डोळ्याखाली काळी वर्तुळे का येतात आणि ते कसे घालवायचे?

डोळ्याखालील-काळे-डाग

डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय | Home remedies for dark circles in marathi

पांडा सारखे दिसणारे डोळे आपल्या डोळ्याभोवती असलेल्या गडद स्थितीचे वर्णन करतात. आपले डोळे आपल्या चेहर्याचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहे. डोळ्या भोवतीचे काळे डाग आपल्या डोळ्यांच्या सौंदर्यावर वाईट प्रभाव टाकू शकतात तसेच थकलेले आणि निथळलेले दिसू शकतात.

डोळ्याभोवती काळे डाग पडण्याचे सर्वात प्रमुख कारणे कोणती आहेत?

  • कॉम्पुटर वर बरेच तास काम केल्याने.
  • झोपेचा अभाव
  • सूर्यकिरण
  • आहारात पौष्टिकतेचा अभाव
  • अशक्तपणा
हे वाचलंत का? –
* डोळ्याची माहिती मराठी
* हृदय विकार टाळण्यासाठी काय करायला पाहिजे?

काळे डाग त्वरित काढली जाऊ शकतात?

“हो…..आपण डोळ्याभोवती चे काळे डाग काढू शकतो!” दुःखाची गोष्ट अशी आहे की काही परिणाम दर्शविण्यासाठी काही काळ ठराविक आहार घ्यावा लागतो.

तुम्ही डोळ्या भोवतील काळ्या वर्तुळांसाठी खास बनवलेल्या क्रीम लावाव्यात आणि नेहमी व्हिटॅमिन के (vitamin “K”) वर आधारित क्रीम चा वापर करावा.(याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

आपल्या डोळ्याभोवतीची त्वचा खूपच पातळ आणि कोमल आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा चेहरा पुसताना ते चोळणे किंवा साधारणपणे खेचू नये याची दक्षता घ्यावी.

आपण आपले डोळे नियमितपणे मॉइस्चराइझ केले पाहिजे. आपल्या डोळ्यांभोवतीची त्वचा पूर्णपणे कोरडी होऊ शकते. त्याकरिता आपण मॉइश्चराइझ ठेवण्यासाठी एक चांगला मॉइश्चरायझर वापरला पाहिजे.

मॉइश्चरायझर कसे वापरावे?

आपल्या हाताच्या बोटांवर काही मॉइश्चरायझर घ्या आणि हळूवारपणे आपल्या डोळ्याभोवती लावा. त्याला हळूच काळजीपूर्वक डोळ्याच्या भोवती गोल लावा.

आपल्या डोळ्यांसाठी आपण कोणत्या अत्यावश्यक गोष्टी केल्या पाहिजेत?

  • डोळ्याभोवती सनस्क्रीन न लावता उन्हात बाहेर जाऊ नका.
  • डोळ्याच्या संपूर्ण भागाला व्यापणारा सनग्लासेस घाला.
  • डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेला ओढू नका. डोळ्याची जागा कठोरपणे घासू नका.
  • कॉम्पुटर वर काम करताना डोळे मिटविणे विसरू नका. (एकसारखे कॉम्पुटर ला बघू नका.)
  • कॉम्पुटर वर काम करताना आपल्या डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी एआरसी कव्हर (ARC coating)चा चष्मा घाला.

काळ्या डाग घालवण्यासाठी फायदेशीर तेले

  • बदाम तेल (Almond oil)
  • चहा झाडाचे तेल (Tea tree oil)
  • कॅमोमाइल तेल (Chamomile oil)
  • ऑलिव तेल (Olive oil)

आपल्या डोळ्यात तेल जाऊ नये, म्हणून आपण काळजी घ्यावी. आपल्या डोळ्याभोवती भरपूर तेल शिंपडण्यापेक्षा ते कमीतकमी वापरणे चांगले.

डोळ्याखालील काळे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय

डोळ्याखालील-काळे-डाग-कसे-काढायचे

black circles around eyes home remedies

  • उपाय – १

एका बटाट्याचा लगदा घ्या. आपल्या पापण्यांवर कापसाचे पारदर्शक कापड ठेवा. आपले डोळे बंद करा आणि कापसाचे किंवा रेशमाचे पारदर्शक कापडा वर लगदा ठेवा.

अर्धा तास आराम करा आणि कापसाचे पारदर्शक कापड काढा. तुम्हाला त्याचे चांगले परिणाम पाहण्यास मिळेल. आपण हे नियमितपणे केले पाहिजे.

  • उपाय – २

एक काकडी किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्याला रेफ्रिजरेट मध्ये ठेवा. नंतर त्यातून काढून कापसाच्या बोड्यात बुडवा आणि आपल्या पापण्यांमध्ये ठेवा. याचा उत्कृष्ट असा थंड प्रभाव आहे. डोळ्याभोवतील काळ्या डागा साठी हा उपाय चांगला आहे.

  • उपाय – ३

एक चिमूटभर हळद घ्या, त्यात एक चमचा बेसन पावडर घाला. एका चमचा लिंबाचा रस घाला. त्याचे एकजीव गुळगुळीत पेस्ट बनवा आणि आपल्या डोळ्याभोवती पसरवा. ते कोरडे होऊ द्या आणि हळू हळू धुवा.

  • उपाय – ४

एक चमचा पपईचा लगदा घ्या, त्यात एक चमचा बेसन पावडर घाला, गुळगुळीत पेस्ट तयार करा आणि डोळ्याभोवती लावा. ते कोरडे झाल्यानंतर धुवा.

  • उपाय – ५

पुदीना आपल्या डोळ्यांसाठी चांगले आहे. पुदीना पाने घेऊन त्याचा रस काढून डोळ्यावर लावा. डोळ्याला आराम मिळेल.

  • उपाय – ६

टी बॅग वापरल्यावर फेकून देऊ नका. चहा मधून टी बॅग काढल्यावर त्याला डोळ्यावर थोडा वेळ ठेवा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.

महत्वाची सूचना-

  • आपण रात्री उशीरा झोपणे टाळले पाहिजे आणि आठ तास झोप घेतली पाहिजे. करण आपण रात्री शांत आणि निवांत झोप घेऊ शकतो तशी झोप दिवसा घेऊ शकत नाही.
  • आपण अल्कोहोल किंवा जास्त कॉफी पिऊ नये. अशक्तपणा देखील आपल्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळाचे कारण असू शकते. आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अशक्तपणा योग्य उपचार घ्या.
  • आपलं शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी किमान आठ ग्लास पाणी रोज प्यावे.
  • आपल्या डोळ्या भोवतील ब्लड पुरवठा सुधारण्याचा एक सोपा मार्ग आहे. आपले डोके खाली बेडवर ठेवा. आणि आपले पाय वर ठेवा. यालाच शीर्षासन असे म्हणतात.
  • हे आसन आपल्या डोळ्यांमध्ये चांगले रक्त परिसंचरण आणण्यास प्रभावीपणे मदत करते.
  • आपल्या डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय कोमल आहे. म्हणूनच डोळ्यांना काळजीपूर्वक हाताळली पाहिजे.
  • आपल्या डोळ्यांखालील काळे डाग काढणे ही काही जादूची प्रक्रिया नाही, त्याला थोडा कालावधी हा लागणारच. काळे डाग फिकट होण्यासाठी आपण नियमित डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे.
  • डोळे हे अनमोल आहे त्याची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे.

ही माहिती नक्कीच तुमच्या कामात येईल. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला भेट द्या.

धन्यवाद!

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻