नंदिनीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चन नव्हे; तर पहिली पसंती

Image Source – bollywoodlife

Ponniyin Selvan 2: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तामिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपट पोन्नियिन सेल्वन मध्ये नंदिनीची भूमिका साकारत आहे. पण तुम्हाला माहित आहे, का की या चित्रपटासाठी ऐश्वर्या नव्हे, तर मेकर्सची पहिली पसंती कोणी दुसरीच अभिनेत्री होती. त्या अभिनेत्री चे नाव जाणून घ्या.

तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आगामी मूवी Ponniyin Selvan सध्या चर्चे मध्ये आहे. स्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर मणिरत्नम यांच्या मूवी ची बरीच चर्चा आहे.

28 एप्रिलला हा मूवी चित्रपटगृहात दाखल होत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग खूप चर्चेत होता. या मूवीने जगभरात 500 कोटींची कमाई केली होती.

त्यानंतर सर्वांचे लक्ष मूवी च्या दुसऱ्या भागाकडे लागल्या आहेत. आता या मूवी बाबत एक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन मुख्य अभिनेत्री नंदिनीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा नंदिनीच्या सोबत होणाऱ्या फसवणुकी बद्दल आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली पसंती नव्हती.

नंदिनीच्या भूमिकेत अनुष्का शेट्टीला कास्ट करायचे मेकर्सचे इच्छा

होय, मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, ऐश्वर्या राय बच्चनच्या आधी निर्मात्यांनी नंदिनीच्या भूमिकेसाठी टॉलिवूड स्टार अनुष्का शेट्टीशी संपर्क साधला होता.

बाहुबलीमधील देवसेना या ऍक्ट ने लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे निर्मातेही चांगलेच प्रभावित झाले. म्हणूनच नंदिनीच्या भूमिकेसाठी तिला पहिल्यांदा अप्रोच करण्यात आले. परंतु, अनुष्का शेट्टीने ही ऑफर नाकारली.

अनुष्का शेट्टीला ‘MeToo’ आरोपीसोबत काम करायचे नव्हते

रिपोर्ट्सनुसार, ज्यावेळी या मूवी साठी अनुष्का शेट्टीला अप्रोच करण्यात आले होते. त्यावेळी, चित्रपटाच्या मुख्य मूवी मेकर सदस्यांपैकी एकावर MeToo आरोपांमुळे अभिनेत्रीने या मूवी ची ऑफर नाकारली होती.

चित्रपटाच्या गाण्यांचे लेखक वैरामुथू यांच्यावर दक्षिण इंडस्ट्रीतील अनेक महिला कलाकारांनी ‘MeToo’ बद्दल आरोप केले होते. त्यामुळे अभिनेत्री ‘MeToo’ आरोपीसोबत काम करणे सोयीचे वाटले नाही.

त्यामुळे अभिनेत्रीने ही ऑफर नाकारली. काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अनुष्का शेट्टी ने या मूवी साठी मोठी रक्कम मागितली होती. त्यामुळे निर्माते अनुष्का शेट्टीला या चित्रपटाचा भाग बनवू शकले नाहीत.

News Source – bollywoodlife


हे वाचलंत का ? –

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻