मंदिरात घंटा का बांधली जाते?

मंदिर-मध्ये-घंटी-का-असते.

मंदिरात घंटा का बांधली जाते..?

आजपर्यंत तुम्ही कुठलेही मंदिर बघितले असेल, तर तेथे तुम्हला घंटी दिसलेली असेलच.
ती घंटी का बरं असते…? कधी तुमच्या मनात विचार आला…?

बऱ्याच लोकांच्या कडून मी ऐकलं की, आपण मंदिरात आलो, हे देवाला कळायला हवं म्हणून घंटी लावली जाते. आणि ती जितकी जोरात वाजवली तितक्या लवकर देव आपली मनोकामना पूर्ण करतो. असो हा त्यांचा विचार झाला.
पण त्या मागे एक सायंटिफिक कारण आहे. तर चला आज आपण ते जाणून घेऊया.

मंदिरात गेल्यागेल्या आपल्या डोक्याच्यावर घंटी बांधलेली असते. जेव्हा आपण घंटी वाजवतो. तेव्हा कंप (vibration) तयार होतो.
ही घंटी वेगवेगळ्या धातू पासन बनवलेली असते. चांदी, पितळ किव्हा पंचधातूंनी.

या मधून एक विशिष्ठ असा कंप तयार होतो. हा कंप ७ सेकंद पर्यत असतो.
सात म्हटलं की….. अध्यात्म (Spirituality) नुसार आपल्या शरीरात सात चक्र आहेत. त्या घंटीच्या नादाने ते सात चक्र सक्रिय (active) होतात.

तसेच आपल्या डावा आणि उजवा मेंदू एकमेकास समकालीन (synch) होतो. आणि आपलं मन हे एकग्रीत होत. मन स्थिर होऊन ते जागृत होत. तसेच नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होण्यास मदत मिळते.

spiritualism-1-1024x739

मन एकाग्रते साठी आध्यत्मिक जगात खूप महत्व दिल जाते.
आपले विचार ,भावना थेट आपल्या ईश्वरा पर्यत जाते. हा त्यांचा विश्वास आहे.

आपलं मन इतकं व्यस्त असत की त्याला एकग्रीत करण्यासाठी एकतर शोक, सदमा किव्हा घंटीचा कंप हे उपाय आहे. म्हणून मंदिरात गेल्यागेल्या तुम्हाला आधी घंटी बांधलेली दिसते.

आध्यत्मिक आणि वैज्ञानिक या बाबींसाठी एकमत आहे. फक्त आपापले विचार ते आपापल्या पद्धतीने मांडतात.

आत्ता या नंतर असा विचार करू नका की, आपण मंदिरात प्रवेश केला, हे देवाला कळण्यासाठी घंटीचा वापर केला जातो.

अश्याच छान छान माहिती साठी महितीलेक ला भेट देत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन माहिती सोबत.

धन्यवाद…

  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.


Leave a Comment