अनिद्रा – insomnia meaning in marathi

नेहमी काम, व्यवसायाच्या धकाधकीतुन सुटका मिळते ती रात्री..! रात्री झोपतो त्याला संस्कृतमध्ये “भूतधात्री” असे संबोधले जाते. आपल्या नियमितच्या जीवनाचा महत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे “झोप”

ज्यामुळे आपल्या शरीरावर, त्वचेवर आणि मानसिक घटकांवर बदल होत असतो. जीवनातील सर्वात जास्त उर्जा देणारी गोष्ट म्हणजे झोप.

झोप सात ते आठ तास झालीच पाहिजे, असे डॉक्टर म्हणतात. जे ७ ते ८ तास व्यवस्थीत झोपतात त्यांना कोणत्याही प्रकारचा मानसिक, शारीरिक त्रास जाणवत नाही. परंतु ज्यांना झोप लागत नाही किंवा जे सात ते आठ तास झोपत नाहीत, त्यांना नेहमीच थकल्या सारखे वाटते.

त्यांच्यात प्रसन्नता राहत नाही. अपुरी झोप गरजेपेक्षा कमी किंवा जास्त झोप यामुळे माणसाला नेहमी अशक्तपणा, सुस्ती अशा समस्या जाणवत असतात.

वयोगटा प्रमाणे आपणास किती तासाची झोप आहे हे डॉक्टर नेहमीच सांगतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वय वर्ष एक ते सात वर्ष असलेल्या बाळांना दहा ते बारा तासाची झोप गरजेचे असते. वय वर्ष 7 ते 14 असलेल्या विद्यार्थ्यांना आठ ते दहा तासांची झोप गरजेचे असते, तर वय वर्ष 14 ते 21 असलेल्या मुलांना सात ते आठ तासाची झोप गरजेचे असते.

वय वर्षे 21 ते 35 या वयोगटातील लोकांना चार ते पाच तासाची झोप आवश्यक असते. तर वय वर्ष 50 असलेल्या वृद्धांना चार तास किंवा त्याहून कमी झोपेची गरज असते. ज्यांना या वेळेनुसार झोप येत नसेल तर त्यांना अनिद्रा असण्याची शक्यता असते.

अनिद्रा म्हणजे निद्रानाश ज्यांना झोप येत नाही असे लोक. अनिद्रा यालाच इंग्रजी मध्ये insomnia असे म्हणतात. अनिद्रा म्हणजे काय तर हा एक झोपेचा प्रकार आहे. ज्यांची झोप पूर्णपणे होत नाही. ज्यामुळे आरोग्य बिघडते ज्यांच्या मनात चिंता, काळजी, टेन्शन अशा प्रकारच्या गोष्टी असतात.

त्यांना ह्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते हा झोपेचा रोग आहे. ज्यात झोपेत खंड पडणे, झोप मोड होणे, झोप न येणे इत्यादी समस्या असतात.

हे वाचलंत का? –
* आपण किती दिवस न झोपता राहू शकतो?
* ध्यान करण्याचे मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक फायदे

cant fall asleep

insomnia meaning in marathi

insomnia in marathi

निद्रानाशाचे चे प्रकार – Types of Insomnia In Marathi

निद्रानाशाचे तीन प्रकार पडतात –

प्राथमिक निद्रानाश
माध्यमिक निद्रानाश व
तीव्र निद्रानाश

प्राथमिक निद्रानाश

यामध्ये खालील लक्षणे प्रखरतेने आढळून येतात ते म्हणजे.

  • झोपायला अडचण येणे, झोप न येणे.
  • नेहमीच्या झोपेच्या वेळी झोप न येणे किंवा मध्यरात्री कधीही जाग येणे.
  • झोप झाली असेल तरीही झोप न झाल्यासारखे वाटणे.

माध्यमिक निद्रानाश

  • या प्रकारच्या निद्रानाशाचे मध्ये अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक घटना संबंधित असतात.
  • यामध्ये दमा कर्करोग किंवा पिल्लू दोष इत्यादी सारख्या आजारांच्या प्रभावामुळे निद्रानाश उद्भवू शकतो.
  • यामध्ये खंडित झोप होत असते.

तीव्र निद्रानाश

  • हा निद्रानाश एक अनेक प्रकारच्या मानसिक तनाव व विचारांचा गोंधळ असतो त्यामुळे झोप येत नाही.
  • उशिरापर्यंत झोप न येणे किंवा सकाळी उठल्यामुळे निद्रानाश होणे यासारखे प्रकार यात आढळून येतात. या निद्रानाशाचे योग्य निदान करण्यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आपण वर नमूद केलेल्या निष्कर्ष आपल्याला जाणवत असतील अशी लक्षणे असल्यास त्यावर लवकरात लवकर उपचार केले पाहिजे.

निद्रानाशेचे लक्षणे – Symptoms Of Insomnia In Marathi

  • दिवसा झोप येणे.
  • थकवा अशक्तपणा जाणवणे.
  • उदास वाटत राहणे.
  • एकाग्रता करायला किंवा स्मरणशक्तीची समस्या आढळणे.
  • रात्री झोपताना त्रास होणे.
  • दिवसा थकल्यासारखे वाटणे.
  • दिवसा झोप येणे.
  • झोपेत असताना झोप पूर्ण न होणे झोपायला अडचण येणे.
  • जागरण होणे.
  • रात्री ही सर्वात उशिरा झोपून सकाळी लवकर जाग येणे.
  • सतत चिंता, काळजी करत राहणे.
  • चिडचिड होणे.
  • झोप न झाल्यामुळे चुका होणे.
  • कामात लक्ष न लागणे.

इत्यादी असंख्य निद्रानाश होण्याची कारणे आहेत. निद्रानाश ताण – तणाव किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा घटस्फोट झाल्यामुळे ही होण्याची शक्यता असते. एवढेच काय तर नोकरी किंवा व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे निद्रानाश उद्भवू शकतो. शारीरिक व्याधी आणि मानसिक विचार शैलीमुळे ही हा आजार होऊ शकतो.


निद्रानाशाचा धोका – Insomnia Risk Factors

  • निद्रानाशामुळे अनेक धोके होण्याची शक्यता असते.
  • कामाचा वेग मंदावतो.
  • शांत झोप नसल्यामुळे विचारांच्या घोळामुळे कामाचा वेग कमी होतो.
  • त्याच बरोबर झोपेतून वंचित राहिल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या जाणवता.
  • हृदयविकार रक्तदाब मधुमेह इत्यादी विकार होण्याची शक्यता असते.
  • त्वचेवरही निद्रानाशाचा परिणाम दिसून येतो.
  • काही रात्री झोप न झाल्यामुळे त्वचा पिवळी पडते.
  • डोळ्याखाली सूज येते.
  • त्वचेची चमक नाहीशी होऊन सुरकुत्या येतात.
  • तसेच शरीरावरील चरबी वाढते.
  • झोप न झाल्यामुळे लठ्ठपणाचा धोका असतो.
  • शारीरिक व मानसिक त्रासामुळे थकवा येत.

असल्याची तक्रार आढळते. मानसिक स्थिती व स्वभावामध्ये होणारे बदल हे नैराश्य संबंधित असतात. त्यामुळे शरीराचा कार्यपद्धतीमध्ये बदल घडून येतो निद्रानाशामुळे लक्ष केंद्रित केले जात नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लक्ष नसणे. अशा अनेक विपरीत परिणाम दिसून येतात. झोप न झाल्यामुळे विस्मरण होण्याची शक्यता असते. संशोधनातून असे कळाले, की झोपेमुळे शिकण्याची प्रक्रिया व स्मरणशक्ती यांना दोन वेगवेगळ्या प्रकारे मदत होते.

पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीची झोप पुरेशी होत नाही, त्या व्यक्तीला लक्ष केंद्रित करता येत नाही, त्यामुळे तो व्यक्ती चांगल्याप्रकारे शिकू शकत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे झोपेत स्मृती पक्क्या होत असतात आणि त्यामुळे नवीन माहिती ग्रहण करण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरते.


निद्रानाश कसा थांबवता येईल – Home remedies for insomnia

१) दिवसा झोपणे बंद केले गेले पाहिजे –

जेवण झाल्यावर दुपारीच झोपण्याची अनेकांना सवय असते किंवा थोड्यावेळ डुलकी घेणे, या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. या सवयीमुळे रात्रीचे झोपेचे चक्र बिघडण्याची शक्यता असते.

२) धूम्रपान मद्यपान बंद केले गेले पाहिजे –

झोपायला जाण्याआधी धूम्रपान किंवा मद्यपान करणे बंद केले पाहिजे. कारण जर तुम्हाला धूम्रपान किंवा मद्यपान करण्याची सवय असेल, तर त्यामुळे रात्रीच्या झोपेला तुम्हाला त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या झोपेच्या वेळेच्या चक्रांमध्ये बदल होऊ शकतो.

३) चहा कॉफीचे सेवन बंद केले गेले पाहिजे –

झोपण्या आधीचे चहा,कॉफी इत्यादी पदार्थांचे सेवन बंद केले पाहिजे, कारण चहा-कॉफी मध्ये आढळणाऱ्या कॅफीन या घटकामुळे आपण झोप टाळू शकतो, परंतु त्या कॅफीन मुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

४) झोपे पूर्वी वामकुक्षी घेणे टाळावी –

अनेकांना झोपण्यापूर्वी वामकुक्षी घेण्याची सवय असते, परंतु संशोधनानुसार बऱ्याच लोकांमध्ये निद्रानाशाचे प्रमुख कारण वामकुक्षी आहे. हे दिसून आले आहे त्यामुळे अर्धवट झोप मिळते.

५) झोपण्यापूर्वी व्यायाम टाळा –

झोपण्यापूर्वी कोणतेही व्यायामाचा प्रकार टाळा तसेच झोपेच्या गोळ्या किंवा औषध घेणे टाळा. कारण या झोपेच्या गोळ्या किंवा औषधांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

६) झोपण्यापूर्वी येणारा विचार चिंता काळजी यांसारख्या भावनिक गोष्टी टाळा –

झोपण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या चिंता, काळजी, विचार करत बसल्यामुळे तुमची झोप कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमच्या मेंदूला दुसऱ्या दिवसाला काम करण्यासाठी सज्ज होईल असा वेळ द्या विचार यामुळे तुमच्या मेंदूला थकवा जाणवेल. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते.

७) चुकीच्या पद्धतीने झोपणे टाळा –

झोपताना सरळ पाठीवर किंवा गुडघ्याजवळ उशी चा आधार घेऊन एका कुशीवर झोपणे उत्तम परंतु पोटावर किंवा पोटात पाय घेऊन झोपणे टाळा.


निद्रानाशेवर उपचार – Treatment of insomnia in marathi

१) रोज सकाळचा सूर्यप्रकाश घेणे, त्याच बरोबर व्ययाम करणे, आपल्या झोपेच्या साखळीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

२) झोप येत नसल्यास कपभर दुधात थोडे जायफळ उगाळून त्यात गूळ घालून ते रात्री घेत जावे. झोपेच्या आधी डोळ्यांवर तिळाच्या तेलाने मसाज करावे.

३) झोपायची नियमावली बनवुन घ्या त्यानुसार झोपत व उठत करावे.

४) झोपण्यापूर्वी मद्यपान धूम्रपान करू नका.

५) झोपण्या आधी व झोपे च्या वेळेत टीव्ही पाहण्याचे टाळा.

६) मोबाईल टीव्ही अशा गॅजेट्स पासून झोपण्याच्या दोन तास आधीपासून लांब राहा.

७) झोपण्यापूर्वी तनाव चिंता काळजी सोडून द्या.

८) झोप आल्यावर झोप टाळू नका.

९) नियमितपणे व्यायाम करा. शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी घ्या. रात्री झोपण्याच्या वेळी आधी व्यायाम करणे टाळा.

१०) डॉक्टरांच्या सल्ल्याने स्टिमुलस कंट्रोल थेरीपीचा फायदा करून घ्या. टीव्ही पाहणे व वाचणे खाणे किंवा पलंगावर झोपून काळजी करणे टाळा. जास्त वेळ झोपणे टाळा.

११) बऱ्याच लोकांना माहिती नसते, की झोप न येण्याचे कारण शरीरातील पोटॅशियम व मॅग्नेशियम कमी झाल्याने ही होते.

१२) झोपेच्या आधी इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचा वापर करायचे टाळा. त्यामुळे तुमची झोप खंडित होण्याची शक्यता असते.

१३) आयुर्वेदिक संतुलन आहार नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप हे चांगल्या जीवनाची पद्धत आहे.

१४) आहारात द्राक्षांचा वापर करा. द्राक्ष खाल्ल्यामुळे निद्रानाश सुधारण्यास मदत होते.

१५) निद्रानाशाचे जादूचे टॉनीक म्हणजे खायचा उस. ऊस खाल्ल्याने निद्रानाशाची समस्या दूर होतात.

– मधुरा जोशी


📢 महत्वाची सूचना – वरील दिलेले आर्टिकल हे तुम्हाला माहिती देण्याकरिता असल्याकारणाने वरील माहितीवर निर्भर राहू नये. नेहमी आरोग्य संबंधित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल.


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *