काजू खाण्याचे फायदे जाणून अचंबित व्हाल.!

cashew in marathi

kaju-khanyache-fayde-mahitilake

kaju benefits in marathi

काजू खाण्याचे फायदे | Kaju benefits in marathi

काजू मध्ये पोषक घटक असतात. जे हृदयाच्या आरोग्यास, मेंदूच्या सामान्य कार्यास, पचन क्रिया सुरळीत राखण्यास आणि बरेच शारीरिक कार्य करण्यास उपयुक्त आहे.

काजूमध्ये कॉपर, मॅंगनीज, झिंक आणि फॉस्फरस अशे खनिज पदार्थ असतात. ते आपल्या शरीरासाठी कसे आवश्यक आहेत ते पाहू या.

काजू मधील पौष्टिक घटक

१०० ग्रॅम. काजू मध्ये ५५३ कॅलरीज मिळतात. काजू मध्ये चरबी, प्रथिने आणि फायबर जास्त प्रमाणात असतात. ते लोह, पोटॅशियम, जस्त, सेलेनियम, तांबे, मॅंगनीज, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासह खनिजांचे समृद्ध स्रोत आहेत. काजूमध्ये थायमिन, व्हिटॅमिन बी-६ आणि व्हिटॅमिन के (k) देखील असतात.

हाडांचे आरोग्य, पचन क्रिया, डीएनए संश्लेषण, लैंगिक कार्ये, नेत्रदृष्टी इत्यादींसाठी तांबे, मॅंगनीज आणि जस्त सारखी खनिजे आवश्यक आहेत.

खरं तर आपल्या शरीरातील प्रत्येक कार्य या सर्व आवश्यक खनिजांद्वारे चालना आणि नियंत्रित केले जाते.

  • हृदयरोग होण्याचे जोखीम कमी करतो:- होय, काजूमध्ये शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करणारे आणि हृदयविकाराच्या अनेक आजारांना प्रतिबंधक घालणारे पौष्टिक घटक असतात. काजूचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्याने चांगले आरोग्य मिळण्यास मदत मिळते आणि त्यामुळे हृदयातील अनेक समस्या टळतात.
  • मधुमेह होण्याचा धोका कमी होतो:- काजूमध्ये कोलेस्ट्रॉल नसतो आणि साखर चे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे काजू हा आरोग्यासाठी चांगला पर्याय बनतो. टाइप २ चा मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठी काजू चे सेवन योग्य आहे.
  • अशक्तपणा कमी करतो:- शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो आणि जर आपण त्यामधून जात असाल तर तुम्ही आहारामध्ये काजूचे सेवन करू शकता. कारण काजू हे अशक्तपणापासून बचाव करणारे लोहाचे समृद्ध स्त्रोत आहे.
  • इम्यून सिस्टमला बूस्ट अप करतो:- काजू हे जस्ता (zinc) ने भरलेला आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, जे जखमांना बरे करते आणि अनेक रोगांवर लढा देते. गर्भवती महिलांसाठी काजूचे सेवन करणे महत्वाचे आहे (डॉक्टरचा सल्ला घ्यावा) कारण ते गर्भाशयातच बाळाची वाढ योग्यरीत्या करते.
  • डोळ्यांना सुरक्षित ठेवतो:- काजूमध्ये Zea Xanthin म्हणून ओळखले जाणारे एक अँटीऑक्सिडेंट असते, जे आपले डोळे संरक्षित ठेवण्यास आणि दृष्टी मजबूत ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

काजूचे रोज सेवन केल्याने हानिकारक (UV Rays) किरणांपासून डोळ्यांना संरक्षण देखील होते. रोज काजूचे सेवन करण्याचे हे काही फायदे होते, यादी येथे संपत नाही, या काजूचे इतर बरेच फायदे आहेत.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद.!

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment