mobile phone mahiti |मोबाईल माहिती
तीन प्रकारे तपासा तुमचा मोबाइल डुप्लिकेट तर नाही.(Mobile mahiti)
आताच्या या मोबाइल च्या युगात बाजारामध्ये रोज लाखो मोबाइल विकले जातात. या मधील काही चिनी कंपनीचे xiomi, one plus, vivo, oppo, huawai हे पण आहेत या कंपनीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बाजारामध्ये डुप्लिकेट फोन ची विक्री पण तेवढीच होत आहे.
मोबाईल फोन हा डुप्लिकेट निघणे ही गोष्ट सामान्य झाली आहे. मोबाइल Fraud च्या खूप केसेस समोर येत आहेत. इथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. ज्यावरून तुम्ही ओळखू शकता तुमचा मोबाईल डुप्लिकेट तर नाही.
हे वाचलंत का? – * लॅपटॉप घेण्याआधी या गोष्टी माहित असणे खूप आवश्यक.! * सेकंड हॅन्ड कार घेताय? या ८ गोष्टी माहिती असणे आवश्यक.! |
कसे ओळखायचे मोबाईल ओरिजिनल आहे की डुप्लिकेट?
आज मार्केट मध्ये रोज नवीन फोन लॉंच होतात. त्याच सोबत काही लोक मार्केट मध्ये डुप्लिकेट फोन पण विकतात. ते त्या फोन च्या किमतीत तुम्हाला डुप्लिकेट फोन विकतात. ग्राहकाला हे ओळखणे सोपे नाही राहत की, डुप्लिकेट फोन कोणता आहे? आणि ओरिजिनल फोन कोणता आहे?
जेव्हा तुम्ही मार्केट मध्ये मोबाइल विकत घ्यायला जाता तेव्हा खालील गोष्टी तपासा.
1) SMS च्या साहाय्याने चेक करा.
डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमुनिकेशन ने एक सर्विस चालू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही SMS च्या साहाय्याने माहीत करू शकता, की मोबाईल ओरिजिनल आहे की डुप्लिकेट.
त्याकरिता तुम्हाला फक्त एक sms करावा लागेल. त्याकरीता खालील स्टेप वाचा.
● तुमच्या मोबाईल मध्ये *#06# डायल करा. हे केल्यावर एक 15 अंकी नंबर येईल तो नंबर लिहून घ्या.
● आता तुमच्या मोबाइल मध्ये create message करा आणि message मध्ये KYM हे टाईप करा. व थोडी जागा सोडून तो 15 अंकी IMEI नंबर टाका.
● आता हा message 14422 या नंबर वर पाठवा.
● डबल सिम कार्ड च्या मोबाईल मध्ये दोन IMEI नंबर असतील. त्यातील दोन्ही पैकी तुम्ही कोणताही एक वापरू शकता.
तुम्ही message केल्यावर काही वेळात तुम्हाला एक message येईल ज्यामध्ये मोबाइल च्या संबंधित सर्व माहिती असेल.
जर ही माहिती तुमच्या मोबाइल ची असेल तर तुमचा मोबाइल ओरिजिनल आहे.
2) अँप च्या मदतीने माहिती करा.
तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये अँप च्या मदतीने पण माहिती घेऊ शकता.
● सर्वात आधी गुगल प्ले स्टोर वर जाऊन तिथे【know your Mobile type】अँप सर्च करा.
● हे अँप एक नंबर वरच येईल जे【center of development of advance computing या कंपनीचे आहे. या अँप ला इन्स्टॉल करा.
● या अँप मध्ये तुम्हाला IMEI नंबर मागितला जाईल. IMEI नंबर टाकून व्हेरिफाय करा.
● जर तुमच्या जवळ IMEI नंबर नसेल, तर तुम्ही menu मध्ये जाऊन MY IMEI वर क्लिक करून तुमच सिम कार्ड सिलेक्ट करून व्हेरिफाय करू शकता. हे सर्व केल्यावर तुमच्या मोबाईल बद्दल ची सर्व माहिती येईल जी तुम्ही व्हेरिफाय करू शकता.
3) Website च्या मदतीने तपासा.
तुमच्या मोबाइल मध्ये गूगल बार मध्ये फ्री ऑनलाईन IMEI नबर चेकर सर्च करा. नंतर या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमच्या मोबाईल चा IMEI नंबर टाका.
●सर्वात आधी IMEI.INFO या संकेतस्थळा वर जा.
● तुमच्या मोबाइल चा IMEI नंबर टाका.
● त्यानंतर CAPTCHA CODE टाका आणि व्हेरिफाय करा.
आता तुमच्या समोर पूर्ण माहिती असेल ज्यामध्ये तुमच्या मोबाईल चा MODEL NUMBER, BRAND, इत्यादी असेल.
– धीरज तायडे
🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.