खूप वर्षांनंतर प्रियंका चोप्रा एक्स बॉयफ्रेंड बद्दल बोलल्या,

Priyanka Chopra On Previous Relationship

Priyanka Chopra On Previous Relationship: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘लव्ह अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात प्रियांका आणि हॉलिवूड स्टार सॅम ह्यूघन यांचा रोमान्स फॅन्स ला खूप आवडला आहे.

प्रियांका चोप्रा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. त्याच दरम्यान, प्रियांका चोप्राने एका मुलाखतीमध्ये तिच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल मोकळेपणाने बोलली.

‘कॉल हर डॅडी’ पॉडकास्टच्या लेटेस्ट शोमध्ये, जेव्हा प्रियांका चोप्रा ला विचारण्यात आले की, रोमँटिक जोडीदार निवडताना तुम्ही कोणताही पॅटर्न फॉलो केला आहे का? त्यामुळे प्रियांकाच्या तिच्या भूतकाळातील नात्यातील कटू आठवणी ताज्या झाल्या.

आपल्या भूतकाळातील नातेसंबंधांची आठवण करून देताना अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली की, ती एकामागून एक रिलेशनशिप्स मध्ये होती, पण या काळात तिने स्वत:ला कधीच वेळ दिला नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्रा म्हणाली, “ज्या अभिनेत्यांसोबत मी काम केले आहे किंवा सेटवर भेटले आहे, त्यांना मी नेहमीच डेट केले आहे.

त्यामुळे नाते कसे असावे याची मला कल्पना नव्हती. मी नेहमीच अशा नात्याचा शोध घेत असे जे कि माझ्यामध्ये लोकांना फिट करण्याचा प्रयत्न केला.

मी डोअरमेट बनले असते – प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने पुढे सांगितले की, मी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार समजू लागले होते. मला केअर टेकर व्हायला हवे असे वाटले. अभिनेत्री म्हणाली, “माझं काम, माझं जॉब, माझ्या मीटिंग आणि माझं प्राधान्य या सगळ्यात तो अग्रेसर होता.

मी अक्षरशः डोअरमॅट सारखी झाली असती कारण महिलांना इतके दिवस तेच करावे लागले आहे. असे म्हणतात की आमची भूमिका कुटुंबाला एकत्र आणणे आणि तुमचा नवरा घरी आल्यावर त्याला आरामदायी वाटेल अशी असायला पाहिजे.” प्रियांका चोप्राचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लव्ह अगेन व्यतिरिक्त अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच अॅमेझॉन प्राइमच्या ऑरिजनल वेब सीरीज ‘सिटाडेल’मध्ये दिसली आहे. या सीरीज मध्ये प्रियंका एका स्पाई (गुप्तहेराच्या) भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील प्रियांकाची स्टाइल आणि दमदार अॅक्शन चाहत्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻