अगरबत्ती व्यवसाय कसा करावा? याबद्दल संपूर्ण मराठी माहिती

अगरबत्ती व्यवसाय।Agarbatti business marathi

agarbatti business marathi

agarbatti business marathi

अगरबत्ती व्यवसाय कसा चालु करायचा..?

आपल्या इथे धार्मिक कार्यक्रम हे खुप मोठ्या प्रमाणात होतात, ज्यामध्ये अगरबत्ती चा वापर पन तेवढाच होतो. आपल्या देशात सर्वच धर्मात अगरबत्ती ही वापरली जाते त्याच सोबत विदेशात राहणारे आपले भारतीय लोक पन अगरबत्ती वापरतात.

अगरबत्ती ची मागणी ही वर्ष भर राहते, सोबतच जर एखादा सन आला तर मागणी आणखी वाढते. अगरबत्ती चा व्यवसाय तुम्ही हा छोट्या प्रमाणात पन करु शकता आणी तुमच्या जवळ भांडवल जास्त असेल तर त्यानुसार करु शकता.

हा व्यवसाय No risk factor चा व्यवसाय मानला जातो कारण या व्यवसायात गुंतवणूक खुप कमी प्रमाणात लागते तुम्ही कमीत कमी गुंतवणूकी मध्ये हा व्यवसाय चालु करु शकता. कोणताही व्यवसाय चालु करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आधीच ठरवाव्या लागतात.
ते आपन पुढे पाहु.

सर्वात आधी तर कोणता पन व्यवसाय करतो म्हटले तर त्यासाठी लागतो पैसा तुम्ही आधी पैशाचा हिशोबाने चला तुमच्या जवळ कीती पैसै आहै त्यानुसार बजेट तयार करा.

त्यानंतर येते Market research तुम्ही अगरबत्ती चा व्यवसाय करत आहात तर तुमचा ग्राहक वर्ग कोणता आहे व तो तुम्हाला कुठे मिळेल हे खुप गांभीर्याने लक्षात घ्या. आणि भविष्यात येणाऱ्या अडचणी साठी तयार व्हा.

या व्यवसायाला जागा लागेल ती जागा ठरवून घ्या व त्यावर जे बांधकाम करायच आहे ते करुन द्या.

यानंतर तुम्हाला जो कच्चा माल लागेल सोबतच पॅकेजीग चे साहित्य लागेल तयार केलेला माल हा पॅकीग कसा करायचा याची व्यवस्था आधीच करून ठेवा.

हे वाचलंत का? –
* मेणबत्ती व्यवसाय कसा करावा?
* चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा?

अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळेल..?

अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशात कुठे पन मिळुन जाईल. तुम्ही तुमच्या शहरातील अगरबत्ती चा कच्चा माल विकणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन पण शोधु शकता व कच्चा माल त्यांच्या जवळुन घेवू शकता .

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या कच्चा माला बद्दल माहिती घेवू शकता.

 • IndiaMART
 • Panthi Machinery

अगरबत्ती चा व्यवसाय करण्यासाठी जागा किती लागेल..?

हा व्यवसाय जर तुम्ही लहान स्वरुपात करणार असाल तर तुम्ही हा घरातुन पन चालु करु शकता. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी जवळपास 1000 फुट जागा लागेल.

अगरबत्ती व्यवसाय गुंतवणूक कीती लागेल..?

हा व्यवसाय तुम्ही 10,000 च्या छोट्याश्या गुंतवणूकी मध्ये चालु करु शकता तुम्ही हाताने अगरबत्ती तयार करून विकु शकता. जर तुम्ही मशीनच्या सहाय्याने तयार करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी 5 lakh एवढा खर्च येतो.

हाताने अगरबत्ती कशी तयार करतात? (Agarbatti making business in marathi)

तसे तर अगरबत्ती चे उत्पादन हे दोन प्रकारे केले जाते एक मसाला अगरबत्ती दुसरे म्हणजे सुगंधी अगरबत्ती. अगरबत्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पावडर हे लाकडी पावडर आणि जीगात पावडर याचे मिश्रण राहते.

या पावडर मध्ये पाणी टाकून त्याला चांगले चुरुण घ्या व नंतर बाशा च्या काडया घेवुन त्यावर ते मटेरियल गुंडाळून घ्या त्या नंतर तुम्हाला जो सुगंध पाहिजे त्या सुगंधाच्या तेलात ती अगरबत्ती बुडवून वाळू घालून द्या.

अगरबत्ती चा व्यवसाय करण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल का..?

हो हा व्यवसाय जर तुम्हाला मोठ्या स्वरुपात करायच असेल तर काही आवश्यक गोष्टी आहेत त्या खाली दिल्या आहेत.

 • तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या जिल्हय़ाच्या ठीकाणी लायसन्स साठी apply करुन द्या.
 • तुमच्या व्यवसायाच्या नावाचे पॅण कार्ड तयार करून घ्या.
 • एक चालु खाते उघडुन घ्या.
 • SSI मध्ये रजिस्ट्रेशन करुण घ्या.
 • त्यानंतर vat साठी apply करुन द्या. सोबतच तुमचा व्यवसाय लोगो तयार करुन द्या व तो रजिस्ट्रेशन करुन घ्या म्हनजे तुमचा brand तयार होउन जाइल safe होउन जाइल.
 • तुम्ही जर मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालु करत असाल तर प्रदुषण नियन्त्रण बोर्डातुन noc काढुन द्या.

अगरबत्ती तयार करण्यासाठी मशीन कोणत्या लागतात..?

तुम्ही हा व्यवसाय लहान कीवा मोठ्या कोणत्या पन प्रमाणात करा त्याच प्रमाणे तुम्हाला मशीन पन घ्याव्या लागतील. साधारणत अगरबत्ती तयार करण्यासाठी तीन प्रकारच्या मशीन आहेत .

 • Manual
 • ATOMATIC
 • High Speed atomatic

सोबतच कच्चा माल वाळवायला मशीन कच्चा मालाच मिश्रण करायला मशीन लागेल.

 • MANUAL MACHINE :- ही चालवणे खुप सोप आहे ही मशीन सींगल पायडल व डबल पायडल दोन्ही मध्ये येते या मशीनच्या सहाय्याने तुम्ही अगरबत्ती ह्या चांगल्या गुणवत्तेच्या बनवु शकता. कींमत पन कमी आहे मजबूत पन आहे.
 • ATOMATIC MACHINE :- जर तुम्ही अगरबत्ती चा मोठा व्यवसाय करीत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावे लागेल त्यासाठी तुम्हाला ऑटोमेटिक मशीन हा पर्याय चांगला आहे.

ही मशीन तुम्हाला एका मिनटात 150 ते 200 अगरबत्ती तयार करून देते या मशीन मधे तुम्ही दोन प्रचाराच्या लाकडी स्टीक वापरु शकता चौकोन व गोल.

तुम्हाला ज्या size ची मशीन पाहिजे त्या size मध्ये ही मशीन मार्केट मध्ये उपलब्ध आहे. या मशीन मध्ये तयार होणार माल हा आकार आणि designe मध्ये सारखा असतो.

 • HIGH SPEED ATOMATIC MACHINE :- या मशीनच्या वापरामुळे तुम्हाला मजुर कमी लागतात ही मशीन FULL ATOMATIC असल्याने या मशीन मुळे तुम्ही कमी मजुरांच्या हातुन जास्त उत्पादन घेउ शकता.

ही मशीन एका मिनटात तुम्हाला 400 ते 500 अगरबत्ती च्या Sticks तयार करुन देते या मशीन मधे तुम्ही 12 इंच मोठी अगरबत्ती पन तयार करु शकता.

Agarbatti Packing कशी करायची..?

कोणतीही वस्तू विकत घेताना आधी लोक त्या वस्तूची पॅकीग बघतात कारन आज पॅकीग वरुन ठरत की आतील Product कस असेल. तसेच जर तुमची पॅकीग जर चांगली असेल तर तुमच्या अगरबत्ती कडे जास्त ग्राहक आकर्षित होतील. म्हणून तुम्ही पॅकेजीग वर थोडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

त्या नंतर येते मार्केटींग साठी एकदम पैसै खर्च करु नका आधी Product वर पैसै खर्च करा मार्केटींग आपोआप होते.

तुम्ही तुमच्या अगरबत्ती ज्यामध्ये पॅक करत आहे त्यावर तुमचा लोगो ब्रॅण्ड नेम व Product Quality ची माहिती असने आवश्यक आहे.

तुम्ही जर ऑटोमेटिक मशीन वापरत असाल तर ती मशीन अगरबत्ती मोजून डब्यात भरण्याचे काम ऑटोमेटिक करते . तुम्हाला फक्त त्या बॉक्स ना मोठया बॉक्स मधे टाकायचे आहे.

 • धीरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

1 thought on “अगरबत्ती व्यवसाय कसा करावा? याबद्दल संपूर्ण मराठी माहिती”

Leave a Comment