whatsapp group niyam

Whatsapp group admin rules – आजच्या युगात मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग यांना कोण नाही ओळखत त्याचे नवलच, ते म्हणजेच व्हाट्स अँप.! हे व्हाट्स अँप आपल्या युजर च्या सोयीसाठी नवनवीन अपडेट्स आणि वैशिष्ट्ये आणत असतात. या वेळेला व्हाट्स अँप एकाच वेळी दोन नवीन फीचर्स रिलीज करणार आहे. या फीचर्सच्या मदतीने ग्रुप ऍडमिनची ताकद म्हणजेच ऑथॉरिटी वाढणार आहे.

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत: या फीचर्सची घोषणा केली. मार्कने घोषणा केली की, व्हाट्स अँप ग्रुप्ससाठी दोन नवीन अपडेट आणले जात आहेत. नवीन अपडेटसह, एडमिनला त्यांच्या ग्रुप साठी अधिक प्राइवेसी कंट्रोल मिळेल.

एडमिनला कुठली प्राइवेसी कंट्रोल मिळेल

मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या घोषणेमध्ये सांगितले की, हे बदल गेल्या काही महिन्यांत केलेल्या काही अपडेट्सचे अनुसरण करतात, ज्यात ग्रुप मोठे करणे आणि एडमिनला त्यांनी मॅनेज केलेल्या ग्रुप्स ला पाठवलेले मेसेज हटवण्याची ऑथॉरिटी देणे समाविष्ट आहे.

मेटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रुप्स हा अजूनही व्हाट्स अँप चा अत्यावश्यक भाग आहे आणि आम्ही लोकांना ग्रुप्सचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी आणखी टूल देण्यास उत्सुक आहोत. सध्याआम्ही ग्रुप चॅट्स अधिक मजेदार बनवण्यासाठी काही नवीन बदल आणण्यास उत्सुक आहोत. यामध्ये, एडमिनला ग्रुप मॅनेज करणे आणि प्रत्येकासाठी नेव्हिगेट करणे सोपे होईल.

नवीन अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध होणार

व्हाट्स अँप च्या नव्या फीचरमध्ये ग्रुपमध्ये कोण सामील होऊ शकतं हे एडमिन ठरवू शकणार आहे. म्हणजेच, नवीन फीचर एडमिनला हे ठरवण्यास मदत करेल, की एखादी व्यक्ती ग्रुपमध्ये सामील होऊ शकते की नाही. हे टूल सामान्यतः ग्रुप मध्ये पाहिले जाईल जेथे लोक त्यांच्या सर्वात सीक्रेट चाट करतात. आणि म्हणूनच ग्रुपमध्ये कोण सामील होऊ शकते आणि कोण नाही हे एडमिन सहजपणे ठरवू शकतात. हे महत्त्वाचे आहे.

ग्रुप पाहण्यास सोपे

वाढता व्हाट्स अँप ग्रुप आणि कम्युनिटी पाहून व्हाट्स अँपला ते सोपे करायचे आहे. तसेच, कंपनी ग्रुपमध्ये सामील असलेल्या लोकांना शोधण्याच्या सोप्या मार्गांवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स ग्रुप आणि कम्युनिटीमध्ये सहभागी असलेल्या इतर युजर्सचा शोध घेऊ शकतील. म्हणजेच, तुमचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्यासोबत कोणत्या इतर ग्रुप्समध्ये ऍड आहे हे तुम्ही पाहू शकाल. त्याच वेळी, आपण थेट ग्रुप मध्ये कॉन्टेक्ट शोधण्यास सक्षम असाल.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *