अजवाईन बद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती

ओवा खाण्याचे फायदे

ajwain meaning in marathi

ajwain meaning in marathi

अजवाईन म्हणजे काय? (Ajwain meaning in marathi)

अजवाईन ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या खाण्याचा स्वाद तर वाढवतेच सोबतच याचे आरोग्यासाठी सुद्धा भरपूर फायदे आहेत. याच कारणामुळे आपल्या देशात खाण्यात अजवाईन चा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.

आणि याच कारणामुळे आम्ही तुम्हाला त्याचे आरोग्यासाठी असेलेले फायदे सांगणार आहोत, सोबतच जास्त अजवाईन खाल्ल्यास त्याचे कोणते दुष्परिणाम होतात. हो आजवाईन खाण्याचे फायदे आहेत परंतु हा कोणत्याही रोगावर पक्का उपाय नाही. अजवाईन तुम्ही दररोज वापरता पण अजवाईन म्हणजे नक्की काय? अजवाईन ला मराठी मध्ये काय म्हणतात? तर अजवाईन ला मराठी मध्ये ओवा असे म्हणतात.

आता आर्टिकल मध्ये पुढे अजवाईन ला आपण ओवा म्हणून संबोधणार आहोत; तर गोधळून जाऊ नका..! Ajwain म्हणजेच ओवा. तर अजवाईन (ओवा) तुमच्या शारीरिक समस्या दूर करतो व त्यांना दुरुस्त पण करतो आणि याला औषध समजू नये. चला पुढे बघूया अजवाईन चे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत.

ओव्याचे शास्त्रीय नाव ट्रॅकिस्पर्मम कॉप्टिकम (Trachyspermum copticum) हे आहे. ओवा हा एक प्रकारचा मसाला आहे. ज्याचे झाड हे हिरव्या रंगाचे असते आणि ओवा हे हिरव्या रंगाचे अंडाकार आकाराचे झाडाला असतात. हे झाड जिर आणि सोपं यांच्या परिवारातील झाड आहे. ओव्याचा स्वाद थोडा कडू आणि तिखट असतो. 

ओवा (अजवाईन) वनस्पतीची उत्पत्ती पर्शिया (इराण) इथे झाली असे म्हणतात. तेथून ते भारतात पसरले आणि आता मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतही त्याची लागवड झाली आहे.

ओव्याची इतर नावे म्हणजे अजोवन, अजोवन कॅरवे, अजवाईन बियाणे, अजवाईन, ओवा, यवन यासारखी खूप प्रकारची नावे याला आहेत.

हे वाचलंत का? –
* बडीशेप खाण्याचे फायदे सोबतच नुकसान देखील
* जेष्ठमध खा.! आणि निरोगी राहा.!

अजवाईन ला इतर भाषेत काय म्हणतात?

1) मराठी – ओवा

2) इंग्रजी – बिशॉप विड (Bishop’s Weed) carom seeds

3) हिंदी – अजवाईन (Ajwain)

4) संस्कृत – यामिनी, याकिमी

5) तेलुगू – वमू

6) गुजराती – अजमो, यवन

ajwain in marathi


ओवा खाण्याचे फायदे

अजवाईन मध्ये खुप सारे औषधी गुणधर्म मिळतात. जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ओवा सर्दी, खोकला, ऍसिडिटी, उच्च रक्तदाब या सारख्या रोगांना पासून आपल्या दूर ठेवतो.

१) ऍसिडिटी करीता फायदेशीर

ऍसिडिटी ची समस्या आता सामान्य झाली आहे. ऍसिडिटी ही कुणालाही होऊ शकते. अशावेळी तुम्हाला ऍसिडिटी साठी अजवाईन कामात येते. एका वैज्ञानिक शोधा नुसार ओवा मध्ये एंटीस्पास्मोडिक आणि कार्मिनेटिव गन असतात. जे ऍसिडिटी ची समस्या दूर करण्यात मदत करतात. त्याच सोबत यामध्ये आणखी एक घटक असतो.

थाइमोल नावाचा, जो गैस्ट्रोइंटेस्टाइनल सारख्या रोगांन पासून आपल्याला दूर ठेवतो. ओवा आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करतो. ज्यामुळे आपले पोट चांगले राहते व त्यामुळे आपले आरोग्य.

२) अस्थमा मध्ये फायदे

अस्थमा म्हणजे श्वसनाचा आजार. अस्थमा वर सुद्धा ओवा गुणकारी आहे. काही शोधान मध्ये असे आढळून आले, की ओवा मध्ये एंटीअस्थमा गुणधर्म आहेत. त्यामुळे याचा सकारात्मक प्रभाव श्वसन प्रणाली वर होतो. ज्यामुळे अस्थमा मध्ये आराम मिळतो.

३) सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव

काही वैज्ञानिक रिसर्च मध्ये असे लक्षात आले की ओवा मध्ये 50% थाइमोल नावाचा घटक असतो. जो मुख्यता एंटीबैक्टीरियल म्हणून ओळखला जातो. 

त्याच सोबत हा घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरतो. ज्यामुळे आपल्याला होणारे छोटे मोठे सर्दी, ताप व व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतो.

४) गाठ आणि गूढगे दुःखी पासून आराम

अजवाईन हे आपल्याला अर्थराइटिस (गाठी) आणि गूढगे दुःखी पासून आराम देऊ शकतो. एका रिसर्च मध्ये असे आढळून आले आहे कि, अर्थराइटिस च्या समस्ये पासून बचाव करण्यासाठी अजवाईन मध्ये असलेला एंटी-इंफ्लेमेटरी हा घटक प्रभावी ठरतो.

५) कोलेस्ट्रोल कमी करण्याकरिता फायदेशीर

शरिरातील वाढत्या कोलेस्ट्रॉल ला कमी करण्यासाठी ओव्याचा वापर केला जाऊ शकतो. ओव्याच्या बियांन मध्ये एंटीहाइपरलिपिडेमिक घटक मिळतो. जो शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो.

६) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

आपल्या कडे ओव्याला भाजून खाल्या जाते. याचा फायदा हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. एका शोधा नुसार वजन कमी करण्यासाठी ओवा हे फायदेशीर आहे. काही शोध मध्ये असे लक्षात आले की यामध्ये फायबर चे प्रमाण आहे. जे पचनशक्ती ला तंदुरुस्त करण्यास मदत करते आणि अन्न पचवण्यास मदत करते. यामध्ये असलेल्या फायबर मुळे आपली भूक जास्त वेळ शांत राहते.

ज्यामुळे आपण वजनाला नियंत्रित ठेऊ शकतो. यामुळे असे म्हणतात की ओवा हे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

७) ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यात उपयुक्त

रक्तदाब वाढल्या वर त्याचे खूप घातक परिणाम होऊ शकतात. चांगल्या आरोग्यासाठी आपला रक्तदाब संतुलित राहणे खूप महत्त्वाचे आहे. याकरिता ओवा खाणे एक चांगला उपाय असू शकतो. 

यामध्ये थाइमोल नावाचा घटक मोठ्या प्रमाणात मिळतो. जो रक्तदाब संतुलित ठेवण्यात मदत करतो. ओवा हे कैल्शियम चैनल ब्लॉकिंग, हृदयाचा वेग आणि रक्तदाब करीता खूप महत्वाचा आहे.

८) त्वचा निरोगी ठेवण्याकरिता फायदेशीर

अजवाईन मध्ये थाइमोल नावाचा घटक मिळतो. जो त्वचा संक्रमना पासून आपला बचाव करतो. सोबतच याचे एंटीवायरल, एंटीइंफ्लेमेटरी, एंटीफंगल आणि एंटी बैक्टीरियल गुणधर्म जे त्वचे मधील फंगस, बैक्टीरिया आणि त्वचे वरील सुजन दूर करतो.

९) केसांच्या काळजीसाठी उपयुक्त

आपल्या केसांना पाहिजे, ते पोषण न मिळाल्याने आपल्याला केसांच्या समस्या जाणवतात. आपण केसांना पाहिजे ते पोषक तत्व देण्यासाठी ओव्याच्या तेलाचा वापर करू शकता. हे तेल आपल्या केसांना तुटण्या व गळण्यापासून रोखते. तेल वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.


ओव्या मधील पोषक तत्व (Benefits Of Ajwain protein)

पौष्टिक तत्वमूल्य प्रति 100 G
ऊर्जा (Energy)238 kcal
प्रोटीन23.81 g
कार्बोहाइड्रेट47. 62 g
फायबर47.6 g
कॅल्शियम667 mg
आयर्न16.19 mg
पोटॅशियम1333 mg

ओवा खाण्याचे नुकसान

ओवा खाण्याचे खूप फायदे आहेत. हे तर आपण बघितलेच आहे. परंतु जास्त प्रमाणात ओवा खाल्ल्याने याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात.

ओवा मध्ये फायबर हे खूप मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामुळे पोटाच्या काही समस्या आपल्याला जाणवू शकतात. जर आपण ओवा जास्त प्रमाणात खात असल्यास आपल्याला ऍसिडिटी चा त्रास होऊ शकतो.

या लहान दिसणाऱ्या ओव्याचे खूप मोठे फायदे तुमच्या लक्षात आले असतीलच. ओवा हा फक्त खाण्यातच उपयुक्त नाही, तर याचे आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत.

याचे फायदे मात्र तुम्हाला तेव्हाच मिळतील, जेव्हा तुम्ही याचे योग्य प्रमाणात सेवन केले तर. गंभीर स्वरूपाच्या रोगांन मध्ये याचा वापर हा डॉक्टर सल्ला घेऊन करावा.

carom seeds in marathi

carom seeds in marathi

carom seeds meaning in marathi


ओवा खाण्याची योग्य पद्धत

१) एक चमचा ओवा आणि एक चमचा काळे मीठ एकत्र करून घ्या आणि नंतर एक ग्लास कोमट पाणी सोबत प्या.

२) एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाका आणि रात्रभर राहू द्या, सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी गरम करून प्या.

३) ओवा चा वापर भाजी, कोशिंबीर तसेच तडका देण्याकरिता केला जातो.


ओवा भजी (Ajwain Recipes)

जर तुम्ही हेल्दी आणि चविष्ट खाण्यासाठी शोधत असाल, तर तुम्ही अजवाईन ची पाने हे भजी बनवण्यासाठी वापरू शकता. कदाचित तुम्ही हे कधीच ट्राय केले नसेल, पण ते खरोखर खूप चवदार असते. एवढेच नाही तर अजवाईन ची पाने तुमच्या पचनसंस्थेसाठी खूप आरोग्यदायी आणि चांगली असतात.

अजवाईन ची भजी बनवण्यासाठी सामग्री

  • अजवाईन ची पाने (20-25)
  • बेसन (1 वाटी)
  • लाल मिरची पावडर (1 छोटा चमचा)
  • हळद (1/4 छोटा चमचा)
  • बेकिंग सोडा (एक चिमूटभर)
  • तळण्यासाठी तेल (3 चमचे)
  • चाट मसाला 1/2 (छोटा चमचा)

बनवण्याची पद्धत

एका भांड्यात बेसन, 1/2 छोटा चम्मच तिखट, हळद, बेकिंग सोडा, मीठ, हिंग, 3 चमचे गरम तेल आणि पुरेसे पाणी मिक्स करून गुळगुळीत पीठ बनवा. पीठ घट्ट नसावे.

नंतर अजवाईन ची पाने नीट धुवून वाळवा. यानंतर, ते चांगले लाटून, कापून घ्या आणि बेसन पिठात घाला.
दरम्यान, कढईत तेल गरम करा आणि त्यात अजवाईन पानाची पकोडे एक एक करून टाका.

ते सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि शोषक कागदावर काढा. फक्त चाट मसाला आणि उरलेली लाल तिखट शिंपडा आणि गरम सर्व्ह करा.


ओव्या बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1) ओवा हे पोटावरची चर्बी कमी करतो का?

Ans :-  हो, ओव्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण ओव्यामध्ये फायबर खूप मोठया प्रमाणात आहे. जे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करते.

Q.2) रोज ओवा खाणे चांगले आहे का?

Ans :- हो, तुम्ही जर याला योग्य प्रमाणात खात असाल, तर तुम्ही रोज हे खाऊ शकता. ओवा रोज तुम्ही 100 mg खाऊ शकता. ओवा दिवसभरात 3 ते 4 वेळ खावे.

Q.3) ओवा रात्री पाण्यात टाकून पिऊ शकतो का? 

Ans :- रात्री ओव्याचे पाणी पिण्या संबंधित अजून काही माहिती उपलब्ध नाही. परंतु तुम्ही ओव्याचे पाणी सकाळी उपाशी पोटी घेऊ शकता. रात्री याचे पाणी पिण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर चा सल्ला घेऊ शकता.

Q.4) ओव्याला कैरम सीड (carom seeds) म्हंटले जाते का?

Ans :- हो, ओव्याला कैरम सीड म्हटले जाते. जेव्हा याला पाण्यात टाकून उकडले जाते. त्यानंतर याला कैरम सीड वॉटर असे म्हटले जाते.

Q.5) अद्रक आणि ओवा सोबत खाऊ शकतो का?

Ans :- हो, तुम्ही अद्रक आणि ओवा पाण्यात उकडून ते पाणी पिऊ शकता.

Q.6) सकाडी उपाशी पोटी ओवा खाल्ले तर फायदे होतात?

Ans :- हो, तुम्ही जर नियमित सकाळी उपाशी पोटी ओवा खाल्ले तर, तुमची पचनक्रिया चांगली राहते व अन्न लवकर पचण्यास मदत होते.

Q.7) आपण सोफ आणि ओवा सोबत खाऊ शकतो?

Ans :- हो, काही लोक ओवा आणि सोफ ला पाण्यात उकडून चहा सारख पितात. त्यामुळे आपण हे दोन्ही सोबत खाऊ शकतो.

ओवा खाण्याचे फायदे (Ajwain in Marathi) हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • धिरज तायडे

📢 महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला ओवा खाण्याचे फायदे बद्दल माहिती देणे असल्याकारणाने ओवा चा वापर आरोग्यासाठी घेण्याकरिता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻