जर्दाळू खाण्याचे फायदे । Apricot in marathi

जर्दाळू खाण्याचे फायदे।apricot in marathi


apricot in marathi name

apricot in marathi name

जर्दाळू / jardalu benefits in marathi

या दगदगीच्या जीवनात आपण आरोग्या कडे लक्ष दयाला विसरतो, त्यामुळे अनेक आजार आपल्याला होत असतात. जर्दाळू या पदार्थाचे नाव आपण ऐकलं असेल यात अनेक प्रोटीन युक्त जीवनसत्त्वे अ, क, ई, के आहे.

तसेच कमी प्रमाणात असलेली जीवनसत्त्वे तांबे, पोटॅशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि समृद्ध खनिज पदार्थ ही त्यात आढळून येतात.

जर्दाळू हा देखील आपल्या आहारातील फायबरचा उत्कृष्ट मोठा स्रोत आहे. याच बरोबर त्यामध्ये असंख्य कॅरोटीन्स आहेत ज्यामुळे डोळे आणि दृष्टी, निरोगी त्वचा, श्लेष्मल त्वचा आणि फुफ्फुस आणि तोंडाच्या कर्करोगापासून आपले संरक्षण होते. जर्दाळू मुळे विटामिन सी जास्त प्रमाणात शरीराला मिळते.

ज्यांना लठ्ठपणा च्या समस्या आहे किंवा वाढलेले वजन ही त्यांची भीती असते, त्यामुळे त्या लठ्ठपणावर ते अनेक उपचार करतात. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ते जिम लावतात, योगा करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाईज आणि डाएट्स करतांत.

योग आणि व्यायाम हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. परंतु डाएटच्या नावाखाली उपाशी राहणे किंवा कमी जेवण करणे योग्य नाही. त्यामुळे अनेकदा शारीरिक, मानसिक आजार उद्भवतात. त्याऐवजी योग्य आहार घेतल्याने वजन आटोक्यात राहतं. शिवाय काही पदार्थांमुळे वजन कमी
करता येत.

अनेक प्रकारच्या फळेभाज्या आणि योग्य आहार असल्यास चांगल्या प्रकारे वजन कमी करता येते आणि चांगल्या आहार सेवनामुळे मानसिक व शारीरिक संतुलन व्यवस्थित राहते. Apricot ला मराठी मध्ये जर्दाळू असे म्हणतात (apricot meaning in marathi) इंग्लिश मध्ये ड्राईड अप्रिकोट आणि हिंदीमध्ये खुबानी म्हणत असलेल्या या फळांमध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन शरीराला मिळतात.

जर्दाळू हे फळ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, आणि तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जर्दाळूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतर पोषक आढळून येतात. फायबरचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणजे जर्दाळू.

फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर्दाळू खाल्ल्याने वजन कमी होते, आणि गॅस्ट्रिक आजारांपासून बचाव होतो. त्यामुळे आज आपण जर्दाळू खाण्याचे विविध फायदे बघणार आहोत ते फायदे खालील प्रमाणे –

हे वाचलंत का? –
* ऑलिव्ह तेलाचे फायदे
* काजू खाण्याचे फायदे जाणून अचंबित व्हाल.!

जर्दाळू खाण्याचे फायदे (jardalu benefits in marathi )

apricot marathi

apricot fruit in marathi

१) पचनशक्ती सुधारते :–

शरीरातील पचनशक्ती जर व्यवस्थित रित्या काम करत नसेल, तर लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे शरीरातील पचनशक्ती किंवा पचनक्रिया सुधारवणे आपल्या हातात आहे. त्यामुळे लठ्ठपणा नाहीसा होऊ शकतो.

जर्दाळू एक असं फळ आहे की ज्यात इतर फळांच्या तुलनेत फायबर मोठ्या प्रमाणात असते. नियमित जर्दाळू खाल्ल्याने आपली पचनशक्ती चांगली होते आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतात आणि त्यामुळे वजन आटोक्यात राहते.

२) त्वचेसाठी उपयुक्त :-

त्वचेसंबंधित असणाऱ्या समस्यांवर जसे की ड्राय स्कीन असणे, खाज
येणे, पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी जर्दाळू अत्यंत फायदेशीर असते आणि तसेच जर्दाळूचा वापर केल्याने सुरकुत्या ही नाहीश्या होता.

जर्दाळूचे तेल त्वचेचसाठी खूप गुणकारी आहे. हे तेल त्वचेत लवकर शोषले जाते आणि हे लावल्यामुळे त्वचा तेलकट असेल तर तो तेलकटपणा नाहीसा होतो.

३) रक्त शुध्दीकरणासाठी ही फायदेशीर ठरते :-

शरीर आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी जर्दाळू उपयोगी राहते. जर्दाळुमध्ये लोह असल्यामुळे अशक्तपणापासून ते आपल्याला सुरक्षित ठेवते.

त्यामुळे आपले शरीर आरोग्यदायी राहते आणि अशक्तपणामुळे होणाऱ्या इतर आजारांपासून आपल्याला सुटका सुटका मिळते. जर्दाळूच्या सेवनामुळे रक्तप्रवाहाची गतीचे प्रमाण वाढते आणि रक्त शुध्दीकरणासाठी त्याचा फायदा होतो.

४) हृदयरोगासाठी फायदेशीर ठरते :-

जर्दाळू मध्ये जास्त प्रमाणात फायबर रेट असल्यामुळे हृदयासाठी ते चांगले असते. जर्दाळुचे सेवन कखराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते आणि त्यामुळे हृदयरोग दूर करण्यास मदत होते.

यामध्ये पोटॅशियम असल्या कारणामुळे ही हाडे मजबूत असतात आणि त्यामुळे हृदयरोगासाठी ते फायदेशीर ठरते.

५) डोळ्याच्या (दृष्टी) आरोग्यासाठी :-

संशोधनानुसार सिध्द झाले आहे की जर्दाळूला रंग देणारे रंगद्रव्य डोळ्याचे आरोग्य सुरक्षित ठेवते. व्हिटॅमिन ए, सी आणि ई जर्दाळू मध्ये असल्याकारणामुळे दृष्टीच्या संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता कमी प्रमाणात असते.

त्यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी प्रमाणात जाणवतो. दिवसातुन 2-3 जर्दाळू सेवन केल्यामुळे व्यक्तींमध्ये वय-संबंधित मॅक्युलर र्हास होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो.

६) हाडे मजबूत होतात :-

हाडांचे आरोग्य सुधारते जर्दाळूमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांचा विकास होण्यास ते मदत करतात आणि आरोग्यासाठी ते खूप महत्वाचे ठरते.

विशेष म्हणजे, योग्य शोषण आणि कॅल्शियम वितरणासाठी पोटॅशियम देखील महत्वाचे आहे आणि जर्दाळू देखील पोटॅशियम युक्त असल्यामुळे हाडे मजबूत राहण्यास त्याची मदत होते.

७) रक्त गुठळ्या :-

शरीरात खुल्या जखमेच्या रूपाने रक्ताचे नुकसान होऊ नये म्हणून आपले रक्त गुंडाळले केले पाहिजे. जेणेकरून उच्च व्हिटॅमिन के सह जर्दाळू रक्त गुठळ्या चे प्रमाण शारीरिक आरोग्या नुसार व्यवस्तीत राहते. ज्यांना रक्त गुठल्याचा त्रास होत असल्यास त्याने हे सेवन करू नये.

८) प्रतिकारशक्ती वाढते :-

जर्दाळूचे नियमीत सेवन केल्यामुळे दमा, सर्दी आणि फ्लूचा समावेश जास्त प्रमाणात होत नाही. जर्दाळू मधील व्हिटॅमिन ई एंटीऑक्सिडेंट असल्या कारणामुळे ते मुक्त रॅडिकल्सशी लढण्याचे कार्य करते.

ही प्रक्रिया रोग प्रतिकारशक्ती वाढवते जेणेकरून सर्दी आणि फ्लूसारख्या समस्यांना पूर्ण पणे बंद होण्यास मदत होते. जर्दाळू हे बीटा कॅरोटीनने समृद्ध असल्याकारणाने, ते ताप उपचारात मदत करते.

९) चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीश्या होतात :-

जर्दाळू कर्नल पासून तयार केले जाते. जर्दाळू फळाची साल आपल्याला त्वचेच्या पृष्ठभागावरील जुन्या मृत त्वचेच्या पेशीपासून मुक्त करण्यासाठी वापरली जाते.

त्यामुळे पेशींचे पुनरुज्जीवन होते, त्वचेचे खराब झालेले समोरील भाग पेश्या काढून टाकते आणि त्यामुळे बारीक रेषा आणि लहान सुरकुत्या चेहऱ्यावर येतात आणि त्या काढून टाकण्यास जर्दाळूची मदत होते.

जर्दाळू तेल त्वचेची स्पष्टता, लवचीकपणा ठेवण्यास मदत करते. त्वचेवर पुनरुज्जीवन आणि पौष्टिक परिणामांमुळे हे अरोमाथेरपी मसाजमध्ये वारंवार तेल वापरले जाते. जर्दाळू चे तेल हे मऊ नैसर्गिक तेल आहे आणि ते गोरोदर बाई साठी देखील वापरले जाते.

जर्दाळू खाण्यामुळे होणारे नुकसान

जर्दाळू मर्यादित प्रमाणात आणि औषधाच्या स्वरूपात घेतल्यास त्याचा फायदाच होतो. तसेच याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने जर्दाळू पासून हानी होऊ शकते. जसे कि,

  • जर्दाळूचे विषारी परिणाम देखील होऊ शकतात. असे म्हटले जाते, की जर्दाळू खाल्ल्याने मुलांना विषबाधा होऊ शकते.
  • वाळलेल्या जर्दाळू नीट चघळल्यानंतरच खा, अन्यथा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात.
  • जर कोणाला जर्दाळू किंवा वाळलेल्या जर्दाळूची ऍलर्जी असेल, तर त्याचे सेवन टाळावे.
  • जर्दाळूच्या बियांच्या आत असलेल्या कर्नलचे सेवन केल्याने हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.

जर्दाळू (Apricot) बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1- जर्दाळू (Apricot) चे उपयोग काय आहेत?
Ans-
जर्दाळू हे एक प्रकारचे फळ आहे, ते खाण्यासाठी वापरले जाते. याशिवाय जर्दाळूपासून काही सौंदर्य उत्पादनेही बनवली जातात.

Q.2- रात्रीच्या वेळेला जर्दाळू खाऊ शकतो का?
Ans- रात्री नेहमी ताजे फळ खावेत, कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. पण तुम्ही नेहमी अशी फळे निवडावी, ज्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असेल, अशा वेळेस तुम्ही केळी, खजूर, जर्दाळू इत्यादी प्रकारची फळे खाऊ शकता. यामुळं तुम्हाला चांगली झोप येण्याचा फायदा होईल

Q.3- जर्दाळू कोणत्या हंगामात वाढतात?
Ans- जर्दाळूचा हंगाम मे ते ऑगस्ट पर्यंत असतो, या महिन्यांत तो पूर्णपणे पिकतो आणि तयार होतो.

Q.4- जर्दाळू फळ पिकलेले आहे की नाही हे कसे ओळखावे?
Ans-
जर्दाळूचे फळ जेव्हा हलके सोनेरी आणि केशरी रंगाचे होऊ लागते. तेव्हा त्याच्या आतून एक गोड सुगंध येऊ लागतो. जेव्हा तुम्ही त्यांना दाबता. तेव्हा ते थोडेसे पिळायला लागते, याचा अर्थ जर्दाळू फळ पूर्णपणे पिकलेले आहे. जेव्हा फळाचा रंग हिरवा असतो, तेव्हा ते काचे असतात.

Q.5- जर्दाळू खाल्ल्याने वजन वाढू शकते का?
Ans- नाही, याउलट जर्दाळू मर्यादित प्रमाणात खाऊन वजन कमी करता येते.

Q.6- एका दिवसात किती जर्दाळू खाऊ शकतो?
Ans-
त्याचे अचूक प्रमाण स्पष्ट नाही, परंतु सर्वसाधारणपणे, सुमारे 50 ग्रॅम एका दिवसाला खाण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकते.

Q.7- जर्दाळू भारताच्या कोणत्या भागात आढळते?
Ans-
हे भारतात कोठेही आढळू शकते, परंतु त्याची लागवड शक्यतो, थंड प्रदेशात केली जाते.

  • मधुरा जोशी

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला जर्दाळू बद्दल माहिती देणे असल्याकारणाने जर्दाळू चा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment