पानफुटी वनस्पतीचे फायदे | Panfuti plant benefits in marathi

पानफुटी वनस्पतीचे फायदे

panfuti-plant-benefits-in-marathi

panfuti plant benefits in marathi

पानफुटी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. जी किडनी स्टोन या आजारावर उपाय म्हणून प्रसिध्द आहे. हे झाड उष्णकटिबंधीय प्रदेशात मोठया प्रमाणात मिळते. पानफुटी ही घरघुती उपचार म्हणून वापरली जाते. 

हे झाड किडनी स्टोन करीता इतके प्रभावशाली आहे, की हे तुमचा किडनी स्टोन्स मुळातून नष्ट करू शकते. या झाडाला आयुर्वेद मध्ये भष्मपथरी, पाषाणभेद, पाणफूटी म्हणून ओळखले जाते. तसेच आयुर्वेद मध्ये याला प्रोस्टेट ग्रंथी किडनी स्टोन च्या समस्यानसाठी औषध मानले जाते.

आपण जर याला दिलेल्या नावाचा विचार करू तर पाषाणभेद म्हणजे पाषाण – दगड आणि भेद – तुकडे हे दगळाचे तुकडे करणारी आयुर्वेदिक वनस्पती मानली जाते. या वनस्पती मध्ये असे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत, जे तुमच्या किडनी मधील स्टोन्सला छोटे-छोटे तुकडे करून मूत्रमार्गाद्वारे बाहेर काढते. 

हे वाचलंत का? –
* क्विनोआ म्हणजे काय?
* अजवाईन म्हणजे काय?

हे वनस्पती याच सोबत अनेक रोगांवर उपयोगी आहे. जसे रक्तदाब, डोकेदुखी, अस्थमा, मूत्ररोग या सारख्या रोगांवर उपयुक्त आहे.  तसे तर पानफुटी चे खूप फायदे आहेत, परंतु हे फक्त किडणी स्टोन साठी ओळखली जाते. जे तुमच्या किडनी स्टोन ला बाहेर काढण्यास मदत करते. याला हिवाळ्यात छोटे छोटे पांढऱ्या व गुलाबी रंगाची फुल येतात.

औषधी म्हणून या झाडाचे पान खूप उपयोगी आहेत. जे खायला थोडे आंबट व तुरट लागतात. याचा स्वाद सुद्धा चांगला आहे. खाण्यासाठी याची पाने तोडून चांगल्या पाण्याने स्वच्छ धून घ्यावे न धुता याची पाने खाऊ नये.

याची पाने तुम्ही सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत खाऊ शकता. पानफुटी चा नियमित वापर केल्यास काही दिवसात तुमचा किडनी स्टोन हा बाहेर येऊन जाईल. पोटदुखी किंवा पोटाच्या समस्यानसाठी सुद्धा याच्या पानाच्या रसात सुंठ मिक्स करून पिल्यास पोटाच्या समस्यान मध्ये अराम मिळतो.


पानफुटी वनस्पती उपयोग

1) पानफुटी जखम उपचारासाठी

तुम्हाला शरीराला कुठे जखम झाल्यास, त्याचा उपचार म्हणून तुम्ही पानफुटी चा वापर करू शकता. याचे पान तोडून त्यांना कांडून बारीक करून घ्या व थोडे गरम करून आणि ते मिश्रण तुम्ही जखमी वर लावू शकता. 

ही वनस्पती तुमची जखम बसवण्यात मदत करतेच; सोबतच जखमे मुळे पडलेल्या डागांना सुद्धा नाहीसे करू शकते.

2) हृदया साठी गुणकारी

पानफुटी हे आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे असल्याकारणाने त्याला हृदय निरोगी ठेवण्यासाठी देखील ओळखले जातात. हे आपल्या शरीराचे सर्वात महत्वाचे अवयव हृदयाचे संरक्षण करण्यास मदत करते.

3) पानफुटी खोकल्या करिता

तुम्हाला खूप खोकला असेल, तर हे वनस्पतीं खोकल्यावर सुद्धा उपयुक्त आहे. याकरिता तुम्ही याच्या पत्त्यांचा रस मधा सोबत 1 ते 2 ग्राम घेऊ शकता. हा रस घेतल्याने तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल, सोबतच फुप्फुस संबंधित बिमऱ्यान मध्ये अराम मिळेल.

4) पानफुटी तोंडाच्या फोडानसाठी

पानफुटी तुमच्या तोंडाला आलेल्या फोडांना बरे करते. याकरिता तुम्हाला याचे पान तोडून चावायची आहे. यांनी तुमच्या तोंडातील फोड लवकर कमी होतील.

panfuti plant uses in marathi

panfuti che fayde

5) दात दुःखी वर उपयुक्त

पानफुटी ही दाता संबंधित रोगांवर सुद्धा उपयुक्त आहे. दात किंवा डाळ दुःखी वर याचा उपयोग केला जातो. यामध्ये एंटी-वायरस आणि एंटी-बैक्टीरियल गुणधर्म आहेत. जे दाताच्या दुखण्यावर प्रभावकारी आहेत.

6) पानफुटी चे फायदे अस्थमासाठी

पानफुटी ही अशी वनस्पती आहे. ज्यामध्ये एंटी-अस्थमा गुणधर्म आहेत. जे अस्थमा च्या उपचारासाठी मदत करतात. पानफुटी मध्ये एंटीमाइक्रोबायल एजेंट असतात. जे अस्थमा च्या उपचारामध्ये मदत करतात. ज्यांना अस्थमा चा त्रास असेल, ते याचा उपयोग करू शकतात.

7) मधुमेहा मध्ये फायदेशीर

पानफुटी एका नियंत्रित प्रमाणात खाल्यास तुम्ही याने मधुमेहा वर नियंत्रण मिळवू शकता. आपण जर याच्या पानाचा काढा दिवसातून दोन दा घेतला; तर हे तुमच्या रक्तातील शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यात मदत करते.

ही होती पानफुटी बद्दल मराठी माहिती पानफुटी चे बरेचसे फायदे आहेत. पानफुटी वनस्पती उपयोग हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • धिरज तायडे

📢 (महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला पानफुटी वनस्पतीचे फायदे बद्दल माहिती देणे असल्याकारणाने पानफुटी चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻