Mobile hacking information in marathi

Mobile hacking – ऍपलचा मोबाईल Android पेक्षा अधिक सुरक्षित असतो, परंतु याचा अर्थ असा नाही, की आयफोन हॅक केला जाऊ शकत नाही. परंतु Android फोन हॅक करणे सोपे आहे.

डिजिटल जगात, फोटो क्लिक करण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत, आपण आपल्या स्मार्टफोनवरून सर्वकाही करतो. अशा परिस्थितीत ऑनलाइन बँकिंग आणि सोशल मीडियाच्या वापरादरम्यान, हॅकिंग आणि डेटा लीकचा मोठा धोका संभवतो.

कॉम्पुटर पेक्षा स्मार्टफोन हॅक करणे, हॅकरसाठी सोपे आहे. अनेक रिसर्च आणि ऍपलच्या कंपनीच्या दाव्यानुसार ऍपलच्या आयओएसमध्ये अँड्रॉइडपेक्षा जास्त सिक्युरिटी उपलब्ध आहे, परंतु , याचा अर्थ असा नाही कि, आयफोन हॅक होऊ शकत नाही. तुम्हालाही तुमच्या फोनमध्ये ही पाच चिन्हे दिसत असतील, तर तुमचा फोन हॅक झाले असण्याची जास्त शक्यता आहे.

आज आम्ही तुम्हाला काही फोने हाक होण्याचे संकेत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही, हे तुम्ही सहज शोधू शकाल.

स्वतःहून सिस्टम शटडाउन आणि रीस्टार्ट होने

फोन हॅक होण्याचे एक लक्षण हे देखील आहे की, जर तुमची सिस्टीम सतत बंद होत असेल किंवा आपोआप रिस्टार्ट होत असेल तर, तुमची सिस्टीम हॅकर्सच्या ताब्यात आहे असे समजावे. याशिवाय, जर तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या फोन आणि कॉम्प्युटरची सेटिंग्ज आपोआप बदलली जात आहेत, तर सावधान व्हा. याचा अर्थ हॅकर्सना तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळाला आहे. डाउनलोड केलेली फाईल ताबडतोब तपासा किंवा फोन त्वरित फॉरमॅट करणे चांगले राहील.

बँकिंग व्यवहार

फोन हॅक होण्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे ऑनलाईन बँकिंग आहे. ऑनलाईन बँकिंग म्हटलं कि , तुम्हाला ट्रान्झॅक्शन मेसेज मोबाइलवर येतात. बर्‍याच वेळा असे घडते, की तुम्ही न घेतलेल्या उत्पादनांच्या खरेदीचे आणि व्यवहाराचे मेसेज तुम्हाला येऊ लागतात. याचा अर्थ असा की कोणीतरी तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा बँकिंग तपशील ताब्यात घेतले आहेत. असे झाल्यास लगेच बँकेची मदत घ्या आणि खात्यातून व्यवहार बंद करा.

फोन अचानक स्लो होतो

तुमचा स्मार्टफोन अचानक खूप स्लो चालत असेल, तर काळजी घ्या. बर्‍याच वेळा हॅकर्स बिटकॉइन्स मायनिंग करण्यासाठी तुमची प्रणाली वापरतात. तसेच इंटरनेटचा स्पीड चांगला असतानाही फोनवर व्हिडिओ स्लो चालत असेल किंवा तुमचा डेटा जास्त वापरला जात असेल ,तर काळजी घेण्याची गरज आहे.

अँटीव्हायरस बंद होणे

फोन हॅक करण्यासाठी हॅकर्स काहीवेळा अँटी व्हायरस आणि सुरक्षा सॉफ्टवेअर बंद करतात.अँटी व्हायरस काम करत नसल्याची शंका येत असेल, तर सावधान राहण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त, नेहमी तुमचा ब्राउझर तपासत राहा. बर्‍याच वेळा वेबसाईटच्या माध्यमातून काही एक्स्टेंशन किंवा सॉफ्टवेअर सिस्टममध्ये येतात आणि त्याद्वारे हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. अशी परिस्थिती टाळण्यासाठी फोनचे अॅप सतत अपडेट करत राहा.

बॅटरी वेगाने संपत आहे

जर तुमच्या फोनची बॅटरी अचानक लवकर संपत असेल. तर, तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कारण हॅकर्सनी तुमच्या फोनमध्ये कोणताही मालवेअर टाकला, तर तो फोनच्या बॅकग्राउंडमध्ये काम करतो. आणि बॅटरी वेगाने खराब करतो. तुमच्यासोबतही असे घडत असेल, तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *