चुकीच्या स्थितीत झोपल्याने तुमची तब्येत बिघडू शकते, काय म्हणतात संशोधक

Sleeping Tips : जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेऊ शकत नाही, तेव्हा त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. इतकंच नाही, तर झोपण्याची चुकीची पद्धत आणि पोझिशन देखील आरोग्य बिघडू शकते. येथे जाणून घ्या काय म्हणते संशोधन

झोप येण्यासाठी घरगुती उपाय

Wrong Pattern Of Sleeping

zop yenyasathi upay

Wrong Pattern Of Sleeping : झोपतांना चुकीची पद्धतीने झोपल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होत, असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. होय, जर तुम्ही नेहमी चुकीच्या पॅटर्नमध्ये किंवा स्थितीत झोपत असाल, तर त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास सर्वात मोठी समस्या पोटाशी संबंधित होऊ शकते. म्हणूनच झोपण्याची योग्य पद्धत जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक वेळा पचन क्रिया बिघडते. तसेच, जर तुमचा झोपण्याचा योग्य वेळी नसेल तर तुमचे आरोग्यही बिघडते. हे एका संशोधनात आढळून आले आहे. झोपेच्या अनियमित पद्धतींमुळे तुमच्या पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

जसे की पोटात हानिकारक बॅक्टेरिया चा जन्म होणे, चांगले बॅक्टेरिया कमी होणे आणि पचनाच्या समस्या निर्माण होणे. इत्यादींचा समावेश आहे. चला तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..!

पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जर एखादी व्यक्ती रात्री उशिरा, किंवा दुपारी झोपली तर त्याचा एकूण आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच लोकांनी नेहमी 7 ते 8 तास पुरेशी झोप घेतली पाहिजे. तसेच, झोपताना नेहमी आपल्या झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या. याच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकाल.

संशोधनात काय समोर आले?

झोपण्याच्या चुकीच्या पद्धतींमध्ये असे आढळून आले आहे की, जर तुम्ही झोपले आणि 90 मिनिटांच्या अंतराने जागे झाले. तर त्याचे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. याचा परिणाम मायक्रोबायोमवर होतो. म्हणूनच तुमची झोपेची पद्धत आणि स्थिती निश्चित करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

योग्य झोपेची पद्धत आणि स्थिती

आधी तर, आपण दिवसा कधीही झोपू नये. कारण हि वेळ काम करण्याची असते. यावेळी, आपण ऑफिस किंवा घरगुती कामात आपला वेळ खर्च करावा. दिवसा झोपल्याने आळस सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच रात्रीचे जेवण केल्यानंतर एक तासानंतरच झोपावे.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻