हृदयविकार टाळण्यासाठी बासा मासा|Basa fish in Marathi

बासा मासा (Basa fish) हा कॅटफिशचा प्रकार आहे. बासा माशांना नदीतील मोची, व्हिएतनामी मोची, पंगासिअस किंवा स्वाई असेही म्हटले जाते. बासा माशांचे सेवन फार मोठ्या प्रमाणात केले जाते. बासा मासा हा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे.

Basa-fish-in-Marathi

Basa fish in Marathi

पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील लोक बासा मासाचे सेवन अधिक प्रमाणात करतात. बासा फिशचे सेवन केल्याने हृदय निरोगी आणि मजबूत राहते. या माशाच्या सेवन केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप कमी होतो. चल तर त्या बद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया..!

बासा माशाची पोषणमूल्ये

कॅलरीज158
प्रथिने22.5 ग्रॅम
चरबी 7 ग्रॅम
संतृप्त चरबी2 ग्रॅम
कोलेस्टेरॉल73 मिग्रॅ
कर्बोदक0 ग्रॅम
सोडियम89 मिग्रॅ

बासा फिश खाण्याचे फायदे (Benefits of Basa fish)

1) दुसऱ्या हृदयविकाराचा झटका टाळतो.

एखाद्या व्यक्तीला एकदा हृदयविकाराचा झटका आला असेल, तर त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा सुद्धा हृदयविकाराचा झटका येतोच हे नक्कीच आहे, पण दुसरा हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी बासा मासा महत्त्वाची भूमिका बजावते.

बासा फिश मध्ये ओमेगा 3, फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात आढळते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी संभवतो. त्याचप्रमाणे बासा मासे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य राहण्यास मदत होते, त्यामुळे हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी असतो.

हे वाचलंत का ? –
* मासे पाण्याखाली कसे श्वास घेतात?
* सॅल्मन फिश खाण्याचे आश्चर्यकारक फायदे तसेच नुकसान सुद्धा

2) मेंदूचे आरोग्य सुधारते.

बासा मासे खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बासा फिश मध्ये DHA (docosahexaenoic acid) असते.ओमेगा 3 फॅटी ऍसिड आरोग्यासाठी चांगले आहे.

DHA मूळे पेशींच्या वाढ चांगल्या प्रमाणात होते.

ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे मेंदूला सामान्यपणे आणि योग्य कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी आवश्यक आहे.

बासा मासेचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते, तसेच शिकण्याची क्षमता सुधारन्यास मदत होते.

3) वजन कमी होण्यास मदत होते.

बासा फिश मध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आणि चरबी कमी प्रमाणात आढळते . तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, त्यांनी बासा मासाचे सेवन करावे.

या मध्ये प्रथिने जास्त, चरबी आणि कॅलरीज कमी असल्याने, वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात बासा माशाचा समावेश करू शकता.

4) बासा फिशमध्ये प्रथिने जास्त असतात.

बासा फिशमध्ये प्रथिने जास्त असल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व अमीनो ऍसिड मिळतात. शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी प्रथिने मदत करतात.

लहान मुले, गर्भवती महिला आणि तरुण प्रौढांसाठी प्रथिने आवश्यक असतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

प्र.1) बासा मासाचे सेवन कसे करावे?

उत्तर) बासा मासा हा पूर्ण पणे शिजलेला असावा, त्याचप्रमाणे बासा मासा हे चांगल्या प्रकारे तळलेले आणि वाफवलेले असावे. आठवड्यातुन एकदा बासा मासा चे सेवन करणे, आरोग्यासाठी चांगले असते. यामध्ये उच्च-गुणवत्तेच्या प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आढळते.

प्र. 2) शिळे मासे वजन कमी करण्यास मदत करू शकतात का?

उत्तर) बासा मासा मध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळते. तसेच चरबी चे प्रमाण कमी असते. ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी बासा मासा चे सेवन करावे. बासा मासा चे सेवन केल्यास शरीरातील, विशेषत: मांड्या आणि ओटीपोटाच्या भागात जास्त चरबी असते. ती चरबी कमी करण्यास मदत होते.

प्र. 3) बासा प्रथिनांनी समृद्ध आहे का?

उत्तर) बासा मासा मध्ये उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा समावेश आहे. बासा माशात 100 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये 13 ग्रॅम प्रोटीन असते. जे साधारणतः एका अंड्यापेक्षा जास्त असते.

प्र.4 ) बासा माशाचे काय फायदे आहेत?

उत्तर) बासा माशा मध्ये प्रथिने,आवश्यक चरबी, ओमेगा -3 फॅटी ऍसिड आढळते. जे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, तसेच वजन कमी करणे आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात.

  • मोहिनी राऊत

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला बासा मासा (Basa Fish in marathi ) बद्दल माहिती देणे असल्याकारणाने बासा मासाचा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment