ओरेगॅनो (Oregano), हि एक झुडूप सारखी वनस्पती आहे, जी मसाला आणि औषध म्हणून वापरली जाते. त्याची लागवड लहान प्रमाणात केली जाते. ओरेगॅनोच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. काही रोगांमध्ये ओरेगॅनो रामबाण औषध म्हणून काम करते. रोगांनुसार ओरेगॅनोचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ओरेगॅनो मसाले, चूर्ण, डेकोक्शन (काढ़ा) आणि अर्क स्वरूपात देखील वापरला जातो.

या लेखात तुम्हाला सांगितले जाणार की, आपण घरी ओरेगॅनो चा वापर कश्या प्रकारे करू शकतो तसेच ओरेगॅनो मूळे काय नुकसान होऊ शकतात. चला तर बघूया ओरेगॅनो म्हणजे काय? (Oregano in marathi)

अनुक्रमणिका

ओरेगॅनो म्हणजे काय? – Oregano in marathi

oregano in marathi

oregano in marathi

oregano meaning in marathi

ओरेगॅनो हि वनस्पती पुदीना कुटुंबातील लॅमियासी फुलांच्या वनस्पतीतील एक प्रजाती आहे. हि वनस्पती मूळची भूमध्य प्रदेशातील आहे, ओरेगॅनोची चव हि खूप तिखट आहे. या वनस्पतीची गणना अशा काही वनस्पतींमध्ये केली जाते, जी पूर्णपणे वाळल्यावर खूप चांगली चव आणि सुगंध देते. (उदा. – चहा पत्ती)

हे प्रामुख्याने पिझ्झा, पास्ता इत्यादी मध्ये वापरले जाते. हे अन्नाला वेगळी चव आणि सुगंध देते. जसे कि सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे हि वनस्पती फक्त खाद्य पदार्थातच नव्हे तर आरोग्यासाठी पण फायदेशीर आहे त्याबद्दल आपण पुढे जाणून घेऊया.

हे वाचलंत का? –
* अवोकॅडो हे कुठले फळ आहे?
* डोक्यात केमिकल लोचा झाला म्हणजे काय?

ओरेगॅनो चा परिचय – Oregano meaning in marathi

ओरेगॅनो वनस्पती हि तुळशीसारखी दिसते आणि त्याची पाने पुदिन्याच्या पानांसारखी दिसतात. ओरेगॅनो एक सदाहरित वनस्पती आहे, जी 20 सेमी ते 80 सेमी उंच वाढते. त्याची पाने 1 सेमी ते 4 सेमी लांब असतात, ज्याची रचना हि एकमेकांच्या विरुद्ध असते. त्याची फुले जांभळी असून 3-4 सें.मी. लांब असतात. ओरेगॅनोला कधीकधी ‘वाइल्ड मार्जोरम’ असे म्हटले जाते.

असे मानले जाते की जगभरात सुमारे 60 वनस्पती प्रजाती आहेत. ज्या रंग आणि चव ओरेगॅनो सारख्या आहेत आणि त्यांना बहुतेक वेळा ओरेगॅनो म्हणून संबोधले जाते. ही एक औषधी वनस्पती आहे, म्हणून ती अनेक शारीरिक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वापरली जाते.

ओरेगॅनो चे प्रकार – Types of oregano in marathi

जस एकी तुम्हाला माहिती झाले आहेच कि, ही एक अतिशय फायदेशीर वनस्पती मानली जाते. जगभरात ओरेगॅनोच्या सुमारे 60 प्रजाती आहेत. पण येथे आपण तीन प्रमुख ओरेगॅनो प्रजाती बद्दल जाणून घेणार आहोत.

१) युरोपियन ओरेगॅनो
२) मेक्सिकन ओरेगॅनो
३) ग्रीक ओरेगॅनो

१) युरोपियन ओरेगॅनो

याला ‘वाइल्ड मार्जोरम’ किंवा विंटर मार्जोरम असेही म्हणतात. या प्रकारचे ओरेगॅनो केवळ ग्रीस, तुर्की, इटली, स्पेन, आणि अमेरिकेत आढळतात. याचा उपयोग खोकला, डोकेदुखी, दातदुखी, अस्वस्थता, आणि अनियमित मासिक पाळी इत्यादीपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो.

२) मेक्सिकन ओरेगॅनो

हे ओरेगॅनो मेक्सिकन मार्जोरम म्हणूनही ओळखले जाते. हे विशेषतः मेक्सिको आणि आसपासच्या भागात आढळते. याचा उपयोग पिझ्झा आणि बार्बेक्यू सॉस सारख्या मेक्सिकन पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो.

३) ग्रीक ओरेगॅनो

याला विंटर स्वीट मार्जोरम किंवा पॉट मार्जोरम असेही म्हणतात. हे ओरिगेनम हेराक्लियोटिकम एल मधून काढलेले ओरेगॅनो आहे.

ओरेगॅनो मधील पौष्टीक घटक

पौष्टीक घटक प्रमाण प्रति 100 ग्रॅम
ऊर्जा (energy)265 kcal
प्रथिने (protein)9 ग्रॅम
चरबी (Fat)4.28 ग्रॅम
साखर (Sugar)4.09 ग्रॅम
फायबर (fiber)42.5 ग्रॅम
कर्बोदक (Carbohydrate)68.92 ग्रॅम
कॅल्शियम (calcium)1597 मिली.ग्रॅ
लोह (Iron)36.8 मिली.ग्रॅ
मॅग्नेशियम (magnesium)270 मिली.ग्रॅ
फास्फोरस (Phosphorus)148 मिग्रॅ
सेलेनियम (selenium)4.5 मायक्रो.ग्रॅ
मॅंगनीज (manganese)4.99 मिग्रॅ
तांबे (Copper)0.633 मिग्रॅ
जस्त (zinc)2.69 मिग्रॅ
सोडियम (sodium)25 मिग्रॅ
पोटॅशियम (potassium)1260 मिग्रॅ
व्हिटॅमिन सी (vitamin C)2.3 मिग्रॅ
थायामिन (Thiamine)0.177 मिग्रॅ
नियासिन (Niacin)4.64 मिग्रॅ
रिबोफ्लेविन (Riboflavin)0.528 मिलीग्राम
व्हिटॅमिन-बी 6 (Vitamin-B6)1.044 मिग्रॅ
फोलेट (folate)237 मायक्रोग्राम
व्हिटॅमिन ए, आरएई (Vitamin A, RAE)85 मायक्रोग्राम
व्हिटॅमिन ई (Vitamin E)18.26 मिग्रॅ
व्हिटॅमिन-के (Vitamin-K)621.7 मायक्रोग्राम
चरबीयुक्त आम्ल (Fatty Acid Total Saturated)1.551 ग्रॅम
व्हिटॅमिन ए, आईयू (Vitamin A, IU)1701 आईयू

oregano in marathi

ओरेगॅनो चे फायदे – Benefits of oregano in marathi

ओरेगॅनो च्या पानांचा वापर वर्षानुवर्षे होत आलेला आहे. जो कि मानवांचे चांगले आरोग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ओरेगॅनोच्या हिरव्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. जे आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवतात.

१) पोटदुखीमध्ये ओरेगॅनोचे फायदे

कधीकधी खाण्यामध्ये गडबड असल्यास पोटदुखी, अपचन, फूड पॉइजनिंग आणि इतर अनेक पोटा संबंधित आजार होऊ शकतात. अशा स्थितीत पोटदुखीपासून आराम मिळण्यासाठी ओरेगॅनोचे फायदे तुम्ही घेऊ शकतात. ओरेगॅनोच्या आवश्यक तेलात मोनोटेर्पेनिक फिनॉल नावाचे एक संयुग असते, जे काही प्रमाणात पोटदुखी कमी करण्यास मदत करू शकते.

काळे मीठ मिसळून ओरेगॅनो सोबत घेतल्यास पोटदुखीवर फायदा होतो आणि पाचन समस्यांवर मात करण्यास मदत मिळते. तसेच ओरेगॅनो पाचक अवयवांमध्ये पित्त रसाचा प्रवाह सुधारते.

२) हृदय संबंधी आजारा मध्ये ओरेगॅनोचे फायदे

नैसर्गिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले ओरेगॅनो तेल हे हृदयाच्या समस्या दूर करण्यास मदत करते. ओरेगॅनो वनस्पती मध्ये पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. जो शरीराच्या अवयवांसाठी आणि पेशींसाठी एक चांगला घटक आहे. ओरेगॅनो हृदयाचे वेगाने होणाऱ्या ठोक्यांना नियंत्रित करतो आणि रक्तदाबासारख्या गंभीर समस्यांपासून सुटका देतो. ओरेगॅनो हे हृदयरोगापासून दूर राहण्यास मदत करतो.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या ही एक प्रकारची मोठी समस्या आहे. ज्यात पेशी पुनर्प्राप्त होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ घेतात. धूम्रपान, मधुमेह आणि जळजळ यांसारख्या अनेक कारणांमुळे हे होऊ शकते. ओरेगॅनो आवश्यक तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ आणि हृदयरोगाचा धोका कमी करतात.

३) त्वचा संबंधीत समस्यानसाठी फायदे

आयुर्वेदानुसार, oregano च्या पानांमध्ये मुरुमांची समस्या दूर करण्याची क्षमता असते. त्यामधील अँटी फंगल, अँटी सेप्टिक आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म जे त्वचेतील अशुद्धता काढून समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच हे अनेक औषधीमध्ये त्वचेच्या संबंधित उत्पादनांमध्ये जसे की फूट क्रीम, स्किन टोनर आणि फेस वॉश मध्ये महत्वाचे औषध म्हणून वापरले जाते.

ओरेगॅनोचे तेल त्वचेचे संक्रमण टाळण्यासाठी किंवा संक्रमण असल्यास त्याचा परिणाम कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहेत, ज्यामुळे संसर्ग होणारे जीवाणू नष्ट होतात. यात दाहक-विरोधी आणि इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म देखील आहेत, जे त्वचेवर जळजळ कमी करू शकतात. यात कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहेत, जे त्वचेच्या कर्करोगाच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

४) कर्करोग आजारावर फायदेशीर

ओरेगॅनो हे पोषक तत्वांनी समृद्ध, असलेला फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे, जो शरीरातून कर्करोगास कारणीभूत विषारी पदार्थ काढून टाकतो. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विरोधी दाहक असणारा ओरेगॅनो हा एक उत्तम औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. ओरेगॅनो स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा होण्याचा धोका दूर ठेवतो.

ओरेगॅनोमध्ये थायमॉल, कार्वाक्रॉल आणि इतर काही कर्करोग विरोधी गुणधर्म असतात. ते कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून रोखू शकतात आणि कर्करोगाचा धोका कमी करू शकतात.

५) केस गळती समस्येवर फायदे

औषधयुक्त ओरेगॅनो तेल देखील कोंडाची समस्या दूर करण्यास मदत करू शकते. यासाठी, शैम्पूमध्ये ओरेगॅनो तेलाचे तीन थेंब मिसळा आणि केसांमध्ये चांगले लावा. 2 ते 3 मिनिटे थांबा आणि नंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. जर तुमची टाळू खूप खाजत असेल, तर ओरेगॅनो तेल या समस्येवर उपाय असू शकतो. कारण ओरेगॅनोमध्ये अनेक बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात.

यासाठी कोणत्याही सामान्य तेलात तीन थेंब ओरेगॅनो तेलाचे मिसळा आणि ते तुमच्या टाळूवर लावा. 45 मिनिटे ठेवल्यानंतर, आपले केस शैम्पूने धुवा. केस गळणाऱ्या लोकांसाठी ओरेगॅनोचा वापर फायदेशीर ठरू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस केस गळण्याचे कारण असू शकते.

६) सांधे दुखी समस्येवर फायदे

ओरेगॅनोचे पाने हाडे निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हाडे निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्त्वे आवश्यक असतात. ज्यामध्ये कॅल्शियम हे सर्वात महत्वाचे आहे आणि कॅल्शियम ओरेगॅनोच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. याव्यतिरिक्त, त्यात इतर पोषक घटक आहेत.

जे हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करतात. जसे की मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, तांबे आणि मॅंगनीज. तसेच, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-के सारखे फायदेशीर जीवनसत्त्वे देखील आढळतात.

७) मासिक पाळीमध्ये वेदना कमी करतो

ओरेगॅनो बियांची सुकलेली पाने हेल्थ टॉनिक म्हणून काम करतात. कारण असे अनेक घटक ओरेगॅनोमध्ये आढळतात जे शरीराला शक्ती प्रदान करतात आणि सर्दी, ताप, अपचन, पोट खराब आणि वेदनादायक मासिक पाळी समस्येमध्ये आराम देतात.

ओरेगॅनोचे इतर काही फायदे – benefits of oregano

  • ओरेगॅनो रक्तवाहिन्यांमधून हाडांपर्यंत कॅल्शियम पोहोचवण्याचे काम करते. जे रक्त परिसंचरण आणि हाडांच्या वाढीस मदत करते.
  • अनियमित मासिक पाळी बरा करण्यासाठी ओरेगॅनो खूप प्रभावी आहे.
  • ओरेगॅनो घटक ताप, इन्फ्लूएन्झा आणि खालच्या ओटीपोटात दुखल्यावर त्वरित आराम मिळण्यास मदत करतो.
  • ओरेगॅनोमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी आवश्यक असतात.
  • ओरेगॅनोची पाने बारीक करून त्याची पेस्ट लावल्याने संधिवात, सूज, खाज यापासून आराम मिळतो.
  • ओरेगॅनो मॅंगनीजमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि लोहाची चांगली मात्रा आढळते ज्यामुळे अॅनिमियाच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.
  • ऍलर्जी असल्यास ओरेगॅनोचे तेल वापरणे खूप फायदेशीर आहे.
  • ओरेगॅनो वजन कमी करण्याकरिता आणि सर्दीमध्ये फायदेशीर आहे.

ओरेगॅनोमुळे होणारे नुकसान

  • महिलांनी गर्भधारणेदरम्यान ओरेगॅनोचे सेवन करू नये, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने गर्भपात होऊ शकतो. ( या संबंधित डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
  • अधिक ओरेगॅनोचे सेवन केल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते.
  • दुखापतीनंतर रक्तस्त्राव सहजासहजी थांबत नाही. या समस्येमध्ये शरीरातील प्लेटलेटचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे त्वचेवर रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि रक्तस्त्राव थांबत नाही. ओरेगॅनोच्या सेवनाने रक्तस्त्राव ग्रस्त लोकांची समस्या अधिक वाढू शकते.
  • स्तनपान करणा -या महिलांनी ओरेगॅनोचे सेवन टाळावे.
  • जर तुम्ही अधिक प्रमाणात ओरेगॅनो चे सेवन केलेत तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर लेवल) कमी होऊ शकते.
  • कुणा कुणाला त्वचेवर ओरेगॅनो तेल वापरल्या नंतर त्यामुळे त्वचा जळजळ होऊ शकते.
  • ज्या लोकांना तुळस, पुदीना आणि सुवासिक फुलांची ऍलर्जी आहे त्यांना oregano ची ऍलर्जी होऊ शकते.

oregano in marathi

oregano meaning in marathi

oregano meaning in marathi

ओरेगॅनोचा वापर कसा करावा?

  • ओरेगॅनो हे ताजे, वाळलेले आणि तेलाच्या स्वरूपात वापरले जाऊ शकते.
  • ओरेगॅनोचा वापर आपण चिकन, भाजी, पिझ्झा, पास्ता आणि इतर पदार्थांमध्ये मसाला म्हणून करू शकतो.
  • ओरेगॅनोची पाने सूपमध्ये टाकून त्यांचे सेवन करू शकता. त्याची पाने सूपला छानशी चव देते.
  • आपण आले किंवा मसाला चहामध्ये काही ओरेगॅनोचे पाने देखील टाकू शकतात.
  • ओरेगॅनो चहा बनवता येतो, ज्यातून ओरेगॅनो पानांचे फायदे मिळू शकतात.
  • ओरेगॅनोला ‘पिझ्झा हर्ब’ म्हणूनही ओळखले जाते, कारण त्याचा वापर पिझ्झाची चव वाढवण्यासाठी केली जातो.
  • ओरेगॅनोचे पाने एका पॅनमध्ये हलके भाजून घेतल्यावर आपण आपल्या आवडत्या डिशमध्ये घालू शकतो.

ओरेगॅनो बद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

प्रश्न १. ओरेगॅनो म्हणजे काय?
उत्तर – ओरेगॅनो हि वनस्पती पुदीना कुटुंबातील लॅमियासी फुलांच्या वनस्पतीतील एक प्रजाती आहे. हि एक बारमाही औषधी वनस्पती आहे.

प्रश्न २. ओरेगॅनो (Oregano) साठी पर्यायी नावे काय आहेत?
उत्तर – ओरेगानोची पर्यायी नावे म्हणजे वाइल्ड मार्जोरम, फील्ड मार्जोरम, विंड मार्जोरम, स्पॅनिश थाईम, पिझ्झा हर्ब, विंटरस्वीट, युरोपियन ओरेगॅनो, ओरेगॅन इत्यादी

प्रश्न ३. स्वयंपाकासाठी ताजे किंवा वाळलेले ओरेगॅनो वापरू शकतो का?
उत्तर – ओरेगॅनो ही एक औषधी वनस्पती आहे, जी कि चवसाठी वापरली जाते, ओरेगॅनो हे ताज्यापेक्षा सुकल्यावर अधिक चवदार लागते.

प्रश्न ४. ओरेगॅनोमुळे कोणते आजार बरे होतात?
उत्तर – ओरेगॅनोमुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी, ताप, पोटदुखी यासारखे आजार बरे होतात.

प्रश्न ५. ओरेगॅनोमुळे कुठले नुकसान होतात?
उत्तर – महिलांनी गर्भधारणेदरम्यान ओरेगॅनोचे सेवन करू नये, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने गर्भपात होऊ शकतो.

  • सागर राऊत

( महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला ओरेगॅनो बद्दल माहिती देणे असल्याकारणाने ओरेगॅनो चा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल.


संदर्भ (Reference) –



🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Health

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *