दालचिनीचा वापर चव वाढवणारा पदार्थ म्हणून विविध प्रकारच्या पाककृती, चहा आणि पारंपारिक पदार्थांमध्ये केला जातो. पण जेवणाव्यतिरिक्तही दालचिनी चे फायदे भरपूर आहेत. दालचिनी, दालचिनी वेरम, ज्याला सिलोन दालचिनी म्हणून देखील ओळखले जाते, हा सदाहरित लौरसी वृक्षाच्या सालातून काढलेला मसाला आहे.

दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत, असल्याने सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते.

दालचिनी हे बागायती पिक असले, तरीदेखील समुद्र सपाटी पासून १००० मी.उंचीवर हे पिक कोठेही घेतले जाते. यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात. यापासून तेल काढले जाते. तसेच दालचिनीची पाने देखील ‘तेजपत्र‘ म्हणून मसाल्यात वापरतात.

या लेखात, आपण दालचिनीचा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत.
चला तर बघूया दालचिनी म्हणजे काय? आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण दालचिनीचा चा वापर कसा करू शकतो?

हे वाचलंत का? –
* लसूण खाण्याचे फायदे आणि त्याचा घरगुती आयुर्वेदिक उपयोग
* पुदिनाचे 10 आयुर्वेदिक फायदे

cinnamon meaning in marathi

Cinnamon in marathi
Cinnamon in marathi

दालचिनी म्हणजे काय? – Cinnamon in marathi

हा मसाला दालचिनी वंशातील वृक्ष प्रजातींच्या आतील सालापासून मिळवला जातो. वाळलेल्या सालेपासून मिळणारा हा मसाला तपकिरी रंगाचा असतो.

दालचिनीचा सुगंध आणि चव त्याच्या सिनामल्डिहाइड, तसेच युजेनॉलसह इतर घटकांपासून प्राप्त होते. सर्व लॉरेसी कुटुंबातील सिनॅमोमम वंशाचे सदस्य आहेत.

खूप वेळा हा प्रश विचारला जाती कि, दालचिनी ला मराठीत काय म्हणतात? तर दालचिनीला मराठीमध्ये कलमी असे म्हणतात.

दालचिनीमध्ये आर्द्रता, प्रथिने (Protien), स्निग्ध पदार्थ, कर्बोदके (Carbo Hydrade), भस्म आढळतात. दालचिनीमध्ये फॉस्फरस (Phosphorus), सोडियम (Sodium), पोटॅशियम (Potassium),
थायामीन (Thayamin), रिबोफ्लेविन (Reboflewin), निआसीन (Niasin), ‘अ’ आणि ‘क’ हि जीवनसत्वे (Vitamin A & C ) आहेत.


दालचिनी परिचय

मसाल्यासाठी फक्त काही दालचिनीच्या प्रजाती व्यावसायिकरित्या पिकवल्या जातात. दालचिनीला काहीवेळा “खरे दालचिनी” मानले जाते, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारातील बहुतेक दालचिनी ही संबंधित प्रजाती सिनॅमोमम कॅसियापासून घेतली जाते, ज्याला “कॅसिया” असेही संबोधले जाते. 2018 मध्ये, इंडोनेशिया जवळजवळ 40% आणि चीनने 30% उत्पादन केले.

दालचिनी प्राचीन काळापासून ओळखली जाते. प्राचीन राष्ट्रांमध्ये दालचिनीचे इतके मूल्य होते, की ते सम्राटांसाठी आणि अगदी देवतेसाठी देखील योग्य भेट म्हणून मानले जात असे;

मिलेटस येथील अपोलोच्या मंदिराला दालचिनी आणि कॅसिया भेट दिल्याची नोंद एका शिलालेखात आहे. पुरवठादार म्हणून त्यांची मक्तेदारी सुरक्षित ठेवण्यासाठी, मसाल्यांच्या व्यापारात असलेल्यांनी भूमध्यसागरीय जगात त्याचा स्त्रोत अनेक शतकांपासून व्यापार गुप्त ठेवला होता.


दालचिनी इतर भाषेतील नाव

  • हिंदी – दालचिनी
  • इंग्लिश – सिनमन
  • संस्कृत – त्वाक

दालचिनी प्रकार

व्यावसायिकरित्या लागवड केलेल्या दालचिनीच्या चार मुख्य प्रजाती आहेत.

  • Cinnamomum verum
  • Cinnamomum burmannii
  • Cinnamomum cassia
  • Cinnamomum loureiroi

2.6 ग्रॅम वजनाच्या दालचिनीमध्ये खालील प्रमाणे पोषकतत्व असतात.


दालचिनीमधील पौष्टीक घटक

पौष्टीक घटकप्रमाण प्रति 100 ग्रॅम
ऊर्जा6.42 कॅलरीज
कर्बोदक2.1 ग्रॅम
कॅल्शियम26.1 मिलीग्राम (मिग्रॅ)
लोह0.21 मिग्रॅ
मॅग्नेशियम1.56 मिग्रॅ
फॉस्फरस1.66 मिग्रॅ
पोटॅशियम11.2 मिग्रॅ
व्हिटॅमिन ए0.39 मायक्रोग्राम
cinnamon for diabetes

दालचिनी खाण्याचे फायदे

१. अपचन, पोटदुखी आणि अजीर्ण साठी दालचिनी उपयुक्त आहे. दालचिनी जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही. दालचिनीमुळे मळमळ, उलटी आणि जुलाब थांबतात. तसेच जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो.

२. अंगावरून जाणे, गर्भाशयाचे विकार आणि गनोरिया यावर दालचिनी उपयुक्त आहे.

३. दालचिनीची पाने आणि अंतर्साल केक, मिठाई आणि स्वयंपाकाची लज्जत वाढवण्यासाठी वापरतात. दालचिनीचे तेल सुगंधी द्रव्यात, मिठाईत आणि पेयात वापरतात.

४. डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटून लेप लावावा.

५. मुख दुर्गंधी आणि दातासाठीच्या औषधांमध्ये दालचिनी वापरतात.

६. दालचिनी ह्रदयविकारावर अत्यंत गुणकारी ठरते. दालचिनीमुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे ह्रदयविकार नियंत्रणात राहते.

७. दालचिनी शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते.

८. दालचिनीच्या नित्य सेवनाने PCOS मध्ये होणारा त्रास कमी होतो.


सौंदर्यासाठी दालचिनी चे फायदे काय आहेत ?

१. दालचिनीमध्ये असणारे ब्लिचींग एजंट तुमचा चेहऱ्याचा रंग उजळवतात. चिमूटभर दालचिनी आणि १ चमचा मध किंवा दही चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग कमी करते आणि त्वचा उजळवण्यास मदत करते.

२. मृत त्वचेमुळे त्वचा काळवंडलेली दिसते. दालचिनी त्वचेवरील मृत त्वचा काढून चेहरा मुलायम बनवते.

३. दालचिनीमध्ये जखम भरुन काढण्याची क्षमता असते. त्यामुळे दालचिनीचा उपयोग पायांच्या भेगांसाठी करतात.

४. दालचिनी केसांच्या मुळांकडे साठलेल्या घाणीला काढून केस वाढीला प्रेरणा देते.


दालचिनी खाल्याने होणारे नुकसान

  • दालचिनी उष्ण असलेने उन्हाळ्यात वापर कमी करावा.
  • दालचिनीमुळे पित्त वाढू शकते.
  • दालचिनी खाताना उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

दालचिनी बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

१. जेवणात दालचिनीचा वापर कसा करावा?

Ans – दालचिनी हा मसाल्याचा प्रकार आहे. विविध प्रकारच्या पाककृती, चहा आणि पारंपारिक पदार्थांमध्ये दालचिनीचा वापर केला जातो.

२. औषध म्हणून दालचिनीचा वापर कसा केला जातो?

Ans – अपचन, पोटदुखी आणि अजीर्ण कमी होण्यासाठी दालचिनी, सुंठ, जिरे आणि वेलदोडे सम प्रमाणात घेऊन बारीक करून गरम पाण्यासोबत घ्यावे. दालचिनी, मिरीपूड आणि मध हे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.

३. दालचिनी कोणी खाऊ नये?

Ans – दालचिनी मसाल्याचा पदार्थ असल्याने उष्ण असतो, म्हणून उष्ण प्रवृत्तीच्या व्यक्तीनी दालचिनी खाताना काळजी घ्यावी. तसेच उन्हाळ्यात दालचिनीचा वापर कमी करावा.

४. दालचिनी ला मराठीत काय म्हणतात?

Ans- दालचिनीला मराठीमध्ये कलमी असे म्हणतात.


  • मृणाली अकोलकर

📢 ( महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला दालचिनी बद्दल माहिती देणे असल्याकारणाने दालचिनीचा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊 )

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *