GST चोरी रोखण्यासाठी सरकारचा मोठा उपक्रम, मिळणार एक कोटी चे बक्षीस

Mera Bill-Mera Adhikar : जर तुम्ही तंत्रज्ञान जाणकार असाल, तर ही बातमी तुम्हाला नक्की आनंदित करेल. होय, लवकरच सामान्य लोकांना मोबाईल अॅपवर GST चलन अपलोड करण्यासाठी बक्षीस मिळू शकते.

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकार लवकरच ‘मेरा बिल मेरा अधिकार’ हि योजना सुरू करणार आहे. या योजना च्या संबंधित दोन अधिकार्‍यांनी असे सांगितले की, इनव्हॉइस प्रमोशन योजनेंतर्गत, किरकोळ विक्रेत्याकडून किंवा ठोक विक्रेत्याकडून मिळालेले बिल (चालन) ‘अपलोड’ करणार्‍या लोकांना 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस मासिक / तिमाही दिले जाऊ शकतात.

जास्तीत जास्त २५ बिले ‘अपलोड’ करता येतील.

‘मेरा बिल मेरा अधिकार’ अॅप आईओएस आणि एंड्रायड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. अॅपवर अपलोड केलेल्या ‘इनव्हॉइस’ मध्ये विक्रेत्याचा GST IN, इनव्हॉइस क्रमांक, भरलेली रक्कम आणि कराची रक्कम असावी.

एका अधिकाऱ्याने असेही सांगितले, की एखादी व्यक्ती एका महिन्यात जास्तीत जास्त 25 बिले ‘अपलोड’ करू शकते, ज्याचे किमान मूल्य 200 रुपये असावे. त्यांनी सांगितले की योजना अंतिम केली जात आहे आणि ती लवकरच सुरु होऊ शकते.

500 हून अधिक कंप्‍टयूराइज्‍ड लकी ड्रा असणार

योजनेंतर्गत दरमहा ५०० हून अधिक कंप्‍टयूराइज्‍ड लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की एका तिमाहीत दोन लकी ड्रॉ काढले जातील. त्यांची बक्षीस रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत असू शकते. हि योजना सप्टेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केले जाऊ शकते. GST चुकवण्याचा धोका कमी करण्यासाठी, सरकारने आधीच B2B व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक इनव्हॉइसिंग अनिवार्य केले आहे.

‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजना B2C ग्राहकांच्या बाबतीत इलेक्ट्रॉनिक चालान निर्मिती देखील सुनिश्चित करेल, जेणेकरून खरेदीदार लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यास पात्र असेल. या योजनेची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ग्राहक दुकानदाराकडून वस्तू घेताना ग्राहक ते ग्राहक (B2C) वस्तू किंवा सेवा जीएसटीच्या कक्षेत खरेदी करताना विक्रेत्याकडून बिलाची मागणी करू शकतो.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment