lasun in marathi

Benefits of garlic in marathi

लसूण खाण्याचे फायदे | Benefits of garlic in marathi

असं म्हणतात कि लसूण पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब आहे. समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात अमृताच्या प्राप्तीसाठी भांडण झाले अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला.

तो थेंब पृथ्वीवर रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला. आपल्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असलेला लसूण आदी काळापासून औषध म्हणूनही वापरण्यात येतो. यात 59% पाणी, 33% कर्बोदके, 6% प्रथिने, 2% आहारातील फायबर आणि 1% पेक्षा कमी चरबी असते.

या लेखात, आपण लसणाचा वापर, फायदे आणि नुकसान बघणार आहोत.
चला तर बघूया लसूण म्हणजे काय आणि दैनंदिन आहारामध्ये आपण लसणाचा चा वापर कसा करू शकतो.

लसूण चा परिचय

  • लसूण बारमाही वनस्पती आहे. लसूण साधारणतः 1 मीटर (3 फूट) पर्यंत उंच, ताठ वाढतो.
  • पानांचा आकार सपाट, रेषीय, घन आणि अंदाजे 1.25-2.5 सेमी (0.5-1.0 इंच) रुंद असतो. मधमाश्या, फुलपाखरे, पतंग आणि इतर कीटकांद्वारे त्याचे परागीकरण होते.
  • गोड, खारट, तुरट, कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा हा एकमेव कंद आहे.
  • संस्कृत मध्ये याला रसोन म्हणतात. रस + ऊन म्हणजे एक रस उणे असणारा.
  • लसूण हा शब्द मराठीत पुंल्लिंगी आहे, पण लसणाच्या पाकळीला लसणी (स्त्रीलिंगी) म्हणतात.
  • लसूण हे कांद्याच्या परिवारातील एक कंदमूळ आहे. कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते. लसूण कांदा व खोरट यांच्या ॲलियम या प्रजातीतील व लिलिएसी कुलातीलअसून ती मूळची मध्य आशियातील असावी असे मानतात.
  • इ.स.पू. ५००० ते ३४०० या काळात इजिप्शियन लोक कांदा व लसूण पिकवीत असत, असा पुरावा मिळतो. लसूण उत्पादनात जगामध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो. चीन जगात एकूण लागणाऱ्या लसणाच्या 76% लसणाचा पुरवठा करतो.
  • प्राचीन इजिप्शियन लोकं अन्न आणि पारंपारिक औषधामध्ये लसूणाचा वापर करत होते. यूरोप, रूमानिया व इजिप्त येथेही लसूण आता रुजला आहे.

लसूणचे इतर भाषेतील नाव

  • हिंदी – लहसुन
  • संस्कृत – उग्रगंध:, लशुनम् ,यवफल ,तीक्ष्णकंद:,रसोन
  • इंग्रजी – गार्लिक (Garlic)
  • तेलुगू – वेल्लूल्ली (Vellullu)

लसूण चे प्रकार

लसणाच्या दोन पोटजाती आहेत, जातींचे दहा प्रमुख गट आणि शेकडो जाती आहेत. मध्य आशियातून उद्भवलेल्या किमान 120 जाती आहेत, जे लसणाच्या जैवविविधतेचे मुख्य केंद्र आहे.

ऑफिओस्कोरोडॉन (Ophioscorodon) –

याला ओफिओस्कोरोडॉन किंवा हार्ड-नेकड लसूण म्हणतात, त्यात पोर्सिलेन लसूण, रोकामबोले लसूण आणि जांभळ्या पट्टे लसूण समाविष्ट आहेत. कधीकधी ही एक स्वतंत्र प्रजाती मानली जाते.

सॉफ्ट-नेकड –

यामध्ये आर्टिचोक लसूण, सिल्व्हरस्किन लसूण आणि क्रेओल लसूण समाविष्ट आहे.

लसूण मधील पोषकतत्व

१०० ग्रॅम लसूणमध्ये खालील प्रमाणे पोषकतत्व असतात

प्रथिने (Protein)0.6 ग्रॅम
कर्बोदक (Carbohydrate)33 ग्रॅम
फायबर (fiber)2 ग्रॅम
शुगर (Sugar)1 ग्रॅम
सोडियम (sodium)17 ग्रॅम
पोटॅशियम (potassium)401 ग्रॅम

लसूण खाण्याचे फायदे

1. कुष्ठरोगावर फायदेशीर

लसणामध्ये नैसर्गिकरीत्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणाऱ्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो.

2. वजन कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त

लसणामध्ये असणारे एँन्टी ओबेसिटी गुणधर्म लठ्ठपणा कमी करण्यात मदत करतात. याशिवाय लसणा खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे अनावश्यक चरबी बर्न होण्यात मदत मिळते.

3. हृदय स्वास्थ्यासाठी फायदेशीर

लसणात काही खास तऱ्हेचे कार्डिओ प्रोटेक्टीव गुणधर्म असतात. हे गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात.

4. सर्दी खोकल्यात लसुन फायदेशीर

लसणामध्ये अँटिबायोटिक आणि अँटी व्हायरल गुण असतात. सर्दी आणि खोकल्याच्या समस्यांमध्ये लसूण फायदेशीर ठरतो.

5. रक्तदाब नियंत्रणात फायदेशीर

रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी लसणाचे सेवन उपयोगी ठरू शकते. उच्च रक्तदाब पीडित व्यक्तीने  दररोज काही लसणाच्या पाकळ्या खायला द्याव्यात.

6. हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

लसणामध्ये हाडांना आवश्यक असे खनिजे मॅंगनीज आणि फॉस्फरस ,कॅल्शियम असतात. जे हांडांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
स्थिभंगामध्ये हाडे जुळवून आणण्यासाठी लसूणसिद्ध दूध अत्यंत उपयुक्त आहे.

कच्चा लसूण खाण्याचे फायदे

lasun khanyache fayde

लसूण खाण्याचे नुकसान

1. जर लसूण अँटीकोआगुलंट(anticoagulant-रक्त पातळ करणारे औषध) औषधांसह अधिक प्रमाणात खाल्ल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.

2.लसणामुळे गंभीर भाजल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत म्हणून  निसर्गोपचार आणि मुरुमांच्या उपचारांसह विविध कारणांसाठी लसूण बाह्यांगावर वापरात असाल तर  काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः, लहान मुलांचा बाह्यांगावर कच्चा लसूण वापरणे योग्य नाही.

3.लसूण अधिक प्रमाणात खाल्ल्याने तोंडाच्या दुर्गंधी सारख्या समस्या उद्भवू शकतात.

4.काही लोकांना लसूणाची ऍलर्जी असते.  ऍलर्जीमुळे अतिसार, तोंड आणि घशातील व्रण, मळमळ, श्वास घेण्यास त्रास होतो .

लसूण बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

प्रश्न 1- लसूणमध्ये कोणते घटक असतात?
उत्तर –
 लसणामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यात जीवनसत्त्वे B6 आणि C आणि आहारातील खनिजे मॅंगनीज आणि फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, थायमिन आणि पॅन्टोथेनिक आणि झिंक असतात. कच्च्या लसणाची रचना 59% पाणी, 33% कर्बोदके, 6% प्रथिने, 2% आहारातील फायबर आणि 1% पेक्षा कमी चरबी अशी असते.

प्रश्न 2- लसूण उत्पनामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर –
 लसूण उत्पनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

प्रश्न 3- लसूण कोणी खाऊ नये?
उत्तर –
 लसूण तीक्ष्ण,उष्ण असल्याने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती,गर्भवती महिलांनी खाऊ नये.

प्रश्न 4- लसूणाचा वापर आहारामध्ये कसा वापरावा?
उत्तर –
 मसाल्याचा पदार्थ म्हणून लसूण चवीला वापरतात. लसूण घालून उकळलेले दूध पिल्यास जुनाट खोकला दमा यांचा नाश होतो. भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करू शकतो.
तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो.

प्रश्न 5- लसणाची चव कशी असते ?
उत्तर –
 कांद्याप्रमाणे कच्च्या लसणाला उग्र वास व चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते.

प्रश्न 6- लसणाचा वापर औषध म्हणून कसा करावा ?
उत्तर –
 हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दूध दिले असता हाड लवकर बरे होते. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप लावल्यास सूज असणाऱ्या व्याधीत सूज कमी होण्यास मदत  होते. पण लसूण उग्र असल्यामुळे बाह्यांगावर वापर करताना काळजीपूर्वक वापरावा. याने त्वचा जळू शकते.

लसूण खाण्याचे फायदे हे आर्टिकल तुम्हाला कसे वाटले. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • मृणाली आकोलकर

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला लसूण खाण्याचे फायदे बद्दल माहिती देणे असल्याकारणाने लसूण चा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *