मांस आणि अंडी न खाता, या ४ फळांनी शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन

Protein Alternative To Meat And Egg

Protein Alternative To Meat And Egg : मांस, अंडी आणि मासे हे प्रथिनांचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात, यात काहीच शंका नाही. हे प्रमाणात खाल्ले तर, यापासून आपली पोषणाची गरज पूर्ण होईल आणि शरीराला खुटल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. परंतु जे शाकाहारी आहेत, त्यांना हे शक्य होणार नाही. त्यांना प्रोटीन मिळवण्याकरिता इतर पर्याय शोधावे लागतील.

या आर्टिकल मध्ये आपण हेच भागणार आहोत, कि फळे खाऊनही तुम्हाला प्रोटीन मिळू शकते. यासाठी मांसाहारी पदार्थांवर अवलंबून राहू नका. ते ४ फळे कुठली ते बघूया.!

१) संत्रा

कोणी एखादाच असेल ज्याला, संत्री आणि त्याचा रस आवडत नसेल, संत्रा हे व्हिटॅमिन सी मिळविण्यासाठी खाल्ले जाते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यात प्रोटीन देखील असते, जे आपल्या स्नायूंना मजबूत करते. म्हणूनच संत्र्याचे नियमित सेवन करा.!

२) पेरू

पेरू हे अन्न पचवण्यासाठी महत्त्वाचे फळ मानले जाते, परंतु हे प्रोटीन मिळवण्यासाठी देखील खाऊ शकतो, हे खूपच कमी लोकांना माहिती आहे. चिरलेल्या पेरूच्या एका वाटीत सुमारे ४.२ ग्रॅम प्रोटीन आढळतात. पेरूचे सेवन करणे हे आरोग्यासाठी चांगले आहे.

३) एवोकॅडो

एवोकॅडो हा देखील प्रोटीनचा एक महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. जर तुम्ही एक वाटी एवोकॅडो खाल्ले, तर शरीराला सुमारे 4 ग्रॅम प्रोटीन मिळते. तसेच एवोकॅडो मध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. आणि प्रोटीनमुळे शरीराला ताकद मिळते.

४) किवी

किवीची चव आपल्या सर्वांनाच अट्रॅक्ट करते, त्याचबरोबर ती आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर मानली जाते. एक किवी खाल्ल्याने सुमारे २.१ ग्रॅम प्रोटीन मिळते. याशिवाय इतरही अनेक पोषक तत्वे यामध्ये आहेत.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment