SMALL BUSINESS IDEA : घरीबसून या 3 व्यवसायातून लाखो रुपये कमवा.!

Small business ideas in Marathi

SMALL BUSINESS IDEA : जर तुम्ही पैसे कमवायचे विचार करत असाल, तर सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी करण्याची गरज नाही. फक्त थोडा विचार करण्याची गरज आहे आणि मग अनेक पैसे कमावण्याचे मार्ग समोर येतील, ज्याद्वारे तुम्ही लाखोंमध्ये कमाई करू शकता.

घरी खाली बसून राहल्यास पैसे अजिबात येणार नाहीत. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही आमच्या या 3 बिझनेस आयडियासह तुमचा व्यवसाय सुरू करू शकता आणि जर बेरोजगार महिलांनीही घरी बसून या 3 छोट्या व्यवसाय सुरू केला, तर त्यांची देखील लाखोंची कमाई सुरू होईल. यात काही शंका नाही.!

1) लिफाफा बनवण्याचा व्यवसाय

लिफाफा व्यवसाय, जो दरमहा स्थिर उत्पन्न देण्यास सक्षम आहे, लिफाफे बर्‍याच संस्थांमध्ये वापरले जातात. तसेच बर्थडे, ख्रिसमस डे, पार्टी, समारंभ, व्हॅलेंटाईन डे, ग्रीटिंग कार्ड इत्यादी प्रसंगी दिले जाते.

कागदापासून लिफाफे बनवण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास, घरात बसून महिला व पुरुष चांगले उत्पन्न मिळवू शकतात. यामध्ये, गुंतवणूक कमी आणि मार्जिन जास्त आहे, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता जास्त आहे. जर तुम्ही हा व्यवसाय नियमित केलात, तर तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करून त्यातून चांगला नफा मिळवता येतो.

2) घरगुती मेस चा व्यवसाय

गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती मेस म्हणजेच घरच्या जेवणाचे डबे पुरवणे या व्यवसायात वाढ दिसून येत आहे, जर तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करायचे असेल, तर महिला किंवा पुरुष घरबसल्या कॅन्टीन व्यवसाय सुरू करू शकतात आणि महिन्याला 20 ते 25 हजार सहज कमवू शकतात.

विशेषत: इतर राज्यात काम करणारे मजूर आणि विविध राज्यात तसेच जिल्ह्याला शिक्षणासाठी गेलेले तरुण, यामुळे या व्यवसायाची वाढ झाली आहे. घरासारखं खाद्यपदार्थ बाहेर गावी मिळत नसल्यामुळे आणि चवीच्या शोधात हॉटेलमध्ये जाण्याऐवजी ते घरासारखं खाद्यपदार्थ चाखण्यासाठी घरगुती मेस लावतात.

खूप लोक घरून जेवण बनवून सर्व ग्राहकांना सकाळ, दुपार आणि संध्याकाळचे जेवण देतात आणि दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळवतात. हा व्यवसाय तुमच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचा चांगला स्रोत बनू शकतो.

3) मेणबत्तीचा व्यवसाय घरबसल्या करा

जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल, तर तुमच्या लक्षात येईल की, आजकाल मेणबत्तीच्या व्यवसायालाही खूप मागणी आहे, पण काही लोक असे म्हणतात की, या व्यवसायात फार कमी स्कोप आहेत. परंतु तसे नाही, कारण पूर्वीच्या तुलनेत ही मागणी खूप जास्त वाढत जात आहे.

कारण आता मेणबत्त्यांचा वापर सजावटीसाठी अधिक केला जात आहे, कारण मोठमोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये त्याची मागणी वाढत आहे, याशिवाय सण-उत्सवांसोबतच त्याची मागणीही खूप असते. इतर वापरातही वाढ झाली आहे.

15 ते 20 हजार रुपयांच्या किरकोळ खर्चात तुम्ही घरबसल्या ते सुरू करू शकता आणि मजबूत उत्पन्नाचा स्रोत बनवू शकता. मेणबत्तीचा व्यवसाय तुम्ही कश्या प्रकारे करू शकता. त्याबद्दल आम्ही एक सविस्तर आर्टिकल लिहिलेले आहे. ते अवश्य वाचा.!


माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻

हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻