लॅपटॉप घेण्याआधी या गोष्टी माहित असणे खूप आवश्यक.!

laptop information in marathi

laptop-information-in-marathi-mahitilake

लॅपटॉप कुठला घ्यावा।Laptop kuthla ghyava

तुम्हाला माहीत आहे का, एक चांगला लॅपटॉप विकत घेण्याआधी कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागतो? नाही माहिती तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, चांगला लॅपटॉप कसा निवडावा.

आज या इंटरनेट च्या काळात कोणीही लॅपटॉप विकत घेऊ इच्छितो, कारण लॅपटॉप ला आपण सहज कोठेही ने आन करू शकतो. मला माहिती आहे desktop वर काम करणे सोपे जाते. पण आपण desktop ला नेहमी आपल्या सोबत नाही ठेऊ शकत. याच कारनामुळे आपल्याकडे एक असा device असायला हवा जो आपण सोबत कोठेही नेऊ शकतो. त्यातलाच एक म्हणजे लॅपटॉप.

लॅपटॉप विकत घेण्याआधी लक्षात घ्या या गोष्टी…!

लॅपटॉप विकत घेण्याआधी आपल्याला लॅपटॉप कशा करिता घ्यायचा आहे. आणि कोणत्या कंपनीचा घ्यायचा आहे. जेणेकरून आपण एका चांगल्या कंपनीचा लॅपटॉप खरेदी करू शकू. या करिता आपल्याला आपल बजेट किती आहे? ते पण लक्षात घ्यावे लागेल म्हणजे त्यानुसार आपण लॅपटॉप विकत घेऊ.

जर तुम्ही लॅपटॉप छोट्या मोठ्या एडिटिंग आणि इंटरनेट या सारख्या गोष्टींकरिता विकत घेत असाल तर, तुम्ही 13 इंच ते 15 इंच पर्यंत स्क्रीन असलेला लॅपटॉप विकत घेऊ शकता. हो पण लक्षात ठेवायच की, Screen resolution चांगल असावा.

ऑपरेटिंग सिस्टम ची निवड कशी करावी..?

लॅपटॉप विकत घेण्याआधिच एक निर्णय घ्यायचा की, ऑपरेटिंग सिस्टम कोणती घ्यायची. जर तुम्हाला अप्पल ची ऑपरेटिंग सिस्टम घ्यायची असेल, तर तुमच्या जवळ लॅपटॉप घेण्यासाठी थोडेच पर्याय राहतील.

जर तुम्हाला विंडोज ची ऑपरेटिंग सिस्टिम घ्यायची असेल, तर तुमच्या जवळ खूप पर्याय उपलब्ध राहतील. विंडोज ची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ही विंडीज 10 आहे. लॅपटॉप मध्ये समाणत विंडोज पाहायला मिळते जे Dos आणि Linux पेक्षा महाग आहे.

तुम्हाला जर थोडे पैसे वाचवायचे असेल, तर तुम्ही DOS आणि Linux ऑपरेटिंग सिस्टीम असणारे लॅपटॉप पण घेऊ शकता. नंतर गरज भासली तर विंडोज इन्स्टॉल करू शकता. विंडोज इन्स्टॉल करण्याकरिता तुम्हाला थोडे टेकनिकल ज्ञान असणे आवश्यक आहे.

लॅपटॉप प्रोसेसर कोणते घ्यावे..?

लॅपटॉप घेण्याआधी तुम्हाला प्रोसेसर ची माहिती असणे आवश्यक आहे. कारण प्रोसेसरच्याच माध्यमाने तुम्हाला हे माहीत होते की, तुमचा लॅपटॉप किती ऍडव्हान्स आहे आणि किती वर्षे हा अपडेट राहणार. प्रोसेसर हे दोन कंपनी बनवतात. INTEL आणि AMD ज्यामध्ये Intel ही प्रचलित आहे. Intel चे Core i,core i5, core i7, हे प्रोसेसर बाजारात उपलब्ध आहेत. यामधून तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे निवड करू शकता.

laptop information in marathi

laptop-information-in-marathi

रॅम ची निवड कशी करावी..?

रॅम ची निवड करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. की रॅम ची लॅपटॉप मध्ये खूप महत्वाची भूमिका आहे. जर लॅपटॉप मधील रॅम चा विचार करीत असाल, तर तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने लॅपटॉप विकत घेत असल्यास. यामध्ये तुम्ही E-mail, net surfing, editing, या प्रकाराची कामे करायचे काम पडू शकते त्या नुसार तुमच्या लॅपटॉप ची रॅम ही 2 GB ते 4 GB असणे आवश्यक आहे.

ग्राफिक्स कार्ड कोणते घ्यावे..?

तसे तर लॅपटॉप मध्ये बेसिक ग्राफिक कार्ड असतो. पण तुम्हाला जर कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज, हाय विंडोज एडिटिंग आणि हाय लेवल गेम्स यासारखे ऍडव्हान्स feature वापरायचे असेल तर तुम्हाला ग्राफिक कार्ड ची गरज असेल. ग्राफिक कार्ड मध्ये Intel आणि AMD प्रचलित आहेत. जर तुम्ही गेम चे शौकीन आहात, तर ग्राफिक कार्ड वर जरूर लक्ष द्या.

लॅपटॉप बॅटरी ची निवड कशी करावी..?

लॅपटॉप घेण्याआधी लॅपटॉप ची बॅटरी किती वेळ चालते. ही माहिती नक्की घ्या. लॅपटॉप ची बॅटरी कमीत – कमी 6 ते 7 तास तरी चालायला हवी जेणेकरून तुम्हाला लॅपटॉप सारखा चार्जिंग वर नाही लावा लागणार.

– धीरज तायडे


🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का? –

Leave a Comment