मराठी कथा / marathi kahani / marathi katha
आला कोरोना…!
कोरोना ची होत चाललेली पुण्यातील वाईट अवस्था पाहून मी थेट माझं गाव गाठलं.
“जाण बची तो लाखो पाये…..!”
हे ब्रीद वाक्य मनात धरून सुरळीत चाललेल्या जॉब ला मी सुट्टी घेतली.
प्रवास चालू असताना मनामध्ये शंका यायच्या. आपण नेमकं एकटाच गावाकडे चाललोय की, सोबत कोरोना घेऊन चाललोय.
१२ तासाचा जवळपास प्रवास झालेला होता. अमरावतीला आत्ता पोहचनारच होतो. सकाळचे ६.३० झाले होते. अचानक एक विचार मनात चमकून गेला.
“गावकऱ्यांनी आपल्याला गावामध्ये नाही घेतलं तर…..?”
याच विचारात मी जिल्ह्यातून माझ्या गावाला पोहचलो. गावाच्या वेशीवर मी तोंडाला रुमाल बांधून उभा होतो.
समोरून येणाऱ्या दुचाकी स्वार यांनी मला बगताच १८० च्या कोनात त्यांची गाडी परत गावाकडे वळवली.
मला अपेक्षित नसलेला तो शब्द मी त्यांच्या तोंडून ऐकला.
“आला कोरोना……आला कोरोना…..!”
च्या मायला म्हटलं…..यांनी माझा सागर चा डायरेक्ट कोरोना च करून टाकलं.
भीत भीत कसा तरी गावात प्रवेश केला. घरात जाताच थेट बाथरूम गाठलं आणि स्वतःला डेटॉल नि अंगधुवुन स्वच्छ केलं आणि जेवण करायला बसलो.
जेवण चालू असताना घराबाहेर कशाचा तरी गोंधळ चालू असल्यासारखा जाणवलं. तर बाहेर जाऊन बघतो तर काय…निम्मं गाव घराबाहेर येऊन ठेपल होत आणि सोबत अंबुलन्स (रुग्णवाहिका)
कोणी टॉवेलनि तर, कोणी नाकाला स्वतःच्या हातानेच दाबुन धरलं होत. हा सर्व विचित्र प्रकार मी घराच्या दारातून पाहत होतो.
दोन व्यक्ती माझ्या जवळ येऊन मला म्हणाली.
“चेकअप साठी तुम्हला आमच्या सोबत चालावे लागेल”
मी माझं जेवण आवरून त्याच्या सोबत जायला निघालो.
अंबुलन्स पर्यंत जात असताना एखाद कुत्र गटारातून लोळून जस बाहेर निघत, आणि निघताच क्षणी अंग झटकणार या विचाराने ते सर्व लोक दूर पाळायला लागले.
मनात एक गमतीशीर कल्पना आली. अंबुलन्स मध्ये बसण्याआधी या लोकांच्या मागे एकदा पळत सुटायचं बघू काय होते तर… होऊन होऊन काय होणार आपल्या शक्तीनिशी कोणी घरावर तर कोणी झाडावर चढणार….
पण राहुद्या म्हटलं…एखाद्याला नाही चढता आलं तर…..
शांततेत मी अंबुलन्स मध्ये जाऊन बसलो. अंबुलन्सच दार बंद करण्यात आलं. तसा लोकांनी सुटकेचा श्वास सोडला.
अंबुलन्स चालू झाली. काहीतरी कमी असल्यासारखं वाटलं. अरे हो सायरन तर चालूच नाही केला.
मनात आलं की ड्रायव्हर ला म्हणावं….”दादा दहा रुपये घे पण हा सायरन चालू कर…..काही फील नाही होत.
काही तासांनी गावात नॉर्मल रिपोर्ट घेऊन आल्यावर देखील माझ्या घराकडून जाणारेयेणारे संशयास्पद बोट दाखवत म्हणत…..”इथल्या मुलाला कोरोना झाला.”
आजूबाजूच्या चार गावात फेमस झालो….राव
राहिलेली कसर मित्रांनी पूर्ण केली. माझ्या बिर्थडे ला माझ्या सोबत काढलेल्या सेल्फी व्हाट्स अँप वर स्टेटस ठेऊन त्याखाली कॅपशन लिहिलं
” देव तुला बरे करो…..# मिस यु ब्रो….”
- सागर राऊत
हे वाचलंत का? –