Zopet Bolne Upay in Marathi
आजकाल लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या व्यस्थ जीवनामुळे, कित्तेक लोक 8 तास पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत.
ज्यामुळे ते अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. तसेच एक समस्या लोकांमध्ये खूप दिसून येत आहे. ती म्हणजे झोपेत बोलण्याची.
बरेच लोक झोपेत बोलतांना आढळतात. आणि त्यांना त्याबद्दल काही सांगितले, तर ते लगेच म्हणतात. छे असं होऊच शकत नाही. असे म्हणून त्यांच्यावर लावलेला आरोप धुडकावून लावतात.
ही समस्या केवळ वयस्करानमध्येच नाही, तर लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसे, तर लोक झोपेत बोलणे हे खूप सामान्य गोष्ट मानतात. परंतु हे लक्षण एखाद्या आजाराशी संबंधित आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
स्लीप टॉकिंग म्हणजेच झोपेत बोलणे, हा एक प्रकारचा ड्रीम डिसऑर्डर आहे. ज्याला पॅरासोम्निया असे म्हणतात.
पॅरासोम्नियामध्ये लोकांना झोपेत बोलण्याची सवय असते. तो असे काहीतरी बोलतो, जे इतर लोकांना काहीच काळत नाही.
सध्याच्या स्थितीत ही समस्या लोकांमध्ये खूप सामान्य झालेली आहे. यामागे काय कारणे असू शकतात? या आर्टिकल च्या माध्यमातून आपण जाणून घेऊया.!
लोक झोपेत का बोलतात?
1) थकवा: थकवा आणि झोपेचा खूप खोल संबंध आहे. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता, तेव्हा तुम्हाला गाढ झोप लागते. परंतु थकवा असूनही झोप न येण्याच्या समस्येने काही लोकांना त्रास होतो. यामुळेच असे लोक रात्री झोपेत अनेकदा बोलताना आढळतात.
2) डिप्रेशन: नैराश्य ही अशी स्थिती आहे, जी पीडित व्यक्तीला शांत झोपू देत नाही. झोपेत असतानाही व्यक्ती अनेक वेळा नैराश्याच्या कारणांचा किंवा त्याच्याशी संबंधित स्वप्नांचा विचार करत राहतो. अनेक वेळा नैराश्यामुळे त्याला कशाची तरी भीती वाटू लागते, ज्यामुळे तो व्यक्ती झोपेत बोलू लागतो.
3) झोपेचा अभाव: जर एखाद्याला 7-8 तास पुरेशी झोप मिळत नसेल, तर असा व्यक्ती झोपेत बोलायला लागतो.
4) खूप ताप असणे: खूप वेळा लोक झोपेत बोलतात त्यामागचे एक कारण हे त्यांना आलेला ताप देखील असू शकतो. ताप आलेला व्यक्ती झोपेत बडबड करतो.
यावर उपाय काय?
1. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
2. तणाव आणि चिंता यापासून दूर राहा.
3. डिप्रेशन ला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका.
4. सकारात्मक विचार करा
5. योगासन किंवा ध्यान करा.
6. तुमचे आवडते एक्टिविटीज़ वर काम करा.
हे वाचलंत का ? –