रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय
Immune meaning in marathi
रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय?|Immune meaning in marathi
रोगप्रतिकारक शक्ती ही विषाणूंविरूद्ध लढण्याची क्षमता आहे. हे विषाणू जसे की, बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी, पैरासाइट किंवा इतर कोणत्याही हानिकारक पदार्थ असू शकतात. जर आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत असेल, तर ती केवळ सर्दी आणि खोकल्यापासून आपले संरक्षण करत नाही तर, हेपैटाइटिस, लंग इनफेक्शन, किडनी इनफेक्शन सह अनेक रोगांपासून आपले संरक्षण करते.
आपल्या आजूबाजूला बरेच रोगजनक घटक आहेत. आपल्याला कळत सुद्धा नाही आणि ते आपल्या अन्न, पिण्याच्या पाण्यासह आणि श्वासोच्छवासासह हानिकारक घटक शरीरात जातात.
परंतु यानंतरही, प्रत्येकजण आजारी पडत नाही. कारण ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते. त्यांना या बाह्य संसर्गाचा विरोध त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती करते.
आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे, हे रक्ताच्या तपासणी (blood checkup) वरून कळते. तसेच आपले शरीर आपल्याला बर्याच प्रकारचे संकेत देखील देण्यास सुरूवात करते. त्यामुळे आपण कळू शकतो की, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे.
एक प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल की, का रोगप्रतिकारक शक्ती कमी असते? तर त्यामागचे कारण खालील प्रमाणे आहे.-
रोगप्रतिकार शक्ती कमी का असते?|Immune system meaning in marathi
- शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असणे.
- वजन कमी असणे.
- धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन करत असल्यास.
- बराच काळ ताणतणावाखाली रहाणे.
- फास्टफूड, जंकफूड इत्यादींचा जास्त प्रमाणात सेवन करत असल्यास.
- जास्त काळ झोप घेत असल्यास किंवा आवश्यकते पेक्षा कमी काळ झोप झोप घेतल्यास.
- शरीराचे योग्य प्रकारे पोषण मिळत नसेल.
- पेनकिलर, अँटीबायोटिक्स इत्यादींचा दीर्घकाळ वापर.
- व्यायाम करत नसल्यास.
- प्रदूषित वातावरणात दीर्घकाळ राहत असल्यास.
- जर गर्भवती महिलेचे जेवण ठीक नसेल किंवा ती कुपोषणाने ग्रस्त असेल, तर नवजात बाळाची रोग प्रतिकारशक्ती कमी असू शकते.
- कमी पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते, कारण पुरेसे पाणी न पिल्यामुळे शरीरातून मूत्रा वाटे द्रव काढण्यास कठीण होते.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे हे कोणालाही घातक ठरू शकते. कमी रोगप्रतिकारक शक्ती असल्यास तो व्यक्ती लवकर आजारी पाळतो. शक्यतो त्याला होणारे आजार……
- संसर्ग होणे:- रोग प्रतिकारशक्ती कमी असण्याचा मोठा धोका म्हणजे संसर्ग. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
- ऑटोइम्यून डिसऑर्डर असणे:– कमी प्रतिकारशक्तीचा आणखी एक धोका म्हणजे ऑटोम्यून डिसऑर्डर. जेव्हा एखादा रोग शरीराच्या निरोगी पेशींवर परिणाम करतो. तेव्हा त्यास ऑटोइम्यून डिसऑर्डर (स्वयंप्रतिकार विकार) असे म्हणतात.
- शरीराचे अवयव खराब होणे:- रोगप्रतिकारक शक्ती न वाढविल्यास त्याचा परिणाम शरीराच्या इतर भागावर होतो जसे की- हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड इ. कमी रोग प्रतिकार शक्ती मुळे अवयवांचे नुकसान होऊ शकते.
- शरीर आणि डोक्याचा मंद विकास होणे:- बर्याचदा आपण अशा लोकांना पाहिले आहे, ज्यांचा मेंदूचा विकास योग्यप्रकारे झालेला नसतो. हे मुख्यतः कमकुवत रोग प्रतिकारशक्तीमुळे होते.
- कर्करोगाचा धोका:- कमी रोगप्रतिकारक शक्ती हे गंभीर आजाराचं कारण बनू शकतो. प्रतिकारशक्ती कमी असल्यास कर्करोगाचा धोका वाढवू शकतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय
कमी रोग प्रतिकारशक्ती हे जीवघेणा ठरू शकते. असे असूनही, दिलासा देणारी बाब अशी आहे की, कमी रोग प्रतिकारशक्ती असल्यास ती वाढविली जाऊ शकते.
जर खालील दिलेल्या गोष्टींचे अनुसरण केले, तर तुम्ही रोग-विरोधी क्षमता वाढवू किंवा सुधारू शकता.
- पौष्टिक आहार घेणे:- वर सांगितल्याप्रमाणे कमी प्रतिकारशक्तीचे मुख्य कारण म्हणजे हानिकारक अन्न खाणे होय. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपण पौष्टिक आहार घ्यावेत. जे व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह इत्यादींनी भरलेले असेल.
- दररोज व्यायाम करा:- कमी प्रतिकारशक्ती हे शारीरिक दुर्बलतेचे कारण आहे. ते दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करणे फायदेशीर आहे. जर एखाद्या व्यक्तीने दररोज व्यायाम केला, तर तो रोग प्रतिकारशक्ती सुधारू शकतो.
- पुरेशी झोप घेणे:- पुरेशी झोप न मिळाल्यामुळे काही आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामध्ये खराब रोग प्रतिकार शक्तीचा पण समावेश आहे, ज्यामुळे इतर गंभीर रोग होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीस प्रतिकार शक्ती वाढ होण्यासाठी पुरेसे झोप घेणे (६-७ तास) आवश्यक आहे.
- मादक पदार्थांचे सेवन करू नका:- रोग प्रतिकारशक्ती ही औषधांच्या वापरामुळे कमी होते. आपण त्यांचे सेवन करू नये. जेणेकरुन आपले आरोग्य बिगडणार नाही.
- वजन कमी करणे:- जास्त वजन असल्यामुळे रोग प्रतिकारशक्तीसह बर्याच आजार आपल्याला सामोरे जावे लागू शकते. म्हणून वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला कोणताही आजार होणार नाही.
हे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे घरगुती उपाय (rog pratikar shakti vadhavnyache upay) अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.
धन्यवाद..!
- सागर राऊत
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.