ऑनलाईन व्यवसाय |घरबसल्या व्यवसाय

online-business-in-marathi

online business in marathi | घरगुती व्यवसाय महिलांसाठी

ऑनलाईन सामान विका आणि आपला व्यवसाय वाढवा.!

फ्लिपकार्ट वर विक्रेता अकाउंट तयार करायची प्रक्रिया

आज आपण जाणून घेऊया ऑनलाईन सामान कसे विकायचे..!
जर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट हे ऑनलाईन विकायचे असतील, तर या ऑनलाईन जगतात तुम्हाला ऑनलाईन व्यवसायाबद्दल सर्व गोष्टी समजून घ्याव्या लागतील, तसेच तुम्हाला याचा भाग बनवा लागेल.

होऊ शकते तुम्हाला ऑनलाईन सामान विकणे, हे एका समस्ये सारखे वाटत असेल..? परंतु वेळेच्या सोबत आपण चाललो, तरच आपण यशस्वी होऊ..!

तुमच्या दुकानांमध्ये दिवसातुन निवडीक ग्राहक येतात. पण ऑनलाईन मध्ये तुमच्या प्रोडक्ट ला कितीतरी लोक पाहतात.
ऑनलाईन सामान विकणे हे सोपे व फायद्याचे आहे.

आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी एक अप्रतिम माध्यम हे ऑनलाईन व्यवसाय करणे आहे. तर चला आपण जाणून घेऊया… ऑनलाईन सामान विकण्याकरीता कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.

हे वाचलंत का? –
* घरगुती व्यवसाय महिलांसाठी
* ॲमेझॉन वर आपले प्रॉडक्ट कसे विकायचे? सविस्तर माहिती

ऑनलाईन सामान विका आणि आपला व्यवसाय वाढवा.

व्यवसायाला ऑनलाईन चालू करण्याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार असा की, तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करा किंवा दुसऱ्या प्रकार असा कि, एखाद्या इ-कॉमर्स (E-commerce) वेबसाईटवर साहित्य विका.

स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर विकणे. हे थोडे महाग पडते आणि याकरिता तुम्ही तांत्रिक कामामध्ये थोडे सक्षम असणे आवश्यक आहे. याकरिता सर्वात आधी तुम्ही एखाद्या दुसऱ्या वेबसाईट वर सेलर म्हणून सामान विकणे चांगले राहील.

इ-कॉमर्स (E-commerce) वेबसाईटवर तुमचे सामान विकण्याकरिता काही प्रसिद्ध वेबसाईट आहेत जसे कि– flipkart , Amazone , Snapdeal , ClickBank, ebay, limerod, myntra या कंपन्यांन सोबत तुम्ही जुडू शकता.

ई-कॉमर्स कंपन्यान सोबत कशे जुडायचे.

कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइट वर सामान विकण्या करीता तुम्हाला आधी विक्रेता म्हणून राजिस्ट्रेशन करावे लागेल.

यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. जो त्यांच्या वेबसाइट वर उपलब्ध राहतो. सर्व वेबसाईट चा फॉर्म हा जवळ जवळ सारखाच असतो.

उदा.- आपण फ्लिपकार्ट वर विक्रेता अकाउंट तयार करायची प्रक्रिया बघूया.

 • सर्वात आधी seller.flipkart.com या वेबसाईटवर जावे.
 • यावर रेजिस्ट्रेशन करण्याकरिता ई-मेल आणि फोन नंबर ची आवश्यकता असणार, तो तुम्ही आधीच तयार ठेवा.
 • हे सर्व भरल्यानंतर पुढील पेज वर जा आणि आपले पूर्ण नाव आणि पत्ता टाका.
 • त्यानंतर तुम्हाला एक ई-मेल येईल, त्यामध्ये एक लिंक असेल त्या लिंक वर क्लीक करून तुमचे अकाउंट व्हेरिफाय करून घ्या.
 • अकाउंट व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला सप्लायर पॅनेल मध्ये एन्ट्री मिळून जाईल.
 • एकदा तुमचे प्रॉडक्ट तेथे लिस्ट झाले की, तुम्ही मग कॉल वर पण माहिती घेऊ शकता.
 • फ्लिपकार्ट त्यांच्या लॉजीस्टिक सर्व्हिस द्वारे तुमचे सामान तुमच्या ग्राहका पर्यंत पोहचवते. फक्त सामान पॅक करायची जबाबदारी आपली राहणार.
 • फ्लिपकार्ट तुमचे प्रॉडक्ट डिलिव्हर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात तुमच्या अकाउंट ला त्या सामानाचे पैसे जमा करतात.
 • त्या करिता तुम्हाला तुमचे बँक अकाउंट नंबर पण द्यावा लागेल. हे चांगले राहील की, तुम्ही तुमच्या कंपनीच्या नावानेच बँक खाते खोलून घ्यावे, कारण वयक्तिक खात्यामध्ये पैसे पाठवण्या मध्ये अडचण जाऊ शकते.
 • तुमच्या सामानाच्या किमतीमधून फ्लिपकार्ट एक फिक्स पैसे ठेऊन घेईल, व त्यांचं कमिशन ज्यामध्ये वेबसाईटवर विकण्याचे कमिशन सर्व्हिस टॅक्स आणि लॉगिस्टिक सर्व्हिस चार्ज त्यामध्ये घेतला जातो.

ऑनलाईन व्यवसाय

आता ऑनलाईन सामान विकण्या संबंधी माहिती तुम्हाला मिळाली आहे, पण आणखी काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे.

● तुम्ही किती पण वेबसाईटवर सेलर म्हणून रेजिस्ट्रेशन करू शकता.

● तुमचा मोबाईल नंबर, पॅन नंबर, ओळख पत्र (identity card ) पत्ता आणि कम्पणीच्या नावाचे बँक अकाउंट हे सर्व तयार ठेवणे.

● तुम्ही विकत असलेले सामान जर GST मध्ये येत असेल तर GST रेजिस्ट्रेशन करणे चांगले राहील.

● तुमच्या कडे एक कॉम्पुटर असणे आवश्यक आहे.

● कॉम्पुटर बद्दल थोडी माहिती आणि प्रॉडक्ट चे चांगले फोटो काढणे हे एवढं शिकून घ्या. सोबतच इंटरनेट बँकिंग बद्दल पण थोडी माहिती घ्या.

● तुम्ही विकत असलेल्या सामानाचा हिशोब ठेवा.

● सामान हे नेहमी चांगले ठेवा जेने करून ते परत येणार नाही कारण परत आलेल्या सामानाची जबाबदारी पण आपली राहणार.

आम्ही आशा करतो कि, ऑनलाईन व्यवसाय (online business in marathi) ची हि माहिती तुम्हाला नक्की आवळली असेल. अश्याच छान-छान माहिती साठी माहितीलेक ला अवश्य भेट द्या.

 • धिरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *