चक्क त्याने न झोपण्याचा विक्रम केला.!

world sleep day 2023

2008 मध्ये पहिल्यांदा झोपेचा दिवस म्हणजेच स्लिप डे साजरा करण्यात आला. सध्या जगभरातील 88 हून अधिक देशांमध्ये ‘वर्ल्ड स्लीप डे’ साजरा केला जातो. जगातील सर्वात जास्त वेळ झोपण्याचा विक्रम ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

आजच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेक लोक झोपेशी संबंधित समस्यांना बळी पडत आहेत. म्हणूनच लोकांना झोपेचे महत्त्व समजावे यासाठी दरवर्षी मार्च महिन्याचा तिसरा शुक्रवार हा ‘वर्ल्ड स्लीप डे’ म्हणून साजरा केला जातो. आज स्लीप डे च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सर्वात जास्त वेळ झोपण्याचा विक्रम नोंदवणार कोण आहे हे सांगणार आहोत.

‘वर्ल्ड स्लीप डे’ चा इतिहास

निरोगी आयुष्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. एकीकडे पुरेशी झोप आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते, तर दुसरीकडे झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्ती विविध समस्यांनाही बळी पडते. झोपेशी संबंधित या समस्या टाळण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने स्लीप-डे सुरू केला. 2008 मध्ये पहिल्यांदा ‘वर्ल्ड स्लीप डे’ (World Sleep Day 2023) साजरा करण्यात आला. सध्या जगभरातील 88 हून अधिक देशांमध्ये ‘जागतिक झोप दिवस’ साजरा केला जातो.

सर्वात जास्त वेळ झोपण्याचा जागतिक विक्रम

अभ्यासकांच्या मते, एखाद्याच्या झोपेचा वास्तविक कालावधी मोजणे खूप कठीण आहे. सर्वात जास्त वेळ झोपण्याच्या रेकॉर्डबाबतही मतभेद असू शकतात. कारण, असे काही लोक आहेत, जे एका विशेष परिस्थितीमुळे बराच वेळ झोपू शकले. अशा परिस्थितीत ही गोष्ट बरोबर ठरवता येत नाही, पण तरीही आम्ही इंटरनेटवरील माहितीनुसार सांगू इच्छितो की, जगातील सर्वात जास्त वेळ झोपणारी व्यक्ती कोण होती.

ऑक्टोबर 2017 मध्ये, सात वर्षांचा व्याट शॉ केंटकी मध्ये 11 दिवस झोपला होता. दुसऱ्या दिवशी व्याट उठला नाही, तेव्हा त्याची आई त्याला रुग्णालयात घेऊन गेली, जिथे डॉक्टरांनी त्याच्यावर चाचण्या केल्या.

शॉच्या सर्व चाचण्या नकारात्मक परत आल्याने डॉक्टर आणि आश्चर्यचकित झाले. आणखी 10 दिवस झोपल्यानंतर व्याट शॉ जागा झाला. 13 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर व्याट पूर्णपणे बरा झाला. व्याट शॉच्या नावावर आजही सर्वाधिक 11 दिवसांची झोप घेण्याचा विक्रम आहे.


  • हे वाचलंत का? –
Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻