चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा? (Chocolate Business)

Chocolate Business in Marathi

chocolate-recipe-in-marathi

Chocolate recipe in marathi

चॉकलेट व्यवसाय कसा सुरु करावा? – Chocolate in marathi

आज कोणता पण व्यवसाय करण्यासाठी एक चांगला Business प्लॅन तुमचा कडे असायला पाहिजे. तसे तर तुम्ही खूप व्यवसाय करू शकता.

पण मी आज तुम्हाला ज्या व्यवसायाची माहिती देणार आहे, तो व्यवसाय आज मार्केट मध्ये मागणी असलेला व्यवसाय आहे. तो व्यवसाय आहे. घरी चॉकलेट तयार करुन विकण्याचा व्यवसाय. चला तर मग पाहू घरी चॉकलेट कशी तयार करायची.

तुम्हाला कोणता पण व्यवसाय चालू करायचा असेल, तर आधी मार्केट चा सर्वे करणे खूप आवश्यक आहे. त्या उत्पादनाची मार्केट मध्ये काय स्थिती आहे. हे माहित करणे खूप महत्वाचे असते.

बघा तुम्हाला आधी एक गोष्ट शोधून काढावी लागेल कि, तुम्ही तुमचा Chocolate चे प्रॉडक्ट तुमच्या प्रतिस्पर्धी पेक्षा वेगळे व चांगले कशे बनवू शकता. या साठी तुम्ही मार्केट मध्ये जाऊन बघू शकता कि, बाकी कंपनी कशा प्रकारे Chocolate तयार करत आहे.

आणि कशा पद्धतीने ते विकत आहेत. सर्वात महत्वाचे कि ग्राहकांनी जास्त कोणत्या प्रकारच्या Chocolate ला पसंती दाखवली आहे .

सर्वे वरून तुम्ही तुमची Chocolate तयार करू शकता व मार्केट मध्ये विकू शकता. मागील काही वर्षात या व्यवसायात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारण या प्रॉडक्ट ची मागणी कधी कमी नाही होत. माझ्या मते हा व्यवसाय भविष्यात खूप मोठा होऊ शकतो.

हा व्यवसाय कोण चालू करू शकतो..?

हा व्यवसाय कुणीही चालू करू शकतो..! ते महिला असो कींवा पुरुष कोणीही हा व्यवसाय चालू करू शकतो. ज्याला चॉकलेट तयार करण्याची आवड असेल. कारण आपण आपल्या आवडीचे काम मन लावून करू शकतो व त्यात आपल्याला कंटाळा पण नाही येत.

हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला काही लायसन्स आणि सर्टिफिकेट लागतील जे तुमच्या कडे असायला हवे ज्याची माहिती खाली दिली आहे.

चॉकलेट व्यवसाय रजिस्ट्रेशन

जर तुम्हाला हा व्यवसाय एक कंपनी म्हणून चालू करायचा असेल तर तुम्हाला कंपनी रजिस्टर करावी लागेल. कारण कंपनी म्हटलं कि सर्व गोष्टी ह्या कायद्याने कराव्या लागतात जर तुम्ही काही गैरप्रकार केला. तर तुम्हाला पुढे अडचण जाईल कारण आज खूप दुप्पल कंपनी ह्या मार्केट मध्ये येत आहेत.

या नंतर तुम्हाला fssai चे लायसन्स पण काढा लागेल. कारण हा व्यवसाय खाद्य पदार्थ तयार करायचा असल्यामुळे. आरोग्य विभागाचा मानकानुसार तुमची किचन असणे आवश्यक आहे.

ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन :-

कोणत्या पण प्रकारचा व्यवसाय चालू करण्यासाठी हे रेजिस्ट्रेशन महत्वाचे आहे. या रेजिस्ट्रेशन मुळे तुम्ही जो तुमचा कंपनी चा लोगो व नाव ठेवले आहे ते सुरक्षित होऊन जाईल भविष्यात कुणी हे नाव वापरू शकणार नाही व त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही.

GST क्रमांक :-

आपल्या भारत सरकार ने टॅक्स भरण्यासाठी एक सरळ प्रक्रिया तयार केली आहे तीच नाव आहे. GST या मध्ये तुम्हाला एक नंबर दिला जातो. जो नंबर तुम्ही टॅक्स भरण्यासाठी वापरू शकता व तुम्ही व्यवसाय करत असतांना तुम्हाला व्यवसायाचा नावाने बँक मध्ये एक चालू खाते उघडावे लागेल त्यासाठी पण हा नंबर कामात येतो.

चॉकलेट तयार करण्यासाठी ट्रेण्निंग

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्या पण ट्रेनिंग ची आवश्यकता तर नाही. पण या व्यवसाय बद्दल थोडी माहिती घेणं आवश्यक आहे. जी माहिती तुम्हाला GOOGLE व YOU TUBE वर मिळून जाईल.

चॉकलेट तयार कशी करायची याची विधी पण तुम्हाला YOU TUBE वर शिकण्यास मिळून जाईल.

तुम्ही हे सर्व शिकून घ्या व आपले स्वतःचे प्रॉडक्ट तयार करा. ज्यात तुमचा वेगळा स्वाद असेल कि, त्या प्रकारची चॉकलेट बाजारात उपलब्ध नसेल.

मग तुमची चॉकलेट हि सर्वात जास्त विकली जाईल. पहा तुम्ही मार्केट मध्ये तेव्हाच टिकाल जेव्हा तुम्ही ग्राहकांना काही नवीन द्याल.

Chocolate तयार करण्याच्या व्यवसायासाठी जागा

हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काही जागा लागेल. जी तुम्हाला मार्केट मध्ये मिळून जाईल किंवा सुपर मार्केट मध्ये किंवा तुम्ही घरी पण चॉकलेट तयार करून या चॉकलेट बाजारात तुमच्या दुकानात कीरकोळ मध्ये पण विकू शकता. व तुमचा व्यवसाय हळू हळू वाढवू शकता .

चॉकलेट तयार करण्यासाठी तुम्हाला मशीन लागतील..?

● मेल्टर :- ही मशीन चॉकलेट कंपाऊंड विरघळण्यासाठी वापरली जाते. किंवा तुम्ही गॅस वर डबल बॉयलर चा वापर करून पण हे करु शकता.

● मिक्सिन्ग :- या मशीनचा वापर करून तुम्ही विरघळलेले जे चॉकलेट कंपाऊंड आहे ते मिक्स करण्यासाठी वापरू शकता तुम्ही या मशीनच्या सहाय्याने दुसऱ्या गोष्टी पण मिक्स करू शकता.

● रेफ्रीजरेटर :- चॉकलेट ला गोठवण्यासाठी तुम्हाला फ्रीज लागेल.

चॉकलेट तयार करण्यासाठी तुम्हाला काही कच्चा माल लागेल जो खाली दिला आहे.

• चॉकलेट कंपाउंड • सिलिकॉन पासून तयार केलेले चॉकलेट मोल्ड • स्पैचुला • एसेंस • चॉकलेट ला पॅक करण्यासाठी रैपिंग पेपर • पैकेजिंग करण्यासाठी इतर आवश्यक गोष्टी • चोको चिप्स • नट्स • रंग • फळाचा स्वाद • ट्रान्सफर शीट इत्यादी. या सर्व गोष्टी तुम्हाला मार्केट मध्ये सहज पणे मिळून जातील किंवा तुम्ही हे online पण बोलावू शकता.

चॉकलेट विकायचे कसे व कुठे..?

कोणत्या पण व्यवसायात अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे. ती आहे मार्केटिंग आणि माल विकणे. आपण माल तयार करून घेऊ, पण विकणे थोडे कठीण जाते. पण तुम्ही जर थोडे दिवस मेहनत केली व ग्राहकांना चांगले प्रोडक्ट दीले तर जास्त दिवस नाही लागणार तुम्हाला मार्केट मध्ये वर यायला.

तुम्ही चॉकलेट हे होलसेल मध्ये छोट्या दुकानंमध्ये वीकू शकता कीवा स्वतःचे एक शॉप टाकून पण विकू शकता. तसे तर online पण खूप website आहेत जिथं तुम्ही चॉकलेट विकू शकता.

Chocolate Business ची मार्केटिंग कशी करायची..?

तुम्ही जी चॉकलेट तयार केली आहे तिची मार्केटिंग पण करावी लागेल. आज मार्केटिंग शिवाय तर कोणतेच प्रॉडक्ट विकणे अशक्य आहे. तुम्ही जी चॉकलेट तयार केली आहे त्याचे चांगले फोटो काढा व एक चांगला कॅटलॉग तयार करा.

ज्यामध्ये चॉकलेट ची सर्व माहिती असेल जसे तिची किंमत गुणवत्ता वजन अशी माहिती त्यात असायला हवी व एक विडिओ पण तयार करा.

जो सोसिअल मीडिया वर मार्केटिंग करण्यात कामात येईल फेसबुक ऍड वर थोडा खर्च करा. कारण तुमचा जो टार्गेटेड ग्राहक वर्ग आहे हा सोसिअल मीडिया वर जास्त आहे .

या व्यवसायाला किती कामगार लागतील..?

या व्यवसायात तसे तर तुम्ही एकटेच काम करू शकता पण जर तुम्हाला व्यवसाय लवकर मोठा करायचा असेल तर २ ते ४ माणसे ठेवावी लागतील जे तुमचा माल पोहचवणे व नवीन ऑर्डर आणणे हे काम करतील. बाकी मार्केटिंगसाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता.

पहा हा व्यवसाय एक रिस्क नसलेला व्यवसाय आहे. या मध्ये रिस्क नाही, कारण यामध्ये कमी गुंतवणूक आहे. आपण रिस्क ज्याला म्हणतो. ते म्हणजे लावलेला पैसे डुबने पण या व्यवसायात तूमचा पैसा डुबू शकत नाही.

लहान मुलाना चॉकलेट खूप आवडतात तर तुम्ही त्याच चॉकलेट तयार करा ज्या लहान मुलाना आवडतील आणि त्यांना काही ऑफर द्या.

  • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻