वेस्ट इंडीज हा देश नाही.?

Caribbean-mahiilake.com

West Indies हा देश नाही..!

मित्रहो आपण वेस्ट इंडिस यांना क्रिकेट च्या नावाने ओळखतो, कारण ही टीम चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळते व त्यांनी ICC चे जवळपास खूप Price पण जिंकले आहेत. मग ते वन डे वल्ड कप असो, वा टी-20 वल्ड कप.
पण तुम्हाला हे ऐकून आचर्य होईल की, वेस्ट इंडिस नावाचा कोणताच देश या पृथ्वी वर वास्तव्यास नाही.

आता तुम्हाला विचार येत असेल मग वेस्ट इंडिस काय आहे नेमक? वेस्ट इंडिस हा एक कॅरिबियन देशांचा समूह आहे. हे देश वेगवेगळे आहेत पण ते क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र येतात. या देशात फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे पण क्रिकेट हा खेळ त्यांना एकत्र आणतो.

या टीम ची स्थापना ही 1928 मध्ये झाली व त्यानंतर पहिली म्याच त्यांनी इंग्लड विरुध्द लढली ज्या मध्ये ते 58 रनानी जिंकले.

हे वाचलंत का? –
* इजिप्त पिरॅमिड मध्ये ममी कश्या प्रकारे बनवायचे?
* मंदिरात घंटा का बांधली जाते?

कॅरिबियन द्वीप कुठे आहेत..?

हे द्वीप उत्तर अटलांटिक महासागरामध्ये अमेरिका आणि मेक्सिको या देशान लगत आहे. समजण्याकरीता वरील फोटो पहा.

कॅरिबियन द्वीपची संख्या ही 1000 आहे, पण त्यातील फक्त 15 द्वीपमधीलंच खेळाडु हे वेस्टइंडिस च्या टीममध्ये क्रिकेट खेळू शकतात. आपल्याला माहीत आहे की क्रिकेट चालू होण्याआधी राष्ट्रगीत म्हटले जाते पन वेस्ट इंडिस हे कोणत्या एका देशाचे नाही. तर ते क्रिकेट च जे राष्ट्रगीत आहे ते गातात.


कॅरिबियन देशानं बद्दल थोडी माहिती

● कॅरिबियन मध्ये 28 देश आहेत त्यामधील काही देशांवर अजून पण इंग्लंड आणि फ्रांस यांच राज्य आहे.

● क्युबा हा तेथील सर्वात मोठा देश आहे. त्याच क्षेत्रफळ हे केरळ एवढं येत. येथील लोकसंख्या ही जवळ- जवळ 1 करोड 20 लाख इतकी आहे.

● सेट किट्स अँड नेक्सी हा तेथील सर्वात लहान देश आहे. या देशाचे क्षेत्रफळ हे 261 वर्ग किलोमीटर इतकं असून येथील लोकसंख्या ही 50000 च्या जवळपास आहे.

● हा देश पर्यटकांचा आवडता देश आहे. तो म्हणजे ‘डोमिनिकन रिपब्लिकन’ या देशाला एका वर्षामध्ये 50 लाख पर्यटक भेट देतात.


कॅरिबियन हे नाव कसे पडले?

या द्वीप वर आधी कॅरेब नावाची एक जंगली जमात राहत होती. जी नरभक्षी होती. याच प्रजातीच्या नावावरून हे नाव पडले.

या देशातील जास्तीत जास्त लोक हे मूळचे आफ्रिकन आहेत. या शिवाय भारत आणि युरोप मधील पण लोक येथे आहेत. भारतातील काही लोक हे खूप आधीपासून म्हणजे जवळपास इंग्रजांच्या काळा पासून कॅरिबियन देशात राहायला गेली आहेत .

सुनील नारायण, शिवणारायन चंद्रपोल हे खेळाडू मूळचे भारतीय आहेत.

हि माहिती कशी वाटली आम्हाला कंमेंट करून कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला भेट द्या.
धन्यवाद..!

  • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment