7/12 उतारा।7/12 utara in marathi online। digital 7/12

सातबारा उतारा महाराष्ट्र

satbara-utara

digital 7/12 कसा काढायचा?

महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांची ऑफिसिअल वेबसाईट आहे bhulekh.mahabhumi.gov.in यावर डिजिटल साइन (डिजिटल हस्ताक्षरात) सात बारा उपलब्द्ध करून देण्यात आलेला आहे आणि यावर डिजिटल साइन असल्याकारणाने सब्बधित तलाठी व नायब तहसीलदारांची सही घेण्याची गरज नाही.

हा सात बारा उतारा आपण pdf मध्ये डाउनलोड करून ठेऊ शकतो. (7/12 utara in marathi online)

आपण आज या आर्टिकल मध्ये महसूल विभाग ऑफिसिअल वेबसाईट वर लॉगिन कसे करायचे..? सातबारा उतारा डाउनलोड कसा करायचा..? याबद्दल माहिती घेणार आहोत, तर हे आर्टिकल तुम्हाला सुरवात पासून शेवट पर्यंत न चुकता वाचावे लागेल..!
चला तर बघूया…

( सूचना- तुमच्या कडे मोबाईल किव्हा कॉम्पुटर असला तरी चालेल दोघांची सातबारा काढण्याची प्रक्रिया सारखीच आहे. आपले वाचक हे जास्त प्रमाणात मोबाईल धारक असल्याकारणाने आपण या पोस्ट मध्ये मोबाईल फॉरमॅट मध्ये समजून घेऊया. जर तुम्हाला काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क साधा.)

१) सर्वात आधी मोबाईल मध्ये google chrome उघडा.
त्यामध्ये bhulekh.mahabhumi.gov.in टाईप करा. नाहीतर यावर (डिजिटल ७/१२) वर क्लिक करा. तुम्ही सरळ महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वर पोहचाल, जी खालील दिलेल्या फोटो प्रमाणे असेल.

सातबारा उतारा महाराष्ट्र

satbara

२) त्यानंतर त्या वेबसाईट च्या उजव्या बाजूला एक चित्र (icon) Digital Signed 7/12 असे दिसेल त्यावर क्लिक करा.

7/12 utara in marathi online

bhulekh

३) तेव्हा खालील पेज उघडेल. जिथे आपल्याला नवीन नोंदणी करावी लागेल. (New User Registration) वर क्लिक करा. (तुम्हाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्ही डिजिटल ७/१२ पाहू अथवा डाउनलोड करू शकणार नाही.)

7/12 कसा शोधायचा

सात-बारा-उतारा-ऑनलाईन

३) तुम्ही आत्ता या पेज वर पोहचाल जेथे तुम्हाला स्वतःची माहिती फॉर्म मध्ये भरावी लागेल. (तुमचं नाव, वडिलांचे नाव, आडनाव, लिंग- पुरुष / स्त्री मोबाईल नंबर, व्यवसाय, ई-मेल, जन्म तारीख, तुमचा राहता पत्ता जो कि आधार कार्ड वर असणार, पिन कोड, जिल्हा, राज्य) हे वेवस्थित भरून घ्या.

bhulekh-2

४) त्यानंतर खाली एक ऑपशन असेल Login Id म्हणून. तेथे तुमच्या सोईनुसार id व पासवर्ड तयार करू शकता. तो id एकदा Check Availability वर पाहून घ्या. जो कि तुम्हाला नंतर लक्षात ठेवायचा आहे. id आणि password लक्षात राहत नसल्यास, एखाद्या कागदावर लिहून ठेवा.

सात-बारा-उतारा-ऑनलाईन-2021

५) आत्ता तुमची नोंदणी झालेली आहे. परत https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वर जावे लागेल. तुम्हाला खालील दाखवलेल्या फोटो प्रमाणे पेज उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही तयार केलेला id आणि पासवर्ड टाकावा लागेल.

सात-बारा-उतारा-ऑनलाईन

bhulekh / 7/12 maharashtra

६) Login Id आणि password टाकून झाल्यानंतर खाली captcha असेल, जो जश्यास तसा भरून Login वर क्लिक करायचे आहे.

७) Login झाल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसेल, तसेच खालच्या बाजूला तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर/ गट नंबर निवडावा लागेल. ( महत्वाची सूचना- तुम्हाला खाली एक ऑपशन दिसले असेल (Recharge Account) ते यासाठी कि तुम्हाला डिजिटल ७/१२ बघण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल विभाग ला १५ रुपये द्यावे लागतात. त्याकरिता तुम्हाला Recharge Account वर क्लिक करून पैसे भरावे लागेल)

mahabhulekh 7/12

८) Recharge Account वर क्लिक करा. त्यानंतर खालील दिलेले पेज उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला Enter Amount मध्ये 15 रुपये ते 1000 पर्यंत पैसे भरू शकता. select payment gateway तुम्हाला निवडा लागेल. जे असणार – SBI किव्हा bank of baroda
नंतर Pay Now क्लिक करा.

satbaara

९) आत्ता तुमच्या डिजिटल ७/१२ अकाउंट ला पैसे जमा झाले. आत्ता तुम्ही तुमचा डिजिटल ७/१२ काढू शकता.

तुम्हाला पैसे न खर्च करता विना स्वाक्षरीत ७/१२ व ८ अ पाहायचा असल्यास इथे क्लिक करा. – विना स्वाक्षरीत ७/१२ व ८ अ

  • सागर राऊत

हे वाचलंत का? –

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻