मेणबत्ती व्यवसाय ची संपूर्ण माहिती

मेणबत्ती व्यवसाय (menbati vyavsay)

मेणबत्ती व्यवसाय कसा करावा?

आपण सर्वच नेहमी व्यवसाय संबंधित गोष्टी ऐकत, वाचत असतो. व्यवसाय केला पाहिजे भांडवल आणि व्यवसायाचे नियोजन व्यवस्थित रित्या केले पाहिजे, परंतु कोणता व्यवसाय करावा? हा साधारणत: प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. त्यामुळे आज आपण एक नवीन व्यवसायाची माहिती बघणार आहोत. तो व्यवसाय म्हणजे मेणबत्ती व्यवसाय (Candle business).

2010 च्या सुमारास झालेल्या सर्वेनुसार मेना ची मागणी 10000 मिलीयन पौंड पर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या मागणी मधील 90 टक्के मेन हे मेणबत्ती व्यवसायासाठी वापरले जाते. आपण हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकतो. मोबाईल, टॉर्च ई. मुळे मेणबत्ती चा वापर कमी होत असला, तरी मेणा ला सर्वात जास्त मागणी आहे.

या व्यवसायासाठी आपण मशीनचा उपयोग करू शकतो. यासाठी सॅंडल मेकिंग मशीन आहे, ज्याची किंमत दहा हजार पासून लाखा पर्यंत आहे. परंतु मशिनच पाहिजे असे काही नाही. आपण मशीन शिवाय ही हे काम करू शकतो. मेणबत्ती चा उपयोग अनेक प्रकारे केला जातो. भारतातच काय तर भारताबाहेर धार्मिक कार्यक्रमांसाठी किंवा सजावटीसाठी ही त्यांचा वापर केला जातो.

मेणबत्ती उद्योग / मेणबत्ती व्यवसाय माहिती मराठी

मेणबत्ती व्यवसाय

menbatti udyog in marathi


मेणबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू

1) प्याराफिन मेन

2) कॅस्ट्रोल ऑइल

3) मेणबत्ती साचा

4) मेणबत्ती धागा

5) थर्मामीटर


मेणबत्ती व्यवसाय सुरू कसा करावा?

तुम्ही हा व्यवसाय घरातून मशीन न घेताही करू शकता किंवा लहान प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग युनिट घेऊन ही हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. आपण मेणबत्ती ही धार्मिक उद्देशानेच नव्हे, तर अडीअडचणीला तसेच लाईट नसताना, घरात सजावटीच्या कार्यक्रमात ही वापर करू शकतो.

पारंपारिक लांब पांढऱ्या मेणबत्ती शिवाय सुगंधित आणि सजावटीच्या मेणबत्तीचा ही आपण वापर करू शकतो. अनेक प्रकारचे मेणबत्त्या मार्केटमध्ये उपलब्ध असतात. कमी भांडवल लावून कसा व्यवसाय करता येईल ते पाहू.

आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की हा व्यवसाय करायचा तर आहे, परंतु हा व्यवसाय फायदेशीर आहे का? तर हो, कारण हा व्यवसाय कमी खर्चात सुरु करता येतो आणि हा व्यवसाय सुरु करणे खूप सोपे आहे. आपण हा व्यवसाय कमी गुंतणुकीत छोट्या सोप्या प्रक्रियांमध्ये सुरू करू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे सर्व तर ठीक आहे, परंतु ह्या मेणबत्त्या विकल्या जातील का? तर हो, मेणबत्त्या ना वर्षभर मागणी असते.

पारंपारिक मेणबत्ती चा वापर ही धार्मिक सोहळ्यांसाठी तसेच कार्यक्रमांना केला जातो. एवढेच काय तर शोभेसाठी ही मेणबत्त्यांचा वापर होत असतो. गार्डन्समध्ये बर्थ डे पार्टी मध्ये तसेच नव्या जोडप्यांच्या जेवणाकरिता ही मेणबत्ती चा वापर केला जातो. त्यालाच आपण कॅण्डल लाईट डिनर असेही म्हणतो.

याच बरोबर विविध रंगीबेरंगी सुगंधित वासाच्या विविध प्रकारच्या मेणबत्त्यांचा बाजारात उपलब्ध आहेत. आपण त्यांचा ही व्यवसाय करू शकतो. आता हा व्यवसाय सुरू करताना काय काय लक्षात घेतले पाहिजे ते पाहू.

1) बाजाराचापेठेचा आढावा –

आपण जेथे व्यवसाय सुरू करणार आहोत, त्या बाजारपेठेत तून माहिती गोळा करणे, त्यानंतर मेणबत्ती चा व्यवसाय बाजारपेठेत कोण कोण करतं, याची माहिती घेणे, बाजारपेठेत मेणबत्ती ना किती मागणी आहे, आपण बाजारपेठेत मेणबत्ती व्यवसाय करणार असू तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय करावे लागेल. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून, अशा अनेक प्रकारच्या माहिती चा आढावा घेऊन त्याचा अभ्यास करून कोणत्यातरी व्यवसायिकाचा सल्ला घेऊन त्यानुसार त्यावर काम केले पाहिजे.

2) मेणबत्ती व्यवसाय प्रकल्प –

हा व्यवसाय सुरुवात छोट्या युनिट नि करणार असाल, तर त्याला लागणाऱ्या मशीन ची माहिती काढा, त्याची किंमत काढा, सरकारच्या कोणत्या स्कीम मध्ये आपला प्रकल्प बसले का याचा विचार करा, बँकेत कार्यालयात जाऊन त्या स्कीमचा आढावा घ्या.

3) व्यवसायाची नोंदणी –

आपण मेणबत्ती बनवणे, व्यवसाय करण्याचा विचार करतो आहे. तर, आपल्याला ते सुरू करण्याच्या वेळी व्यवसायाची नोंदणी करणे गरजेचे ठरते. आपण आपल्या व्यवसायासाठी छोटी कंपनी उभारू शकतो का? याचा विचार करा. आपल्या मालकीची किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यासाठी आपल्याला पी सी ए ची नोंदणी करणे गरजेचे असते. त्यामुळे त्याची माहिती काढा.

4) मेणबत्ती साठी लागणारा कच्चामाल –

मेणबत्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रमुख कच्च्या मालामध्ये पॅराफीन मेन हे महत्त्वाचे आहे. बिन रंग सजावटीच्या वस्तू विशेष रंग मेणबत्ती म्हणून करण्यासाठी आणि सुगंधित सेंट असणे आवश्यक आहे. याच बरोबर भांडे, थर्मामीटर इत्यादी गोष्टी लागतात.


मेणबत्तीच्या मशीन चे प्रकार

  • मशीनचे एकूण तीन प्रकार पडतात. त्यामध्ये अर्ध स्वयंचलित व पूर्णपणे स्वयंचलित मेणबत्ती बनवणारे मशीन बाजारात उपलब्ध आहे. त्या मशीनची उत्पादन क्षमता गुणवत्ता आणि खर्च हे वेगळे आहेत. माहिती व शोधानुसार मशीनमधून मेणबत्त्या गोळ्या करण्याची आवश्यकता असते. मॅन्युअल मशीन मध्ये तासाला तीनशे ते साडेपाचशे इत्यादी तुकड्याची उत्पादन होते.
  • त्यांची उत्पादने आपण घेणार असलेल्या मशीन वर आधारित असते. दुसऱ्या मशीन चा प्रकार म्हणजे अर्ध स्वयंचलित मशीन हे मशीन ऑपरेट करण्याच्या सोप्या पद्धती असतात. या मशीनचा बाजारात जास्त प्रमाणात वापर केला जातो.या मशीनला बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कारण हे मशीन तांत्रिक प्रगतीत आहे. या मशिन ची किंमत ही स्वयंचलित मशीन पेक्षा जास्त आहे.
  • तिसरा मशीन चा प्रकार म्हणजे पूर्णपणे स्वयंचलित मेणबत्ती, हे मशीन बाजारात अत्यंत उत्कृष्ट व दर्जेदार ठरते. सौम्य स्टील आणि सी आर सी पाइपचा वापर करून हे बनवतात. त्यामुळे हे दीर्घकाळ टिकतात या मशीन मध्ये बऱ्याच विविध प्रकारच्या मेणबत्त्या बनवल्या जातात. त्याच बरोबर आपण विविध प्रकारच्या मेणबत्त्या वेगवेगळ्या आकारात बनवून घेऊ शकतो. बाजारात वेगवेगळ्या आकाराचे साचे उपलब्ध आहेत.

menbati vyavsay

candle business in marathi

menbatti udyog in marathi


मेणबत्ती चा वापर

1) चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी किंवा लग्नाच्या वेळी याचा वापर केला जातो.

2) घरगुती लाईट गेल्यावर किंवा घरांची रूमची शोभा वाढवण्यासाठी मेणबत्तीचा वापर केला जातो.

3) सजावटीसाठी हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये तसेच मंदिरामध्ये अनेक ठिकाणी मेणबत्तीचा वापर केला जातो.

4) जेवणाच्या ठिकाणी सजवण्यासाठी विविध शेड आणि आकार असलेल्या मेणबत्त्यांचा वापर केला जातो.

5) रूम सजवण्यासाठी किंवा कोणाच्या वाढदिवसासाठी रूम सजवण्यासाठी विविध मेणबत्त्यांचा वापर केला जातो.


मेणबत्ती व्यवसाय चे फायदे

1) मेणबत्तीयांसाठी कच्च्या मालाच्या किंमती कमी असल्या कारणाने जास्त खर्च उत्पादनाच्या मालासाठी लागत नाही.

2) जास्त कर्मचारी हाताखाली लागत नाही.

3) उत्पादनातून कोणत्याही प्रकारचा कचरा बाहेर पडत नाही. त्यामुळे नुकसान होत नाही व घाण ही साचत नाही.

मेणबत्तीसाठी फॉर्म

  • मेणबत्ती फॉर्म च्या पोकळ वस्तू कशा शोधायच्या
  • दूध व रस पासून कार्डबोर्ड पॅकेजेस
  • अंडी रोल
  • सिलिकॉन बेकिंग मॉल्स
  • आईस्क्रीम साठी आकृती फॉर्म

घरगुती बनवणाऱ्या मेणबत्ती चे प्रकार

१) कॉफी मेणबत्ती –

या मेणबत्तीमधून सुगंध येत असल्यामुळे आपला मूड छान आणि शांत होतो. आपण ही मेणबत्ती भेट म्हणूनही देऊ शकतो, आणि या मेणबत्ती बनवण्यासाठी आपल्याला लागणारा साहित्य म्हणजे पॅराफीन घन किंवा बीन्स, दोन प्लास्टिक कप, चमचे, लाकडी दंड.

२) इंद्रधनुष्य मेणबत्ती –

आपल्याला आंतरिक ताजे मेणबत्याद्वारे होणाऱ्या वासामुळे किंवा त्याच्या दरवळणाऱ्या देजा मुळे वाटते. यात इंद्रादानुष्य मेणबत्तीची मदत जास्त प्रमाणात होते. हे बनवण्यासाठी आपल्याला पॅराफीन सियारिन बेलनाकार आकार इंद्रधनुष्याचे वेळी संबंधित रंग इत्यादी वस्तू लागतात.

  • मधुरा जोशी

हे वाचलंत का? –


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment