पीएम किसान योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची..?

पंतप्रधान-शेतकरी-सन्मान-योजना-PM-Kisan
पंतप्रधान-शेतकरी-सन्मान-योजना-(PM-Kisan)

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना काय आहे ? (PM-Kisan Samman Nidhi in marathi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi) अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जोडली जाते.

केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशातील सुमारे 14.50 कोटी शेतकऱ्यांना होईल.

सर्वात आधी या योजनेच्या अधीन दोन हेक्टरपेक्षा कमी जागेची लागवड करणारे शेतकरी तीन भागात वर्षाकाठी 6 हजार रुपये सन्मान निधी घेत असत. त्यानंतर 12.5 कोटी शेतकरी त्यांच्या योजनेत आले. परंतु आत्ता या योजनेचा विस्तार करण्यात आला.

खास गोष्ट म्हणजे आता 2 हेक्टर क्षेत्राची अट लागू होणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने शेत जमीन असेल त्याला प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi) याचा फायदा घेता येईल.

पीएम किसान योजना चा फायदा कोणाला-कोणाला मिळणार नाही?

केंद्र किंवा राज्य सरकारमधील अधिकारी जसे की, मल्टी टास्किंग स्टाफ, डी ग्रुप कर्मचारी, चवथ्या श्रेणीतील कर्मचारी (Class 4), वगळता आणि 10 हजार पेक्षा जास्त पेन्शन घेणार्‍या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळणार नाही.

या व्यतिरिक्त डॉक्टर, वकील इत्यादी इतर व्यावसायिक शेती करतात, तर तेसुद्धा लाभास पात्र नाहीत. तसेच, गेल्या आर्थिक वर्षात ज्यांनी आयकर भरला आहे, त्यांनासुद्धा याचा फायदा होऊ शकत नाही. त्याचबरोबर खासदार, आमदार, मंत्री किंवा शेती करणारे महापौरांनाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही.

जे शेतीतील कामाऐवजी इतर कामांसाठी शेतजमीन वापरत आहेत. त्यांना सुद्धा PM-kisan samman nidhi फायदा मिळणार नाही.

खेड्यांमधील बरेच शेतकरी इतरांच्या शेतात शेतीची कामे करतात पण त्यांच्याकडे शेती नसते. शेताचा मालक पिकाचा काही भाग किंवा पैसे देतो. असे शेतकरी PM-Kisan योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या भूमीवर (शेतीवर) कोणताही फायदा होणार मिळणार नाही.

(PM Kisan yojna marathi) फायदा घेण्यासाठी सातबारा वर तुमचे नाव असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्या नावाने शेतजमीन असणे आवश्यक आहे.

पंतप्रधान किसन सन्मान निधी योजना (पीएम किसान माहिती):- मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी केंद्र सरकार सतत शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने अलीकडेच नवीन कृषी विधेयक लागू केले.

नवीन कायद्याबरोबरच केंद्र सरकार 2014 पासून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही देत आहे. छोट्या शेतकऱ्यांना किंवा ज्याच्याकडे स्वत: च्या मालकीची जमीन कमी आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (pm kisan samman nidhi) सुरू केली.

तुम्हाला माहिती असेलच, पीएम किसान योजनेत मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. सरकार ही आर्थिक मदत तीन हप्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते.

तसेच आत्तापर्यंत, केंद्र सरकारने या योजनेंतर्गत सहा हप्ते शेतकऱ्यांना पाठवल्या आहेत. तर आता सातवा हप्ता लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविण्यास तयार आहे.

नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठविणे सुरू होईल. याआधी शेतकऱ्यांना त्यांचे खाते अद्यतनित (अपडेट) करावे लागेल.

देशातील अशी लाखो शेतकरी आहेत, ज्यांना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांच्या कागदपत्रांची चूक हेच एकमेव कारण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खूप शेतकर्‍यांच्या कागदपत्रा मध्ये चूक आढळली आहे, ज्यामुळे त्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हस्तांतरित केला जात नाही.

त्यासाठी सर्वात आधी आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे महत्वाचे आहे. आपले तपशील तपासा आणि लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते देखील पहा.

बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश व्यतिरिक्त देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे खूप शेतकऱ्यांचे खाते अपडेट व कागदपत्रातील त्रुटींमुळे या योजनेचा लाभ मिळू शकला नाही, म्हणून पंतप्रधान किसान योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ घेण्याकरिता केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला डेटा तपासणे आवश्यक आहे.

पीएम – किसान योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात..?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साइज फोटो
  • सातबारा उतारा
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • मोबाइल नंबर
  • आधार कार्ड:- पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान योजना) लाभ घेणार्‍या शेतकर्‍याला आधार कार्ड देणे बंधनकारक आहे. आपण आधार कार्ड न दिल्यास आपण या योजनेचा लाभ घेण्यास सक्षम राहणार नाही.
  • बँक खाते क्रमांक:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळविण्यासाठी आपल्याकडे बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. कारण सरकार डीबीटी मार्फत शेतकर्‍यांना पैसे पाठवतात. तसेच आपले बँक खाते आधारशी जोडले जाणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या हप्त्यात बरेच बदल करण्यात आले. उदाहरणार्थ, जेव्हा पहिला हप्ता दिला गेला होता, त्यावेळी आधार क्रमांक आवश्यक नव्हता. दुसर्‍या हप्त्यासह आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु आसाम, मेघालय, जम्मू-काश्मीरला यातून सूट देण्यात आली आहे.

आपण आपले कागदपत्रे (document) वेबसाइटवर अपलोड करू शकता. Farmers corner पर्यायावर जा आणि आधार कार्ड जोडायचे असल्यास, त्यावर तुम्ही एडिट आधार डिटेल या ऑप्शनवर क्लिक करू शकता. आणि आधार जोडू शकता.

पीएम किसान योजनेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची..?

pm-kisan-marathi-mahiti.
pm-kisan-marathi-mahiti

सर्वप्रथम आपल्याला या योजनेशी संबंधित अधिकृत साइटला भेट द्यावी लागेल. पीएम किसान सन्मान निधि योजना

यानंतर आपल्याला “Farmers Corner” विभागात जावे लागेल. जो की, वेबसाईट वर बाजूला असेल.

pm-kisan-in-marathi
pm-kisan-in-marathi

आता “New Farmer Registration” म्हणजेच नवीन शेतकरी नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

असे केल्यानंतर, एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आपल्याला आधार क्रमांक विचारला जाईल. आधार क्रमांक भरल्यानंतर, इमेज कोड भरावा लागेल. (इमेज कोड तिथेच दिलेला असतो. तो जशास तसा भरा) आणि “Click Here to Continue” वर क्लिक करा.

PM kisan yojana in marathi

pm-किसान-माहिती
pm-किसान-माहिती

जर आपण यापूर्वी कधीही नोंदणी केली नसेल, तर आपल्याला एक नोंद दिसेल (Record not found with given details) ज्यामध्ये या आधार क्रमांकावरून कोणतीही नोंदणी आढळली नाही. नंतर तुम्हाला OK बटण वर क्लिक करावे लागेल.

क्लिक केल्यावर (“Record not found with given details. Do you want to register on PM- Kisan Portal) याचा अर्थ तुम्ही आधी नोंदणी केलेली नाही , तुम्हाला नाव नोंदवायचे आहे का? असल्यास yes वर क्लीक करावे.

मग एक बॉक्स उघडेल ज्यामध्ये आपण ग्रामीण (Rural) शेतकरी किंवा शहरी (Urban) शेतकरी आहात की नाही हे निवडण्यास सांगितले जाईल.

योग्य निवड करा आणि होय (Yes) वर क्लिक करा.

आता आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आपल्याला किसान सन्मान निधी नोंदणी फॉर्म दिसेल. हा फॉर्म पूर्ण भरावा लागेल. यामध्ये तुमचे राज्य (state) कोणते? जिल्हा (District) , तुमचा तालुक्का कुठला हे सर्व माहिती भरावी लागेल.

Farmer name या रकान्यात तुमचे नाव तसेच बँक खात्याची माहिती भरावी लागेल. लक्षात ठेवा की सर्व माहिती योग्यरित्या भरली गेली आहे की नाही हे तपासा. माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

यानंतर, आणखी एक पेज तुमच्यासमोर उघडेल, ज्यामध्ये आपणास जमिनीच्या कागदपत्रांशी संबंधित माहिती भरावी लागेल. त्यासाठी खसरा क्रमांक आणि खाते क्रमांक भरावा लागेल.

यानंतर आपल्याला सेव्ह (save) करण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि अशा प्रकारे आपली नोंदणी होईल.

तुमचा नोंदणी क्रमांक लक्षात ठेवा. किव्हा बुक मध्ये लिहून घ्या.

PM-kisan निधी मध्ये आपले नाव कसे बघायचे..?

आपले नाव पीएम किसान वेबसाईटवर ऑनलाइन पहाण्यासाठी खाली दिलेल्या माहितीचे अनुसरण करा.

1) pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्या.

2) वेबसाईटवर ओपन झाल्यानंतर येथे ‘फार्मर कॉर्नर’ (farmer corner) वर जा.

3) त्यांनतर Beneficiary list ‘लाभार्थी सूची’ वर क्लिक करा.

4) यानंतर, आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव याबद्दल माहिती भरा.

5) हे भरल्यानंतर, गेट रिपोर्टवर क्लिक करा आणि संपूर्ण यादी मिळवा.

आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कसे बघायचे..?

  • आधी पंतप्रधान किसान सन्मान निधी https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ हा पर्याय दिसेल.
  • येथे ‘Beneficiary status’ (बेनेफिशरी स्टेटस) पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पेज उघडेल.
  • त्यानंतर तेथे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील पर्यायांपैकी एक निवडा.
  • आपण निवडलेला पर्याय भरा. नंतर गेट डेटा वर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जमा खात्याची माहिती मिळेल. म्हणजेच आपल्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले. इत्यादी इत्यादी….

आपण मोबाइल अ‍ॅपद्वारे देखील अर्ज करू शकता.

आजच्या युगात वाढता मोबाईल चा वापर बघता भारत सरकारने असे बरेचसे अँप मोबाइल साठी बनवले आहे त्यातील नवीन अँप म्हणजे आरोग्य सेतू अँप.

असेच एक अँप आहे pm kisan app
Pm किसान निधी योजनेची सर्व माहिती देण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान मोबाइल अँप सुरू केला आहे. पीएम किसान मोबाइल अ‍ॅपमध्ये पीएम-किसान अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणारी सर्व वैशिष्ट्ये आहेत.

PM-Kisan-app-marathi
PM-Kisan-app-marathi

पीएम किसान मोबाइल अँप डाउनलोड कसे करावे…?

पंतप्रधान किसान मोबाइल अँप डाउनलोड करणे खूप सोपे आहे. खाली दिलेल्या माहितीचे अनुसरण करा आणि अँप डाउनलोड करा.

1 – आपल्या मोबाइलवरील Play Store अँप वर जा.

2 – यानंतर आपल्याला सर्च बॉक्स वर पंतप्रधान-किसान मोबाइल अँप टाइप करावा लागेल.

3 – पंतप्रधान-किसान मोबाइल अँप (PMKISAN Gol) स्क्रीनवर दिसून येईल, फक्त ते डाउनलोड करा.

(सूचना- लक्षात असू द्या की, गूगल अँप स्टोर वर भरपूर pm kisan app सारखे दिसणारे अँप्स आहेत, त्यातील योग्य तेच डाउनलोड करावे. योग्य अँप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही तरुण पिढी ची मदत घेऊ शकता. त्यांना यातली माहिती असते.)

अँप डाउनलोड झाल्यावर…..

अ‍ॅपमध्ये सर्व वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील जसे की,

1- New farmer registration (नवीन शेतकरी नोंदणी)

2- Beneficiary Status (लाभार्थी स्थिती)

3- Edit Aadhaar details (आधार तपशील संपादित करा.)

4- Status of self registered farmers (स्वयं-नोंदणीकृत शेतकर्‍यांची स्थिती)

5- PM Kisan helpline (पंतप्रधान किसान हेल्पलाईन)


किसान सन्मान योजना यादी

१) सर्वप्रथम तुम्ही आपल्या मोबाइलच्या google chrome वर हि लिंक टाकून https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
२) त्या ठिकाणी Payment Success टॅबखाली भारताचा नकाशा तुम्हाला दिसेल. त्याखाली डॅशबोर्ड असे लिहिलेले असेल, त्यावर क्लिक करा
३) यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
४) हे गाव चे नाव असलेले डॅशबोर्डचे पेज असेल, येथे तुम्ही तुमच्या गावाची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
५) याठिकाणी तुम्ही आधी राज्य निवडा, मग तुमचा जिल्हा, मग तहसील आणि मग तुमचे गाव.
६) त्यानंतर शो या बटणावर क्लिक करा.
७) यानंतर, तुम्हाला ज्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यावर क्लिक करा, लगेच संपूर्ण तपशीलवार माहिती तुमच्यासमोर येईल.
८) व्हिलेज डॅशबोर्डच्या खाली चार बटणे दिसतील, किती शेतकऱ्यांचा डेटा पोहोचला हे जाणून घ्यायचे असेल, तर Data Received वर क्लिक करा, ज्यांचे पैसे बाकी आहेत, त्यांनी दुसऱ्या बटणावर क्लिक करा.

तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला मिळेल.


आता पर्यंत शेतकर्‍यांना मिळालेला हप्ता. (पीएम किसान योजना बद्दल माहिती)

1- पंतप्रधान किसान योजना पहिला हप्ता – फेब्रुवारी 2019 ला जारी केला.
2- पंतप्रधान किसान योजना दुसरा हप्ता – 2 एप्रिल 2019 रोजी जारी केला.
3- पंतप्रधान किसान योजना तिसरा हप्ता – ऑगस्टमध्ये 2019 ला जारी केला.
4- पंतप्रधान किसान योजना चौथा हप्ता – जानेवारी 2020 ला जारी केला.
5- पंतप्रधान किसान योजना पाचवा हप्ता – 1 एप्रिल 2020 ला जारी केला.
6- PM-Kisan योजना सहावा हप्ता – 1 ऑगस्टपासून पैसे येणे सुरू होईल.


हेल्पलाईन नंबर अँड ईमेल

तुम्ही PM-किसान योजनेमध्ये नोंद केलेली असेल आणि तुमचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील, तरी देखील तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होत नसेल तर खालील दिलेल्या नंबर आणि इमेल वर संपर्क करू शकता.

PM KISAN SAMMAN NIDHI HELPLINE NUMBER – 155261 / 011-24300606

MAHARASHTRA

[email protected]


  • सागर राऊत

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Schemes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *