माहिती वर बघितली आहे. हि माहिती तुमच्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यांना हि माहिती नक्की पाठवा.

– मधुरा जोशी


संदर्भ –


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻