अवकॅडो म्हणजे काय? व त्याचा वापर । Avocado in marathi

Avocado meaning in marathi

निरोगी शरीर आणि आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणे खूप महत्वाचा आहे. या कामात फळे महत्वाची भूमिका बजावतात. कारण कि, त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. आपल्याला माहिती असलेले अशी काही फळे आहेत, ज्यांचा आरोग्यासाठी सुपरफूडमध्ये समावेश आहे. जसे कि, केळी, सफरचंद, अनार, द्राक्ष, चिक्कू इत्यादी अशेच एक फळ म्हणजे अवकॅडो.

अवकॅडो जगातील सर्वाधिक लोकप्रिय फळांमध्ये गणली जाते. याची चव थोडी लोणीसारखी असते, म्हणून त्याला लोणी फळ देखील म्हणतात.

avocado meaning in marathi

avocado in marathi name

अनुक्रमणिका

अवकॅडो म्हणजे काय.? (Avocado in marathi)

अवकॅडोला वैज्ञानिक भाषेत पर्सिया अमरीकाना म्हटले जाते. असे मानले जाते की, या विशिष्ट फळाची उत्पत्ती सुमारे सात हजार वर्षांपूर्वी दक्षिण मेक्सिको आणि कोलंबिया मध्ये झाली आहे. हे मोठ्या आकाराचे बेरीसारखे असलेले फळ आहे. ज्याची बी मोठी आहे.

तसेच मोठ्या आकारामुळे, हे अ‍ॅलिगेटर पियर्स तर हिंदी मध्ये रुचिरा किव्हा मक्खनफल म्हणून देखील ओळखले जाते. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल कि, अवकॅडो ला मराठी मध्ये काय म्हणतात? (avocado meaning in marathi)

अवकॅडो ला मराठी मध्ये अवकॅडोच म्हणता येईल कारण कि, अवकॅडो हे भारतीय फळ नसल्याकारणाने, त्याचे जे इंग्रजी नाव असेल तेच आपण म्हणू शकतो. लोक बहुतेकदा विचार करतात अवकॅडो एक फळ आहे की भाजी..? खरं तर, अवकॅडो हे एक फळ आहे. एवोकॅडो खारट आणि गोड दोन्ही पदार्थांमध्ये आढळतो.

अवकॅडो मध्ये मोठ्या प्रमाणात फैटी एसिड (Fatty Acids) सोबतच जीवनसत्व अ, ब, ई, फायबर, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आढळते. ते गडद हिरव्या रंगाचे फळ आहे. अवकॅडो मध्ये साखर चे प्रमाण खूप कमी आहे.

याव्यतिरिक्त, अवकॅडो हे उर्जाचा एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे. बर्‍याच आजारांपासून मुक्त होण्यासाठी अवकॅडो फायदेशीर ठरू शकते. रक्तदाब, हृदय आरोग्य, मेंदूशक्ती, केस, त्वचा कोलेस्टेरॉल सामान्य करण्यासाठी, वजन कमी करण्याबरोबरच अनेक रोगांमध्ये अवकॅडो फायदेशीर ठरू शकतो.

हे वाचलंत का? –
* जर्दाळू (Apricot) खाण्याचे फायदे
* विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित आर्टिकल

अवकॅडो मध्ये असलेले पौष्टिक तत्व

प्रथिने (Protein) – 2 ग्रॅम
कार्बोहायड्रेट (Carbohydrate) –8.53 ग्रॅम
फायबर (Dietary fiber) –6.7 ग्रॅम
चरबी (Fat) –14.66 ग्रॅम
व्हिटॅमिन सी (Vitamin C) – 10 मिलीग्राम
व्हिटॅमिन-बी 6 (Vitamin B6) –0.257 मिलीग्राम
व्हिटॅमिन ई (Vitamin E) – 2.07 मिलीग्राम
साखर (Sugars) – 0.66 ग्रॅम
कॅल्शियम (Calcium) – 12 मिलीग्राम
सोडियम (Sodium) –7 मिलीग्राम
लोह (Iron) –0.55 मिलीग्राम
पोटॅशियम (Potassium) –485 मिलीग्राम
मॅग्नेशियम (Magnesium) – 29 मिलीग्राम
फॉस्फरस (Phosphorus) – 52 मिग्रॅ
तांबे (Copper) –0.19 मिलीग्राम
जस्त (Zinc) –0.64 मिग्रॅ
रिबॉफ्लेविन बी 2 (Riboflavin B2) –0.13 मिलीग्राम
सॅच्युरेटेड (Saturated) – 2.13 ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड (Monounsaturated) –9.80 ग्रॅम
थायमिन (Thiamine) –0.067 मिलीग्राम

अवकॅडो फळा चे फायदे (Avocado fruit benefits in marathi)

अवकॅडो चे चमत्कारी फायदे इतके आहेत कि, ज्यामुळे आपण चकित होऊ. अवकॅडो सहसा कच्चा खाल्ला जातो. त्याव्यतिरिक्त, अवकॅडो मिठाई आणि कोशिंबीरी म्हणून देखील वापरला जातो. अवकॅडो फळ हे विविध पोषक, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.

हे मोनोअनसॅच्युरेटेड फैटी ऍसिड चा एक चांगला स्त्रोत आहे. तसेच त्यामध्ये साखर कमी प्रमाणात आहे. याव्यतिरिक्त हा उर्जेचा एक चांगला स्त्रोत आहे. अवकॅडो मध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे आहेत.

तसेच अवकॅडो, मध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज, कॅल्शियम आणि जस्त असतो. याव्यतिरिक्त, अवकॅडोचे काही इतर फायदे खाली दिले आहेत..! चला तर त्याबद्दल एक एक करून माहिती घेऊया..!

कर्करोग होण्याचा धोका कमी करतो

कर्करोग सारखा प्राणघातक आजार टाळण्यासाठी अवकॅडो चा वापर देखील केला जाऊ शकतो. हे संशोधनात सिद्ध झाले आहे.

संशोधनानुसार, अवकॅडो प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकतो. यासाठी, या फळामध्ये उपस्थित मोनोअनसैचुरेटेड फॅट आणि फायटोकेमिकल्स उपयुक्त ठरू शकतात. तसेच असेही मानले जाते की, अवकॅडो मध्ये असलेल्या या फायटोकेमिकलमुळे कर्करोगाच्या पेशी प्रतिबंध करतो.

त्यामुळे कर्करोग होण्याचे जोखीम कमी होऊ शकते. या व्यतिरिक्त, त्यामध्ये असलेले फायटोकेमिकल्स प्रामुख्याने अन्ननलिका आणि आतड्यांसंबंधी कर्करोगाचा प्रभावी कमी करू शकतो.

अवकॅडोच्या वापरामुळं स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग (कॅन्सर) होण्याचा कमी धोका असतो. अवकॅडो मध्ये कॅरोटीनोड्स आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, हे दोन्ही कर्करोगाच्या महत्त्वपूर्ण कमतरतेस कारणीभूत ठरतात. अवकॅडो मध्ये ग्लूटाथिओन चा देखील समावेश आहे.

जो अँटीऑक्सिडेंट आहे. जो कर्करोगाच्या पेशी आणि मुक्त रॅडिकल्सच्या धोकादायक प्रभावांचे रक्षण करतो. या सर्व बाबी लक्षात घेता, असे मानले जाऊ शकते की, अवकॅडो फळांचा वापर करून कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.

तसेच हे देखील लक्षात असणे आवश्यक आहे की, कर्करोग हा एक जीवघेणा रोग आहे, ज्यावर योग्य वेळेत वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

यकृत आरोग्यास सहाय्यक आहे

यकृत (लिवर) हा शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. अवकॅडो हे यकृताचे नुकसान करण्यापासून संरक्षण करते. एका संशोधन असे आढळले आहे की, अवकॅडो यकृताचे अनेक रोगांपासून संरक्षण करतो आणि लिवरला अधिक मजबूत करतो.

तसेच संशोधनात आढळले कि, अवकॅडो नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत समस्या ला दूर करण्यात मदत करतो जसे कि, वाढीव वजन आणि लिवर वर सूज येणे इत्यादी. या जोखीम घटकांवर नियंत्रण ठेवून हे फळ फॅटी यकृत समस्या दूर करण्यास मदत करू शकते. हे असे म्हटले जाऊ शकते की अवकॅडो च्या सेवनाने यकृतचे आरोग्य राखण्यास मदत होते.

मूत्रपिंडाच्या (किडनी) संरक्षणासाठी उपयुक्त

मूत्रपिंड (किडनी) निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अवकॅडो फळांचा वापर देखील फायदेशीर मानला जाऊ शकतो. संशोधनात असे आढळून आले कि, अवकॅडो कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ कमी करण्यास मदत करू शकते.

अवकॅडो फळांचे सेवन केल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या यकृत नुकसानीस प्रतिबंध होऊ शकतो. अवकॅडोच्या बियांचे पावडर मूत्रपिंडाचे कार्य सुधारू शकते. यामुळे, अवकॅडो बियाणे पावडर देखील मूत्रपिंडासाठी उपयुक्त मानले जाऊ शकते.

हृदय आरोग्यासाठी फायदेशीर

हृदय निरोगी ठेवण्यासाठी अवकॅडो देखील खूप उपयुक्त आहे. अवकॅडो मध्ये बीटा-सिटोस्टिरोल आढळतो. ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदय रोगांपासून दूर राहते. संशोधनात असे आढळले आहे की, नियमित अवकॅडो खाल्ल्याने एच.डी.एल. कोलेस्ट्रॉलचे एंटीएथेरोजेनिक गुणधर्म वाढतात.

ज्यामुळे हृदय एथेरोस्क्लेरोसिसपासून दूर राहते. या फळांमध्ये असलेले पोटॅशियम हा हाइपरटेंश सोबत लढतो आणि रक्तवाहिन्या आणि धमनीचा ताण कमी करतो. यामुळे हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

अन्न पचविण्यात फायदेशीर

संशोधनात असे आढळून आले कि, अवकॅडो आतड्यांची कार्ये सुलभ करतो आणि अन्न सहजपणे पचवतो. यात विद्रव्य आणि अघुलनशील तंतु (Fibers ) असतात. जे पाचन तंत्राची क्रिया सुधारतात.

हे दोन तंतू आहेत जे अन्न पचवण्यासाठी पुरेसे महत्वाचे आहेत कारण ते मल तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे आतडे सहजपणे अन्न पचवतात आणि त्याची कार्ये सुलभ करतात.

ते गैस्ट्रिक और डाइजेस्टिव जूस ला स्टीमूलेट करतात. जेणेकरून शरीर पोषक सहजतेने शोषून घेते. यामुळे त्या व्यक्तीला अतिसार (डायरिया) आणि बद्धकोष्ठतेची (कब्ज) आजार होत नाही. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

डोक्यावर केस आणि त्वचेचे आरोग्य सर्वांसाठी खूप महत्वाची आहे, अवकॅडो मध्ये पोषक द्रव्ये असतात. ज्यामुळे त्वचा निरोगी होते. कोरडी आणि खराब होणारी त्वचा काढून ते त्वचेला मऊ करते.

अवकॅडोमध्ये जीवनसत्त्वे ए, बी, बी-1, बी-2, ई आणि पोषक घटकांच्या अस्तित्वामुळे, हे कॉस्मेटिक पदार्थांमध्ये देखील वापरले जाते. जे त्वचेला उजळ व सुंदर बनवते.

हे कोरडे आणि खराब झालेल्या केसांना पण पोषण प्रदान करतात. बीटा कॅरोटीन आणि लाइकोपिन सारख्या दोन सेंद्रिय संयुगे अवकॅडोमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. ज्यामुळे ते त्वचेला टोन करते आणि त्यामुळे वय वाढण्याची गती कमी करते.

avocado fruit in marathi

avocado in marathi

avocado in marathi

डोळ्यांसाठी फायदेशीर

अवकॅडो चे फायदे डोळ्यांसाठी देखील पाहिले जाऊ शकतात. अवकॅडो हे ल्युटीन आणि जेक्सैथिन सारख्या कॅरोटीनोइड्सने समृद्ध आहे, जे डोळ्यांचे आरोग्य राखू शकतात. तिथेच, ल्यूटिन हे वृद्धत्वामुळे होणाऱ्या मोतीबिंदू आणि डोळ्याच्या होणाऱ्या आजारांपासून डोळे संरक्षित करते.

डोळ्याच्या बहुतेक आजारांमुळे डोळ्याच्या ऊतींमध्ये मुक्त रॅडिकल्स जमा होतात. अवकॅडोमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट्स आणि कॅरोटीनोईड्स डोळ्यांमधील मुक्त रॅडिकल्सचा धोका कमी करतात आणि डोळे निरोगी ठेवतात.

हाडे मजबूत करतो

बोरॉन नावाचे खनिज (मिनरल) कच्च्या अवकॅडो मध्ये आढळतो. जे कॅल्शियम अवशोषण (Absorption) ला वाढवून हाडांना फायदा होऊ शकतो. हे विशिष्ट फळ व्हिटॅमिन- के मुळे समृद्ध आहे.

जे हाडांच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे पोषक ऑस्टिओप्रोटेक्टिव्ह (हाडांना मजबुतीकरण) करणारे पोषण देतो. तसेच, त्यात विरोधी दाहक (एंटी इंफ्लामेट्री) गुणधर्म देखील आहेत. यामुळे ते सांध्यातील वेदना कमी करण्यास आणि सूज कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते.

वजन कमी करण्यास मदत करतो

संशोधनात असे दिसून आले आहे की, अवकॅडोमध्ये कमी कॅलरी आहेत, ज्याद्वारे हे वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, त्यामध्ये असलेले फायबर पाचन क्रिया मजबूत करण्यासह चरबीचे शोषण कमी करण्यास मदत करू शकते.

या व्यतिरिक्त, त्यात उपस्थित मोनोसॅच्युरेटेड फैटी एसिड चरबी कमी करण्यास मदत करू शकतात. हे वाढीव वजन कमी करण्यात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते.

संधिवात (आर्थराइटिस) मध्ये आराम देतो

अवकॅडो मध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे संधिवात उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत. यात फायटोकेमिकल, फॅनोइड, कॅरोटीनोइड, फायटोस्टेरॉल, फॅटी अल्कोहोल आणि ओमेगा -3 फैटी एसिड आढळतात.

ज्यामुळे पायाच्या, सांधे आणि स्नायूंचा दाह कमी होतो आणि संधिवातापासून संरक्षण होते. संधिवात टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी जगभरातील लोक अवकॅडोचा वापर करतात.

तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

तोंडापासून दुर्गंध येत असल्यास, अवकॅडो खाण्यामुळे दुर्गंध दूर होण्यास मदत होते. जे सहसा अन्नाचे पचन आणि अस्वस्थ पोट यामुळे होते. योग्य पचनामुळे तोंडाचा दुर्गंध दूर होण्यास मदत होते.

अवकॅडो मध्ये उपस्थित बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटिऑक्सिडेंट फ्लॅनोइड तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. याशिवाय अवकॅडो तोंडातील कर्करोगापासून आपले संरक्षण करतो.

मधुमेह (डायबिटीज) नियंत्रित करतो (avocado for diabetics)

टाईप- २ च्या डायबेटिस मध्ये अवकॅडो फायदेशीर ठरू शकतो. संशोधनात असे सूचित केले गेले आहे की, मोनोसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हे, लिपिड प्रोफाइल ला सुधारित करून रक्तातील साखरेत वाढ नियंत्रित करू शकतो. त्याच कारणाने अवकॅडो हे मधुमेह असल्यानी खाणे आवश्यक आहे.

कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो

अवकॅडो लिपिड प्रोफाइल सुधारू शकतो. तसेच वाढीव कोलेस्ट्रॉल ला देखील नियंत्रित करतो.या आधारावर, आपण असे म्हणू शकतो कि, अवकॅडो च्या सेवनाने वाढीव कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत केली जाऊ शकते. म्हणून अवकॅडो कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी योग्य आहे.


अवकॅडो चा वापर कसा करायचा..?

  • अवकॅडो हे सकाळी ब्रेड आमलेट सोबत नाश्तामध्ये खावे.
  • कोशिंबीर (फ्रूट सलाद) म्हणून अवकॅडो खावे.
  • ग्रिल ब्रेड सँडविच मध्ये अवकॅडो टाकून खावे.
  • अवकॅडो ची आईस्क्रीम बनवून खावे.
  • अवकॅडो फ्रेंच फ्राई देखील बनवू खाऊ शकता.

अवकॅडो खाण्यामुळे होणारे तोटे

अवकॅडो फळ हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अवकॅडो खाल्याने आपल्याला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. तसेच अवकॅडो चे अधिक प्रमाणात सेवन हे बर्‍याच प्रमाणात हानिकारक देखील ठरू शकते. चला तर बघूया जास्त प्रमाणात अवकॅडो खाल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतो.

  • अवकॅडो च्या सेवनामुळे काही लोकांना एलर्जी होऊ शकते.
  • कमी कॅलरीमुळे अवकॅडो वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते, परंतु त्यात चरबीचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच, त्याचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते. म्हणून, लठ्ठपणा असलेल्या लोकांनी अवकॅडो जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.
  • अवकॅडो चे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. आपण जास्त प्रमाणात अवकॅडो खाल्यास हे आपल्या शरीरास हानी पोहोचवू शकते.

भारतात अवकॅडो ची शेती

भारतात अवकॅडो ची लागवड फार कमी प्रमाणात केली जाते, परंतु भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात अवकॅडो ची शेती खास करून व्यापारिक दृष्ट्या केली जाते. ज्या भागांमध्ये अवकॅडो सर्वाधिक ची शेती केली जाते, त्यामध्ये महाराष्ट्रातील कुर्ग, तामिळनाडूचा डोंगर उतार, तसेच केरळ आणि कर्नाटकातील काही भाग या शेती साठी समाविष्ट आहेत.

उत्तर भारतात एकच राज्य आहे जिथे अवकॅडो चे पीक घेतले जात आहे. पूर्व हिमाचलच्या सिक्कीम राज्यात 900 ते 1500 मीटर उंचीवर अवकॅडो ची लागवड केली जाते.

अवकॅडो शेतीसाठी अनुकूल हवामान

अवकॅडो ही दक्षिण अमेरिकन उपखंडातील मूळ वनस्पती आहे, ज्यामुळे त्या वनस्पतींना उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे. 20 ते 30 अंश तापमान असलेल्या भागात, जेथे 60 टक्क्यांपर्यंत आर्द्रता आढळते, तेथे त्याचे उत्पादन चांगले मिळते. त्याची झाडे 5 अंशापर्यंतचे तापमान थंडीत सहज सहन करतात, परंतु जर तापमान 5 अंशांपेक्षा कमी असेल, तर झाड खराब होऊ लागते. याशिवाय तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असल्यास फळे व फुले दोन्ही कोमेजून पडतात. त्यामुळे अवकॅडो ची शेती प्रामुख्याने तामिळनाडू आणि केरळमध्ये केली जाते.


अवकॅडो बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

प्रश्न १. – एका दिवसात किती अवकॅडो खाऊ शकतो?
उत्तर – एका दिवसात अर्धा अवकॅडो फळ (68 ग्रॅम) खाऊ शकतो.

प्रश्न २. – कच्चा अवकॅडो खाऊ शकतो का?
उत्तर – होय, अवकॅडो फळ हे जास्त कच्चा खातात.

प्रश्न ३. – अवकॅडो फळ हे रिकाम्या पोटी खाऊ शकतो का?
उत्तर – रिकाम्या पोटी अवकॅडो चे सेवन केल्याने गॅस आणि पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.

  • सागर राऊत

संदर्भ (References)


( 📢 महत्वाची सूचना –  हे आर्टिकल तुम्हाला अवकॅडो बद्दल माहिती देणे असल्याकारणाने अवकॅडो चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल.

माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. धन्यवाद… 😊 )

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment